२ चमचे तेलात हेल्दि पौष्टिक मुगाच्या डाळीचे व्हेज आप्पे मुलांसाठी
आपण ह्या अगोदर सर्व डाळीचे आप्पे कसे बनवायचे ते पहिले. अप्पे मुलांना किंवा मोठ्या माणसांना सुद्धा आवडतात. आता मुलांना सुट्ट्या आहेत. तर मग रोज काही तरी निराळे पाहिजे पण हेल्दि सुद्धा पाहिजे.
The text Healthy Crispy Moong Dal Aape For Kids in Marathi be seen on our You tube Chanel Healthy Crispy Moong Dal Aape For Kids
आज आपण मुगाच्या डाळीचे आप्पे कसे बनवायचे ते पाहू या. मुगाची डाळ पचायला हलकी असते व ती पौष्टिक सुद्धा असते ते आपल्याला माहीत आहेच. आप्पे बनवताना आपण त्यामध्ये गाजर व कोबी घतला आहे त्यामुळे ते अजून पौष्टिक झाले आहेत. तसेच आपण अगदी कमीत कमी तेलात हा नाश्ता बनवला आहे.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: १८-२० बनतात
साहित्य:
२ कप मुगाची डाळ
३-४ हिरव्या मिरच्या (चिरून)
१/२” आले तुकडा (चिरून)
१ छोटा कांदा (बारीक चिरून)
१ छोटेसे गाजर (बारीक चिरून किंवा किसून)
२ टे स्पून कोबी (बारीक चिरून)
२ टे स्पून कोथिंबीर (बारीक चिरून)
१/४ टी स्पून हळद
मीठ चवीने
तेल आप्पे फ्राय करण्यासाठी
कृती:
प्रथम मुगाची डाळ स्वच्छ धुवून पाणी घालून ३-४ तास भिजत ठेवा. गाजर, कोबी व कोथिंबीर धुवून चिरून घ्या. हिरवी मिरची आले धुवून चिरून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात मुगाची डाळ, हिरवी मिरची व मीठ घालून थोडेसे पाणी घालून वाटुन घ्या.
एका बाउल मध्ये वाटलेली डाळ, गाजर, कोबी, कोथिंबीर, हळद घालून मिक्स करून घ्या.
आप्पे पत्राला तेल लाऊन गरम करून घ्या. मग त्यामध्ये १-१ टे स्पून मिश्रण घालून थोडेसे बाजूने तेल घालून २ मिनिट झाकण ठेवा. मग झाकण काढून आप्पे उलट करून परत २-३ मिनिट फ्राय करून घ्या.
आता गरम गरम आप्पे चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.