17 जुलै 2023 आषाढ दीप अमावस्या संपूर्ण माहिती
आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे आषाढ अमावस्या होय. आषाढ अमावस्यालाच दीप अमावस्या सुद्धा म्हणतात. आषाढ अमावस्या झालीकी पुढचा दिवश म्हणजे श्रवाण महिन्याची सुरवात होते. पण ह्या वर्षी अधिक महिना आल्यामुळे आषाढ श्रावण महिना आहे मग श्रावण महिना आहे. आषाढ अमावस्याच्या दिवशी घरातील सर्व दिवे छान घासून पुसून स्वच्छ करून त्याची यथासांग पूजा करतात.
The Marathi Ashad Deep Amavasya 2023 Importance, Puja Vidhi can of be seen on our YouTube Channel of Ashad Amavasya 2023
आपल्या संस्कृतीत दिव्याला खूप महत्व आहे. आपल्या घरातील इडापिडा टळावी व त्याच बरोबर अज्ञान, रोगराई दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश पसरावा त्यासाठी ह्या दिवशी दिव्यांची पूजा करायची फार पूर्वी पासून प्रथा आहे.
आषाढ अमावस्या दीप अमावास्या मुहूर्त:
१७ जुलै २०२३ सोमवार
अमावास्या आरंभः १६ जुलै २०२३ रोजी रात्रौ १० वाजून ९ मिनिटे
अमावास्या समाप्तीः १७ जुलै २०२३ रोजी अर्धरात्रौ १२ वाजून ०२ मिनिटे
आषाढ दीप अमावस्या ह्या दिवशी काय करावे:
ह्या दिवशी भगवान शिव, पार्वती, गणेश व कार्तिक स्वामींची पूजा करतात. व काही जन ह्यादिवशी व्रत सुद्धा करतात. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे.
ह्या दिवशी महिला तुळशीला किंवा पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालतात.
ह्या दिवशी पुरणाचा नेवेद्य बनवून पितरांना दाखवतात.
ह्या दिवशी पितरांना तर्पण देवून पुरणाचा नेवेद्य दाखवल्यास पितर प्रसन्न होतात व त्यांना मुक्ती मिळून आपल्याला आशीर्वाद देतात.
तसेच ह्या दिवशी पिंपळ, केळी, लिंबू, किंवा तुळशीची झाड लावण्याची प्रथा आहे. त्यामुळे ग्रहदोष दूर होतो.
ह्या दिवशी गंगा स्नान करून दान करण्याचे महत्व आहे. त्याच बरोबर माशांना पिठाच्या गोळ्या खाऊ घालायची पद्धत आहे.
दीप अमावस्या पूजा विधी:
ह्या दिवशी आपल्या घरात असणारे दिवे, समया, लामण दिवे सर्व घासून पुसून स्वच्छ करतात.
मग एका पाटावर लाल रंगाचे कापड घालून पाटा भोवती छान रंगीत रांगोळी काढावी.
पाटावर दिवे मांडून त्याच्या भोवती फुले ठेवून सजावट करावी.
मग सर्व दिव्यामद्धे कापसाची डबल वात घालून तेल घालावे व दिवे प्रज्वलित करावे.
जर आपल्याला शक्य असेल तर ओल्या मातीचे दिवे सुद्धा बनवून पूजेत ठेवावे.
काहीजणांकडे कणकेचे गोड दिवे बनवून लावण्याची सुद्धा प्रथा आहे.
दिव्याना हळद-कुंकू व अक्षता वाहून त्याची मनोभावे पूजा करावी.
मग नेवेद्य दाखवावा त्यामध्ये गोड दिवे ठेवावे.
निरांजन आरती करावी मग कहाणी आईकावी.
संध्याकाळी दिवे लावल्यावर शुभंकरोती म्हणावी व घरातील लहान मुलांना ओवाळावे. घरातील लहान मुले हे वंशाचे दिवे मानले जातात म्हणून त्यांचे औक्षण करावे.
दीप आमयावस्या साठी कणकेचे दिवे कसे बनवायचे:
साहित्य:
1 वाटी गव्हाचे पीठ
1/4 वाटी गुळ
1/4 वाटी पाणी
1/4 टी स्पून थोडे कमी कमी बेकिंग सोडा
1 टी स्पून तूप
कृती: एका बाऊल मध्ये गुळ व पाणी मिक्स करून घ्या. दुसऱ्या एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ, बेकिंग सोडा व तूप मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये हळू हळू गुळाचे पाणी घालून मिक्स करून घट्ट पीठ मळून घ्या.
आता मळलेले पीठ झाकून 30 मिनिट बाजूला ठेवा. मग त्याचे छोटे छोटे 11 गोळे बनवून घ्या. एक गोळा घेऊन त्याला बोटांनी वाटीचा आकार द्या. मग एका वरच्या बाजूला थोडेसे दाबून पणतीचा आकार द्या. अश्या प्रकारे सर्व दिवे बनवून बाजूला ठेवा.
मोदक पात्रामध्ये पाणी घालून पाणी गरम झाल्यावर त्यावरील चाळणीला थोडेसे तूप लाऊन घ्या. व त्यावर सर्व दिवे मांडून घ्या. दिवे मांडून झाल्यावर झाकण लाऊन 15 मिनिट वाफवून घ्या.
दिवे वाफवून झाल्यावर विस्तव बंद करून झाकण काढून 5 मिनिट तसेच ठेवा. मग एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्या.
दिवे थंड झाल्यावर त्यामध्ये तेलाची किंवा तुपाची वात लाऊन पूजा करा.