२२ एप्रिल अक्षय तृतीय २०२३ तिथी. महयोग सोने खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त व महत्व
अक्षय तृतीय २०२३ ह्या दिवसाला आखा तीज असे सुद्धा म्हणतात. हिंदू धर्मामध्ये हा दिवस अगदी शुभ मानला जातो.
पंचांग नुसार वैशाख महिन्यातील शुल्क पक्ष तृतीय ह्या तिथीला अक्षय तृतीया साजरी करतात. अक्षय तृतीया हा दिवस कोणते पण चांगले काम करण्यास अत्यंत शुभ मानला जातो. ह्या दिवशी माता लक्ष्मीची विधी पूर्वक पूजा अर्चा करतात. ह्या दिवशी सोने चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. पंचांग नुसार ह्या वर्षी अक्षय तृतीया ह्या दिवशी बरेच शुभ योग येत आहेत.
आता आपण पाहू या अक्षय तृतीया मुहूर्त, तिथी, व महत्व काय आहे:
अक्षय तृतीया 2023 तिथि:
हिंदू पंचांग अनुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीया तिथी २२ एप्रिल शनिवार सकाळी ७ वाजून ४९ मिनिट ला सुरू होत असून २३ एप्रिल रविवार सकाळी ७ वाजून ४७ मिनिट पर्यन्त आहे. ह्या वर्षी अक्षय तृतीया २२ एप्रिल ला आहे.
अक्षय तृतीया 2023 शुभ मुहूर्त:
पूजा मुहूर्त: २२ एप्रिल सकाळी ७ वाजून ४९ मिनिट ते दुपारी १२ वाजून २० मिनिट पर्यन्त
अक्षय तृतीया २०२३ काही महायोग आहेत:
१) आयुष्मान योग- सूर्योदय पासून सकाळी ९ वाजून २६ मिनिट पर्यन्त
२) सौभाग्य योग- २२ एप्रिल सकाळी ९ वाजून २५ मिनिट पासून ते २३ एप्रिल सकाळी ८ वाजून २१ मिनिट पर्यन्त
३) त्रिपुष्कर योग – सकाळी ५ वाजून ४९ मिनिट पासून ७ वाजून ४९ मिनिट पर्यन्त
४) रवि योग- रात्री ११ वअजून २४ मिनिट ते २३ एप्रिल ५ वाजून ४८ मिनिट पर्यन्त
५) सर्वार्थ सिद्धि योग व अमृत सिद्धि योग- रात्री ११ वाजून २४ मिनिट ते २३ एप्रिल सकाळी ५ वाजून ४८ मिनिट पर्यन्त
अक्षय तृतीया सोने खरेदीची वेळ:
२२ एप्रिल २०२३ सकाळी ७ वाजून ४९ मिनिट पासून २३ एप्रिल सकाळी ५ वाजून ४८ मिनिट पर्यन्त
२३ एप्रिल २०२३ सकाळी ५ वाजून ४८ मिनिट ते ७ वाजून ४७ मिनिट पर्यन्त
अक्षय तृतीया 2023 महत्व:
ज्योतिष शास्त्र नुसार अक्षय तृतीया ह्या दिवशी सूर्य मेष राशी मध्ये व चंद्र वृष राशि मध्ये येतो.
अक्षय तृतीया हा पूर्ण दिवस शुभ मानला जातो. ह्या दिवशी कोणते सुधा चांगले कार्य करण्यासाठी पंचांग बघायची गरज नाही. ह्या दिवशी केलेले कोणते सुद्धा शुभ कार्य वाया जात नाही. अक्षय तृतीया ह्या दिवशी लग्न कार्य, धार्मिक कार्य, गृह प्रवेश, व्यापार सुरवात, जप-तप, पूजा पाठ करण्यासाठी खूप चांगला दिवस आहे. साडेतीन मुहूर्त पैकी एक मुहूर्त मानला जातो.
हिंदू धर्मा नुसार अक्षय तृतीया ह्या दिवशी भगवान विष्णुचा सहावा अवतार म्हणजे भगवान परशुराम ह्याचा जन्म झाला होता. भगवान परशुराम हे महर्षि जमदाग्नि व माता रेनुकादेवी ह्याचे सुपुत्र होते. म्हणूनच अक्षय तृतीया ह्या दिवशी भगवान विष्णु व भगवान परशुराम ह्याची पुजा करतात.
अक्षय तृतीया ह्या दिवशी पुढील मंत्र म्हणावा:
“ॐ ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद महालक्ष्मयै नम:”
हा मंत्र 108 वेळा म्हणावा. मग माता लक्ष्मीची आरती म्हणावी व संध्याकाळी दाग दागिने परत कपाटात ठेवावी.