नागपुरी स्टाइल झणझणीत डाळ कांदा रेसीपी
विदर्भ म्हटले की डोळ्या समोर झणझणीत चमचमीत भाज्या, आमट्या डोळ्या समोर येतात. ह्या अगोदर आपण विदर्भ मधील पाटवडी रस्सा कसा बनवायचा ते पाहिले. आता आपण डाळ-कांदा ही रेसीपी कशी बनवायची ते पाहू या.
डाळ कांदा ही रेसीपी नागपूर ह्या भागात खूप लोकप्रिय आहे. घरात कधी भाजी नसली तर आपण डाळ कांदा बनवू शकतो मस्त टेस्टि व झणझणीत लागतो. बनवायला सुद्धा खूप सोपा आहे व झटपट होणारा आहे.
The text Nagpur Style Spicy Dal-Kanda Recipe in Marathi be seen on our You tube Chanel Nagpur Style Spicy Dal-Kanda
डाळ कांदा बनवताना चनाडाळ भिजत घालून बनवला आहे. आपण चपाती किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
1 वाटी चणाडाळ
1 मध्यम आकाराचा कांदा
1 टे स्पून आल-लसूण पेस्ट
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून काळा मसाला
1/4 टी स्पून हळद
2 टे स्पून कोथिंबीर
मीठ चवीने
फोडणीसाठी:
2 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
4 लवंग
1” दालचीनी
1 तमालपत्र
कृती: प्रथम चनाडाळ धुवून पाण्यात 3-4 तास भिजत ठेवा. कांदा चिरून घ्या. कोथिंबीर धुवून चिरून घ्या.
एक कढई घेऊन त्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, लवंग, दालचीनी, तमालपत्र घालून चिरलेला कांदा घालून थोडा गुलाबी रंगावर परतून घ्या. मग त्यामध्ये आल-लसूण घालून परतून घ्या.
आता त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, मीठ घालून भिजवलेली डाळ, थोडी कोथिंबीर घालून 2 वाट्या पाणी घालून झाकण ठेवून 12-15 मिनिट मंद विस्तवावर डाळ शिजवून घ्या.
मग त्यामध्ये काळा मसाला व कोथिंबीर घालून 2 मिनिट शिजवून घ्या.
गरम गरम डाळ कांदा चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करा.