5 मे शुक्रवार २०२३ चंद्र ग्रहण वेळ, काय करावे व काय करू नये संपूर्ण माहिती व मंत्र
पंचांग नुसार १३० वर्षा नंतर बुद्ध पूर्णिमा ह्या दिवशी चंद्र ग्रहण सुरू होणार आहे. २०२३ ह्या वर्षा मधील पहिले चंद्र ग्रहण आहे. त्याचा असर बऱ्याच देशांवर होणार आहे.
The text Chandra Grahan 2023 Kay Karave V Kay Karu Naye ka Mantra in Marathi be seen on our You tube Chanel Chandra Grahan 2023
चंद्र ग्रहण ला खगोलीय घटना मानली जाते पण धार्मिक दृष्ट्या त्याचे महत्व वेगळे आहे.
चंद्र ग्रहण काळ:
५ मे शुक्रवार २०२३ ह्या दिवशी रात्री ८ वाजून ४५ मिनिट ला ग्रहण सुरू होत असून रात्री १ वाजता समाप्त होणार आहे. चंद्र ग्रहण कालावधी ४ तास १५ मिनिट आहे.
चंद्र ग्रहण मध्ये राहूच्या अशुभ प्रभावा पासून कसे वाचावे:
चंद्र ग्रहण च्या काळात राहूच अशुभ छाया चंद्रावर पडते त्यामुळे तो दूषित होतो म त्याचा परिणाम आपल्या मानसिक स्थितिवर पडतो. व्यक्ति कोणते सुद्धा निर्णय घ्यायला सक्षम नसतात मग झोप न येण्याच्या समस्या सुरू होतात म्हणूनच चंद्र ग्रहण मध्ये घराच्या बाहेर पडण्यास मनाई असते. चंद्र ग्रहण मध्ये कुंडली मधील चंद्र हा ग्रह मजबूत करण्यासाठी शिवजिनचा महामृत्युंजय मंत्र चा जाप करा त्यामुळे अशुभ प्रभाव कमी होईल.
महामृत्युंजय मंत्र:
ऊँ त्र्यंबकम् यजामहे सुगंधिम् पुष्टिवर्द्धनम्,
ऊर्वारुकमिव बंधनात, मृत्योर्मुक्षियमामृतात्।।
चंद्र ग्रहणमध्ये काय करू नये:
* चंद्र ग्रहणचे सूतक चालू झालेकी काही विशेष काम करताना सावधानी ठेवली पाहिजे. तसेच कोणते सुद्धा शुभ कार्य किंवा काम केले नाही पाहिजे.
* चंद्र ग्रहणच्या काळात कोणती सुद्धा खरेदी केली नाही पाहिजे.
* चंद्र ग्रहण चालू असताना स्वयंपाक नाही केला पाहिजे तसेच जेवण सुद्धा केले नाही पाहिजे.
* चंद्र ग्रहणच्या सूतक काळामध्ये पूजा-पाठ किंवा धार्मिक कार्य करणे अशुभ मानले जाते.
* चंद्र ग्रहण चालू असताना झोपता कामा नये.
खास करून गर्भवती महिलांनी चंद्र ग्रहण काळात घराच्या बाहेर पडता कामा नये. तसेच टोकदार वस्तु किंवा सूरीचा वापर करता कामा नये.
चंद्र ग्रहण काळात ही कामे करावी:
* चंद्र ग्रहण काळात धार्मिक मंत्र जाप करा व त्याच बरोबर देवाचे नामस्मरण करा. आपण गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र किंवा अजून कोणते सुद्धा मंत्र जाप करू शकता.
* चंद्र ग्रहण काळात शिव चालीसाचे वाचन करा. त्यामुळे ग्रहण काळाचा दुष्प्रभाव पडणार नाही.
* चंद्र ग्रहण सुरू होण्याच्या अगोदरच पूजा घरावर पडदा घालून झाकून ठेवा. चंद्र ग्रहण संपल्यावर पडदा काढून गंगाजल शिंपडा.
* चंद्र ग्रहण सुरू होण्याच्या अगोदरच खाद्य पदार्थवर तुळशी पत्र ठेवा. पण तुळशी पत्र ग्रहण काळ सुरू होण्याच्या अगोदरच तोडून ठेवा.
* चंद्र ग्रहणच्या दिवशी जरूरत मंदना दान करा.
* चंद्र ग्रहण समाप्त झाल्यावर तांदूळ, दूध, पांढरे वस्त्र, पांढरी मिठाई, दही, दान केल्याने कुंडली मधील चंद्र दोष दूर होतो.