ट्रिक-ट्रिक्स घरात नाही राहणार एक सुद्धा कॉकरोज (झुरळ) सोपे घरगुती उपाय
आपण रोज किचनची साफ सफाई करतो तरी सुद्धा काही भागात झुरळ येतातच. बरेच लोकांना घरात व किचनमध्ये कॉकरोज पासून छुटकारा पाहिजे असतो. कॉकरोज आपले जेवण खराब करू शकतात व त्यामुळे आपल्या घरातील व्यक्तीचे आरोग्य धोक्यात येते. कारण की किचनमध्ये सर्वात जास्त कॉकरोज होतात.
The text How to get rid of cockroachesi n Marathi be seen on our You tube ChanelHow to get rid of cockroaches
कॉकरोज पासून छुटकारा मिळण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धती आवलंबत असतो. त्यासाठी आपण महागडी पेस्टीसाइड विकत आणत असतो. तरी पण त्याचा काही फायदा होत नाही.
आपण काही ट्रिक्स व टिप्स बघणार आहोत.
१. लवंगचा वापर करा:
प्रतेक घरात स्वयंपाक करताना लवंग वापरले जाते. कॉकरोज पळवून लावण्यासाठी लवंगचा वापर करू शकता. लवंगचा सुगंध खूप स्ट्रॉन असतो. म्हणून त्याच्या वासानी कॉकरोज पळून जातात. घरात जेथ आपल्याला कॉकरोज जास्त प्रमाणात दिसतात तेथे २-३ लवंग ठेवा त्याच्या वासानी टे लगेच पळून जातील.
2. केरोसिन म्हणजेच रॉकेलचा चांगला ऑप्शन:
खर म्हणजे घरात आपण केरोसिनचा वापर करत नाही. पण कॉकरोजना पळवून लावण्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे.
आपल्याला घरात जेथे कुठे कॉकरोज जास्त प्रमाणात दिसत असतील तेथे केरोसिनचा स्प्रे मारा. काही काळ केरोसिनचा वास आल्याने कॉकरोज पळून जातील. पण स्वयंपाक घरात केरोसिन वापरताना त्यामध्ये थोडे पाणी वापरा. व त्या ठिकाणी मुलांना जावू देवू नका.
३) घरात कुठे भेगा पडल्या असतील तर त्या भरा:
घरात जर कुठे भेगा असतील तर त्यामध्ये कॉकरोज किंवा किडे जाऊन बसतात. फरशीवर किंवा किचन सिंक मध्ये भेगा असतील तर त्या ठिकाणी व्हाईट सीमेंट भरा. कारणकी भेगामध्ये झुरळ लपून बसतात व अंडी देतात. जर भेगा नसतील तर झुरळ होणार नाहीत व ते आपोआप कमी होतील.
४) तेज पत्ता म्हणजेच तमालपत्रचा वापर:
तमालपत्रचे छोटे छोटे तुकडे करून वेगळ्या कोपऱ्यामद्धे ठेवा. त्याच्या वासानी झुरळ पळून जातात. किंवा पुदिनाची पान सुद्धा ठेवू शकता. किंवा ह्या दोन्ही पानांना एकत्र करून सुद्धा ठेवू शकता.
५) कडूलिंबाचे तेल पण फायदेशीर आहे:
कडूलिंबाच्या तेला पासून लिक्विड बनवू शकता त्यामुळे कॉकरोज पळून जातील.
एक कप पाण्यामध्ये कडूलिंबाचे तेल घेऊन काही थेंब मिक्स करून एक स्प्रे बॉटलमध्ये भरून स्प्रे करा. त्याने ते पळून जातील.
६. बेकिंग सोडा:
बेकिंग सोडा वापरुन लवकर कॉकरोजना पळवून लावू शकतो. आपल्याला बेकिंग सोडामध्ये साखर मिक्स करून कॉकरोज जेथे आहेत तेथे ठेवावे. म्हणजेच किचनमध्ये.
७. बोरीक पावडर:
२ चमचे बोरीक पावडर व २ चमचे अरारुट पावडर किंवा मैदा थोडेसे पाणी मिक्स करून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवा वरतून थोडीशी साखर लावा. व त्यागोळ्या किचनमधील कपाटांमद्धे ठेवा. त्यामुळे कॉकरोज त्या गोळ्या खाऊन मरतील. पण ह्या गोळ्या लहान मुलांच्या हाताला येणार नाहीत अश्या ठिकाणी ठेवा.
८. २-३ सुगंधी आगरबत्ती घेऊन त्याचे वरचे आवरण काढून एका बाउलमध्ये ठेवा. मग त्यामध्ये थोडा कापुर घेऊन कुटून घ्या. त्यामध्ये थोडे पाणी मिक्स करून १ तास तसेच ठेवा मग एका स्प्रे बॉटलमध्ये भरून त्याचा स्प्रे मारा त्याच्या वासानी कॉकरोज पळून जातील.