वास्तु शास्त्र नुसार घरात हनुमानजीनचा कोणता फोटो लावावा व त्याचे लाभ काय आहेत
ज्या घरात हनुमानजीनचा फोटो लावलेला असतो त्या घरात मंगळ, शनि, पितृ दोष चा प्रभाव कमी असतो. त्याच बरोबर प्रेतक प्रकारच्या संकटांपासून बचाव होतो. खर म्हणजे घरात श्री हनुमान ह्यांचा फोटो लावायचा असेलतर काही नियम आहेत ते पाळले पाहिजेत. घरात कोणत्या प्रकारची हनुमान जीनची तसवीर लावणे शुभ मानले जाते. चलातर मग आपण पाहूया काय नियम आहेत.
The text Vastu Tips: Which Hanuman Photo is Good for Home in Marathi be seen on our You tube Chanel Vastu Tips: Which Hanuman Photo is Good for Home
वास्तुमध्ये हनुमानजीचा फोटो लावल्याने सर्व संकट व बाधा दूर होतात. त्याच बरोबर वाईट शक्ति दूर राहते. वास्तु नुसार हनुमानजिचा कोणता फोटो लावावा.
१) दक्षिणमुखी हनुमान:
वास्तु अनुसार हनुमानजीनचा फोटो किंवा चित्र दक्षिण दिशेला बघत आहे असा लावावा. ते चित्र किंवा फोटो बसलेल्या अवस्थेत लाल रंगाचा पाहिजे. दक्षिण दिशेला मुख असलेला फोटो का लावावा तर दक्षिण दिशेला त्यांचा खूप प्रभाव केलेला आहे. त्याच बरोबर दक्षिण दिशेवरुन येणारी वाईट शक्ति हनुमानजीनचा फोटो पाहून परत जाते. त्यामुळे घरात सुख शांती व समृद्धी येते. जर आपला मंगळ अशुभ असेलतर त्याचा शुभ परिणाम दिसून येईल. त्याच बरोबर हनुमानजीनचा आशीर्वाद आपल्याला मिळेल व संपूर्ण परिवाराचे स्वास्थ चांगले राहील. मंगळदोष पण दूर होईल.
२) उत्तरामुखी हनुमानजी:
हनुमानजीनचे फोटोचे मुख उत्तर दिशेला असेलतर ते उत्तर मुखी हनुमानजीचे स्वरूप मानले जाते.
ह्या स्वरूपाची पूजा केल्याने सर्व देवांची पूजा करण्याची कृपा मिळते. व माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न राहते.
३. पंचमुखी हनुमानजी:
वास्तु शास्त्र नुसार पंचमुखी हनुमानची मूर्ती ज्या घरात असते तेथे उन्नतीच्या मार्गा मधील सर्व अडथळे दूर होऊन धन संपत्तिमध्ये वाढ होते. घरात पाणी साठवून ठेवतो ती दिशा जर चुकीची असेलर परिवारात शत्रू बाधा, आजारपण, वाद विवाद होतो. हा दोष दूर करायचा असेलतर पंचमुखी हनुमानचे चित्र घरात लावावे. पण फोटो लावताना अश्या ठिकाणी लावा की फोटोचे मुख पाणी साठवलेल्या दिशेला असावे. आपल्याला असे वाटत असेलकी आपल्या घरात नकारात्मक शक्तिचा प्रभाव आहे तर हनुमानजीनच्या शक्ति प्रदर्शन असलेल्या मुद्रेचा फोटो लावावा. आपण पंचमुखी हनुमानचा फोटो आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर सुद्धा लावू शकता फोटो अश्या ठिकाणी लावा की तो सर्वानच्या लगेच नजरेस येईल. त्यामुळे घरात वाईट शक्तिचा प्रवेश होत नाही.
4) रामदरबार:
आपल्या घरातील बैठकीच्या खोलीत श्रीराम दरबार चा फोटो लावावा ज्यामध्ये श्री हनुमान प्रभु रामह्यांच्या पायाशी बसले आहेत. आपण बैठक रूममध्ये पंचमुखी हनुमानचे चित्र लावू शकता. किंवा पर्वत उचलताना किंवा श्रीराम ह्यांचे भजन म्हणतानाचे चित्र लावू शकता. घरात राम दरबारचा फोटो लावल्याने आपल्या जीवनातील सर्व कष्ट दूर होतात.
५) पर्वत उचलताना हनुमानचे चित्र:
आपण हे चित्र घरात लावलेतर आपल्यामध्ये साहस, बळ, विश्वास, व जिम्मेदारीची भावना येते. आपण कोणत्यासुद्धा परिस्थिति मध्ये घाबरणार नाही व आपले तुरंत समाधान होईल. वीर हनुमानची पूजा केल्याने भक्तामध्ये साहस येते.
६) उडत असताना हनुमान:
आपल्या घरात अश्या प्रकारचे चित्र लावले तर आपल्या मधील उन्नती, तरक्की व सफलता कोणी सुद्धा थांबू शकत नाही. आपल्या मध्ये पुढे जाण्यासाठी उत्साह व साहस संचार होऊन सफल होण्याच्या मार्ग मिळेल.
७) श्रीराम ह्यांचे भजन करताना श्री हनुमान:
जर अश्या प्रकारचे चित्र आपल्या घरात असेलतर आपल्यामध्ये भक्ति व विश्वासचा संचार होईल. हीच भक्ति व विश्वास आपल्या जीवनात सफलता मिळण्यासाठी आधार होईल. त्यामुळे एकाग्रता व शक्ति वाढते.
८) सफेद हनुमान:
नोकरी व प्रमोशन मिळण्यासाठी हनुमानजीनचा अश्या प्रकारचा फोटो लावावा ज्यामध्ये त्यांचे पांढरे स्वरूप असेल. आपण पहिले सुद्धा असेल की अश्या फोटोमध्ये त्यांचे पांढरे केस आहेत.
9) राम मिलन हनुमान:
हनुमान श्री राम ह्यांच्या गळ्यात पडून मिठी मारत आहे हे पण चित्र अद्भुत आहे. त्यामुळे परिवारात एकता व समाजात मनमिळाऊ स्वभाव बनतो.
१०) ध्यान करताना हनुमानजी:
हनुमानजी डोळे बंद करून ध्यान लाऊन बसले आहेत असे चित्र मन शांत व ध्यान करण्याचा विकास करणारे आहे पण चित्र कधी लावावे जेव्हा ध्यान व मोक्ष पाहिजे असेल तेव्हा.
११) संकटमोचन हनुमान:
उजव्या पायाच्या गुडघ्यावर बसून आशीर्वाद देतानाचे चित्र आपण पहिले असेल टे संकटमोचन हनुमान चे चित्र आहे. असे चित्र घरात दक्षिण दिशेला लावल्याने सर्व प्रकारचे संकट आपल्या घराच्या दरवाजा पर्यन्त सुद्धा येत नाही.