3 जून २०२३ शनिवार वट सावित्री व्रत तिथी मुहूर्त महत्व कथा व पूजाविधी
वट सावित्री व्रत महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात. ही व्रत केल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्या पासून मुक्ती मिळते. ही व्रत जेष्ठ पूर्णिमा ह्या दिवशी ठेवतात. आता आपण पाहू या वट पूर्णिमा व्रत तारीख, महत्व, मुहूर्त व पूजाविधी काय आहे.
वट पोर्णिमा ह्या वर्षी हिंदू पंचांग नुसार जेष्ठ महिन्यात ३ जून 202३ शनिवार ह्या दिवशी आहे. ह्या दिवशी वटपोर्णिमा म्हणून साजरी करायची आहे. म्हणजेच महिला ह्या दिवशी वटपोर्णिमा ह्या नावाचे व्रत करतात. वटपोर्णिमाचे व्रत लग्न म्हणजेच विवाहित महिलाच करतात.
पूर्वीच्या काळा पासून असे म्हंटले जाते की वड, पिंपळ ही निसर्गहताच दिर्घौयुषी वृक्ष आहेत त्यामुळे त्याचे जतन व्हावे म्हणून त्याची पूजा करतात. वड व पिंपळ हे वृक्ष पवित्र मानतात.
वट पूर्णिमा व वट सावित्री व्रत 2023 पूजा मुहूर्त :
३ जून 20२३ शनिवार
शुभ मुहूर्त सकाळी ६ वाजून १५ मिनिट ते ११ वाजून १७ मिनिट
पूर्णिमा प्रारंभ ३ जून २०२३ सकाळी ११ वाजून १७ मिनिट
पूर्णिमा समाप्ती ४ जून २०२३ ९ वाजून ११ मिनिट
वट सावित्री व्रत:
वट पोर्णिमा ह्या दिवशी उपवास करावा. ह्या दिवशी सावित्री सह ब्रह्मदेवाची पूजा करावी. ह्या दिवशी नदी काठची वाळू घरी आणून त्यावर सत्यवान सावित्रीची प्रतीमा ठेवावी. पूजा अर्चा करून संध्याकाळी इतर सुवासीनि सोबत सावित्रीची पूजा करून कथा आईकावी.
सावित्रीने गुणसंपन्न अश्या वरची निवड करून आपले वडीलधारे व देवा दिकांचा विरोध पत्करून लग्नाची गाठ बांधली व आपल्या पतीचे प्राण वाचवण्याचे अगदी अवघड काम चिकाटीने, दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि चातुर्याने करून दाखवले.
वट पोर्णिमा ह्या दिवशी वडाच्याच वृक्षाची पूजा का करायची कारण की पर्यावरण च्या हेतूने वडाचे महत्व अनन्य साधारण आहे. व त्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे.
प्रार्थना:
आपल्याला माहीत असेलच की वट वृक्षचे आयुष्य अधिक असून त्याच्या पारंब्याचा विस्तार सुद्धा खूप मोठा आहे. अश्याच वृक्षा सारखे मला व माझ्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे व आपल्या मुलाच जीवन आनंदी होवून त्याचा चांगला विस्तार होऊ दे अशी प्रार्थना करतात.
वट सावित्री हा दिवस का मानायचा?
असे म्हणतात की ह्या दिवशी सावित्रीने आपले पती सत्यभामा ह्याचे प्राण यमराज कडून परत आणले होते. म्हणूनच ह्या दिवसापासून सती सावित्री म्हणतात. ह्या दिवसाचे महत्व प्रतेक विवाहित स्त्रीच्या जीवनात आहे. हे व्रत आपल्या पतीचे आयुष सुख समृद्धी व उदंड ठेवण्यासाठी करतात. तसेच असे म्हणतात की ह्या दिवशी उपवास केल्याने आयुष्यामध्ये येणार्रे प्रतेक संकट व दुख दूर होतात. त्यामुळे घरात सुख संपती शांति राहून आपल्या कुटुंबाचा विकास होतो.
वट सावित्री व वट पूर्णिमा व्रत महत्त्व:
वट ह्याचा अर्थ वडाचे झाड असा होतो. वडाचे झाड हे खूप मोठे असते त्याचा विस्तार सुद्धा खूप मोठा असतो. आपल्या पुराणात म्हटले आहे की वडाच्या वृक्षामध्ये ब्रम्हा, विष्णु व् महेश ह्याचा वास आहे. ह्या वृक्षाच्या जडामध्ये ब्रह्म देव ह्याचा वास आहे. तर वृक्षाच्या मधील बाजूस विष्णु भगवान ह्याचे वास्तव्य आहे. व वरील भागात शिव भगवान ह्याचा वास आहे. त्यामुळे ह्या वृक्षाच्या खाली बसून पुजा केल्याने आपल्या सार्या मनोकामना पूर्ण होतात.
वट सावित्री व वट पूर्णिमा व्रत कथा:
अश्वपति ह्या नावाचा सच्चा ईमानदार राजा होता, त्याचा आयूषामध्ये सर्व प्रकारचे ऐशोआराम सुख शांति होती. फक्त त्याला एकच दुख होते त्याला कोणी आपत्य नव्हते. राजाला एक आपत्य पाहिजे होते. त्यासाठी त्यांना देवी सावित्रीची आराधना करायला संगितले ती सर्व मनोकामना पूर्ण करील. आपत्य होण्यासाठी त्यांनी पूर्ण 18 वर्ष घोर तापशर्या केली तेव्हा देवी सावित्री राजाच्या जवळ येवून एका मुलीचे वरदान दिले व नंतर तिचे नाव सावित्री ठेवण्यात आले.
सावित्री हळू हळू वयात यायला लागली व जेव्हा ती युवावस्था मध्ये आली तेव्हा तिने स्वताहून आपल्या आयूषाच्या जोडीदाराचा शोध घेवू लागली. तेव्हा तिला सत्यभामा ह्यांच्याशी भेट झाली पण सत्यभामा ह्यांच्या कुंडली नुसार त्यांचे जीवन अधीक काळ नव्हते. त्यामध्ये त्यांचा मृत्यू एक वर्षात होणार असे लिखित होते.
एके दिवशी सावित्री आपल्या पती समवेत वडाच्या वृक्षाखाली बसली होती व सत्यभामानि त्याचे डोके सावित्रीच्या मंदीवर ठेवले होते. तेव्हाच यमलोकचे राजा यमराज हे आपल्या एका सेवकला पाठवतात तेव्हा सावित्री आपल्या पतीचे प्राण देण्यास नकार देते. यमराज बर्याच सेवकांना पाठवतात पण सावित्री आपले पतीचे प्राण द्यायला नकार करते. शेवटी स्वतः यमराज सावित्री जवळ येवून सत्यभामाचे प्राण मागतात.
सावित्रीने सत्यभामाचे प्राण देण्यास नकार दिल्यावर तेव्हा यमराज ह्यांनी सावित्रीला वरदान मागायला संगितले. तेव्हा सावित्री आपल्या सासू सासर्यांची सुख शांति मागते. यमराज सुखशांति देतात तरी पण सावित्री सत्यभामाचे प्राण देण्यास माना करते. मग तिने आपल्या आई वडिलांसाठी सुख शांति मागते. यमराज ते सुद्धा देतात. तेव्हा सावित्री यमराजच्या बरोबर तशीच चालत राहते. मग ती यमराज ह्यांच्या कक्षात जाते तेव्हा यमराज शेवटचा वर मागायला सांगतात तेव्हा सावित्री पुत्र प्राप्तीची मागणी करते. पण ती ह्या मागणीसाठी खूप शीताफीने यमराज ह्यांच्या कडे मागणी करते.
यमराज हे सावित्रीची आपल्या प्रती निष्ठा व प्रेम पाहून समजून जातात व खुश होवून सत्यभामा चे प्राण परत त्याच्या शरीरात सोडतात. ह्यामुळेच सर्वजण सती सावित्री ह्या नावांनी ओळखले जातात. म्हणून ह्या दिवशी वट सावित्री हा सण मानला जातो.
वट सावित्री व वट पूर्णिमा व्रत पूजा विधि:
वट पूर्णिमा ह्या दिवशी स्त्रीया देवी सावित्रीची पूजा करतात. ह्या दिवशी पूजा करण्यासाठी स्त्रीया सकाळी लवकर उठून स्नान करून नवीन कपडे घालून व अलंकार घालतात.
खर म्हणजे तीन दिवस उपवास करतात पण ते शक्य नसल्यामुळे फक्त वट पोर्णिमा ह्या दिवशी उपवास केला तरी चालतो. पूर्ण दिवस उपवास करून संध्याकाळी पुजा अर्चा करून उपवास सोडावा.
वट सावित्रीची पुजा वडाच्या वृक्षाखाली करतात. जेथे बसून पूजा करायची आहे तेथील जागा स्वछ करून त्यावर पुजीची थाळी ठेवावी.
मग सत्यवान व सावित्रीची प्रतिमा वट वृक्षाच्या जवळ ठेऊन लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे. मग एका परडीत सात प्रकारचे धान्य किंवा खाण्याच्या वस्तु फळ ठेवून झाकून ठेवतात,
दुसर्या एका परडीत सावित्रीची प्रतिमा ठेवून धूप, दिवा, हळद कुंकू अक्षता धागा ठेवतात.
मग वट वृक्ष ला पानी वाहून हळद-कुकु अक्षता वाहतात. त्याच बरोबर देवी सावित्रीची पूजा करतात. मग त्यांना चटईच्या पंख्यानी हवा देतात. मग एक वट वृक्षाचे पान आपल्या वेणीमध्ये माळतात. त्या नंतर निर्मळ मनानी प्रार्थना करतात तेव्हा 7 वेळा वट वृक्षाला हातात धागा घेवून वृक्षाभोवती प्रदक्षीणा मारतता. मग सत्यवान सावित्रीची कथा आईकतात, कथा झाल्यावर चणे व गूळचा प्रसाद दिला जातो.
घरी आल्यावर जेष्ठ लोकांचे पाय धरून आशीर्वाद घेतात. गोड अन्न सेवन करून उपवास सोडतात.