थंडगार पीयूष मुले स्वतः बनवू शकतील अशी सुट्टीची रेसीपी
आता मुलाच्या परीक्षा संपल्याकी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील. मग रोज आई खायला दे किंवा काही तरी प्यायला दे अश्या फरमायशी चालू होतील. मग आपण रोज वेळवेगळे पदार्थ बनवतो.
आपण येथे थंडगार पीयूष ह्या रेसीपीचा शॉर्ट विडियो पुढे दिलेल्या लिंकवर पाहू शकता: पीयूष
जर आपण मुलांनाच काही सोपे पदार्थ करायला दिले तर त्यांना सुद्धा मज्जा वाटेल व आपण मस्त डिश बनवली म्हणून त्यांना आनंद सुद्धा होईल व त्याचा सुट्टी मध्ये वेळ पण जाईल.
पीयूष बनवताना अगोदर दही बनवून ठेवावे किंवा आपण घरी रोज घरी बनवतोच ते वापरले तरी चालेल. उन्हाळा सीझन चालू झाला की मुलां बरोबर मोठ्याना सुद्धा हे पेय मस्त आहे. दही हे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगले आहे.
बनवण्यासाठी वेळ: 5 मिनिट
वाढणी: 2 जणसाठी
साहित्य:
2 कप दही (थंडगार)
4 टे स्पून केशर विलायची श्रीखंड
4 टे स्पून आम्रखंड
2 टे स्पून साखर
2 टे स्पून दूध
1/4 टी स्पून विलची पावडर
सजावटी करिता:
केशर व ड्राय फ्रूट (तुकडे करून)
कृती:
केशर वेलची पीयूष बनवण्यासाठी: एक भांड्यात दही, साखर, केशर विलायची श्रीखंड, दूध, वेलची पाउडर घालून मग ब्लेंड करून घेऊन एका ग्लास मध्ये मिश्रण ओता वरतून केशरच्या 2-3 काड्या व ड्रायफ्रूट घालून थंड करून सर्व्ह करा.
मॅंगो पीयूष बनवण्यासाठी: एक भांड्यात दही, साखर, आम्रखंड, दूध, वेलची पाउडर घालून ब्लेंड करून घेऊन एका ग्लास मध्ये मिश्रण ओता वरतून केशरच्या 2-3 काड्या व ड्रायफ्रूट घालून थंड करून सर्व्ह करा.