चटपटीत पानीवाले पकोडे एकदा खाऊन बघाच खातच रहाल
आपण पाणी पुरी ही डिश लोकप्रिय व सर्वाना आवडणारी आहे. पण पाणी पकोडे ही डिश आपण आईकली आहे का? अरे फार मस्त टेस्टि लागते करून पहा.
पाणी पकोडे बनवताना मस्त पैकी आपण आपण पाणी पुरी सारखे पाणी बनवून घ्यायचे पाणी थोडे थंडगार घ्यायचे त्यामुळे त्याचा स्वाद निराळाच लागतो.
The text Chatpate Pani Wale Pakode New Tempting Recipe in Marathi be seen on our You tube Chanel Chatpate Pani Wale Pakode New Tempting Recipe
आपल्या कडे पाहुणे आले तर अश्या प्रकारची डिश बनवा सर्व आवडीने खातील व आपल्या डिश ची तारीफ सुद्धा करतील.
पाणी बनवताना त्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, आल-हिरवी मिरची, काळे मीठ, लिंबू, चिंचेची गोड चटणी वापरली आहे. ही पाणी नुसते पिले तरी मस्त लागते त्यामुळे आपली पचन शक्ति सुद्धा चांगली होते.
पकोडे बनवताना आपण मुगाची डाळ वापरली आहे. मूग आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगले आहेत.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
पकोडे बनवण्यासाठी:
2 कप मूग डाळ
1/2 टी स्पून ओवा
1 टी स्पून लाल मिरची पावडर
3-4 हिरव्या मिरच्या
2 टे स्पून कोथिंबीर (चिरून)
मीठ चवीने
तेल पकोडे तळण्यासाठी
पाणी बनवण्यासाठी:
3-4 कप पाणी
1/2 कप कोथिंबीर
1/4 कप पुदिना पाने
1 टी स्पून आले (चिरून)
2-3 हिरव्या मिरच्या
1 टी स्पून काश्मिरी लाल मिरची
1 टी स्पून धने-जिरे पावडर
2-3 टे स्पून चिंचेची गोड चटणी
1 टे स्पून लिंबुरस
1/2 टी स्पून काळे मीठ
1 चिमूट हिंग
मीठ चवीने
कृती:
पकोडे बनवण्यासाठी: मुगाची डाळ स्वच्छ धुवून पाण्यात 3-4 तास भिजत ठेवा. मग पाणी काढून मिक्सरच्या जार मध्ये घेऊन बारीक वाटा पाणी घालायची जरूरत नाही लागलेच तर फक्त 2-3 टी स्पून घालून शकता. कारणकी मिश्रण पातळ होता कामा नये. मग मिश्रण एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या बारीक चरून घाला, कोथिंबीर धुवून बारीक चिरून घाला, लाल मिरची पावडर, ओवा व मीठ घालून चांगले मिक्स करून बाजूला ठेवा.
पाणी बनवण्यासाठी: कोथिंबीर, पुदिना, आले व हिरवी मिरची धुवून मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यामध्ये 1 कप थंड पाणी घालून ग्राइंड करून घ्या. मग मिश्रण एका बाउल मध्ये काढून घ्या. मग त्यामध्ये चिंचेची गोड चटणी, लिंबुरस, काळे मीठ, मीठ, धने-जिरे पावडर, काश्मिरी मिरची पावडर, हिंग 2 1-2 कप थंड पाणी घालून मिक्स करून घ्या.
पकोडे तळण्यासाठी तेल गरम करून त्यामध्ये चमच्याने छोटे छोटे पकोडे घालून छान गुलाबी रंगावर तळून घ्या. पकोडे तळून झालेकी थंड झाल्यावर आपण बनवलेल्या पाण्यामध्ये घालून कांद्याच्या गोल गोल चकत्या कापून त्याने सजवा. मग सर्व्ह करा.