६ एप्रिल हनुमान जयंती सर्वार्थ सिद्धी योग करा हे उपाय बजरंगबली करतील सर्व कष्ट दूर
६ एप्रिल गुरुवार ह्या दिवशी हनुमान जयंती साजरी करायची आहे. ६ एप्रिल २०२३ ह्या दिवशी हनुमान जयंती च्या दिवशी काही चांगले शुभ योग होत आहेत. ज्योतिष शास्त्र मध्ये हनुमान जयंती ह्या दिवशी काही उपाय सांगितले आहेत.
The text Jayanti 2023 Kara He Upay Sarv Kasht Dur Hotil in Marathi be seen on our You tube Chanel Hanuman Jayanti 2023
सर्वार्थ सिद्धी योगमध्ये हनुमान जयंतीचा आरंभ होत आहे. त्याच बरोबर ह्या दिवशी हस्त नक्षत्र व चित्रा नक्षत्रचा शुभ संयोग येत आहे. त्याच बरोबर भौतिक सुख सुविधाचे स्वामी शुक्र ग्रह पण राशी परिवर्तन करीत आहेत. म्हणून हनुमान जयंती ह्या दिवशी हनुमानजीनची पूजा अर्चा मनोभावे केलीतर ती आपल्याला लाभ दायक ठरेल. हनुमान जीना प्रसन्न करण्यासाठी पुढे दिलेले उपाय करून पहा. हनुमान आपल्या जीवनातील तमाम कष्ट दूर करतील.
हनुमानजीना प्रसन्न करण्यासाठी उपाय:
हनुमान जयंती ह्या दिवशी ब्रह्म मुहूर्त पासून संध्याकाळी पर्यन्त ११ वेळा सुंदरकांडचे वाचन करा. जर असे करणे संभव नाही तर १०८ वेळा हनुमान चालीसा म्हंटले तरी चालेल. त्याच बरोबर हनुमान अष्टक व बजरंग बाण सुद्धा वाचू शकता. असे केल्याने हनुमानजी आपले सर्व कष्ट दूर करून आपल्या आसपास भूत प्रेत व नकारात्मक शक्ति नष्ट करतील.
हनुमान जयंतीच्या दिवशी पूर्ण श्रद्धेने हनुमानजीना चोला, सिंदूर व पानाचा विडा अर्पित करा. मग गूळ व चणे, व बुंदी प्रसाद म्हणून वाटू शकता. हनुमानजीन सिंदूर अर्पित केल्यावर थोडासा खांद्या वरचा सिंदूर घेऊन आपल्या छातीवर लावावा. असे केल्याने नजरदोष दूर होऊन आपल्या जीवनात सुख समृद्धीचे दरवाजे उघडले जातात.
मनोकामना पूर्ण करणारा उपाय:
हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान मंदिरमध्ये जाऊन कुशच्या आसनावर बसून पांच चमेलीच्या तेलाचे दिवे लाऊन रामचरित मानस किंवा रक्षा स्त्रोत्रचे वाचन करावे. मग हनुमान जीनच्या कपाळा वरील सिंदूर उजव्या हाताच्या अंगठ्यानी घेऊन माता सीताच्या पायाला लावावा. असे केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळून सर्व मनोकामना पूर्ण होतात.
नौकरी व व्यापारमध्ये उन्नति करणारा उपाय:
हनुमान जयंतीच्या दिवशी तुळशीच्या पानावर राम राम असे लिहावे व त्याची एक माळ बनवून हनुमान जीना अर्पित करा. मग सरसूच्या तेलाचा दिवा व तुपाचा दिवा लावावा. मग हनुमान चालीसाचे वाचन करावे. असे केल्याने घरात धन धान्यची कधी सुद्धा कमतरता होत नाही व नोकरी व व्यापारामध्ये उन्नती होते.
सुरक्षा कवच सारखे काम करते हे यंत्र:
हनुमान जयंतीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धीच्या बरोबर अजून काही योग येत आहेत. ह्या शुभ योगमध्ये हनुमान यंत्राची स्थापना करून त्याची नियमित पूजा अर्चा करा. असे केल्याने शारीरिक व मानसिक रूपात विकास होऊन आत्मविश्वासमध्ये वृद्धी होते. ह्या यंत्राची पूजा केल्यास आपल्या शरीरीक आरोग्य संबंधित तक्रारी दूर होतात व संपूर्ण परिवाराला सुरक्षा कवच मिळण्याचे काम करते.
हा उपाय केल्याने धन धान्यची कधी सुद्धा कमतरता होत नाही.
हनुमान जयंतीचा उपवास करून हनुमान मंदिरात जाऊन गूळ पोळीचा नेवेद्य दाखवा. किंवा मोतीचूरचे लाडू हनुमानजीना अर्पित करा. त्याच बरोबर केवडा अत्तर व गुलाबाच्या फुलांची माळ अर्पित करा. असे केल्याने हनुमानजीनची विशेष कृपा मिळेल व जीवनात धन धान्यची कमतरता होणार नाही.
मंगळ ह्या ग्रहाची स्थिति मजबूत राहण्यासाठी उपाय:
जे लोक मंगळ ह्या ग्रहाच्या पीडानी त्रस्त आहेत किंवा ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ ह्या ग्रहाची प्रतिकूल दशा चालू आहे त्यांनी हनुमान जयंती ह्या दिवशी रक्तदान, मसूर डाळ किंवा लाल रंगाचे वस्त्र दान करावे. हनुमान मंदिरात ध्वज लावल्याने सुद्धा विशेष लाभ मिळेल. असे केल्याने कुंडली मधील मंगळ ग्रह मजबूत बनतो.