19 मे शनि जयंती २०२३ शुभ मुहूर्त, पूजाविधी, उपाय व मंत्र
आज १९ मे २०२३ शुक्रवार ह्या दिवशी अमावस्या आहे तसेच आज शनि जयंती सुद्धा आहे. भगवान शनि ह्यांना ज्योतिष शास्त्रामध्ये न्याय व कर्मफलदाता मानले जाते/ दरवर्षी जेष्ठ अमावस्या ह्या तिथीला शनि जन्मउत्सव जोरात साजरा केला जातो.
असे म्हणतात की ज्यांच्या वर शनि देवाची अशुभ छाया पडते त्यांना जीवनात बऱ्याच परेशानी सोसाव्या लागतात. ज्यांच्या कुंडली मध्ये शनि दोष आहे व त्यापासून मुक्ती मिळण्यासाठी त्यांनी शनि देवाची पूजा अर्चा केली पाहिजे. ह्या वर्षी शनि जयंतीच्या दिवशी चांगला शुभ योग आहे. त्यामुळे ह्या दिवशी शुभ मुहूर्त वर पूजा अर्चा व मंत्र जाप केला पाहिजे.
शनि जयंती शुभ मुहूर्त २०२३
अमावस्या प्रारंभ १८ मे रात्री ९ वाजून ४२ मिनिट ते
अमावस्या समाप्ती १९ मे ९ वाजून २२ मिनिट पर्यन्त
शनि जयंती च्या दिवशी पूजा कशी करायची:
शनि देवाची पूजा अमावस्या तिथीला करणे महत्वाचे मानले जाते. जेष्ट अमावस्या तिथीला भगवान शनि ह्यांचा जन्म झाला होता. ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान सूर्य देवना जल अर्पित करा. मग आपल्या घरा जवळील शनि मंदिरात जाऊन भगवान शनिची पूजा करा. पूजा मध्ये शनि देवांना मोहरीच्या तेलानी अभिषेक करा. मग अत्तर, गुलाब फूल,निळ्या रंगाचे फूल व काळे तीळ अर्पित करा. मग तेलाचा दिवा लाऊन शनि चालीसा मंत्र म्हणून मंत्र जाप करून शनि देवाची आरती म्हणा.
शनि देवांना प्रसन्न करण्यासाठी उपाय:
शास्त्रा मध्ये पिपळच्या झाडामध्ये शनि देवाचा वास असतो असे म्हणतात. कुंडली मधील शनि दोष काढण्यासाठी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पित करा तेलाचा दिवा लावा व पुढे दिलेला मंत्र म्हणा. शनि देवाच्या बरोबर हनुमानजीनची सुद्धा पूजा करा.
मंत्र :
ॐ प्रां प्रीं प्रौं स: शनैश्चराय नम:
शनि गायत्री मंत्र
ॐ शनैश्चराय विदमहे छायापुत्राय धीमहि||