एकदम निराळी पद्धत अप्रतिम कांदा बटाटा रस्सा भाजी खावून बघाच
बटाटा भाजी किंवा बटाटा रस्सा सगळ्यांना आवडतो. बटाटा भाजी असली की आपण एक चपाती जास्तच खातो. आपण ह्या अगोदर बटाटा भाजी चे अनेक प्रकार बघितले.
आज आपण बटाटा रस्सा भाजीचा अगदी नवीन प्रकार पहाणार आहोत. आपल्या घरी अचानक पाहुणे आले तर अश्या प्रकारची रस्सा भाजी बनवा सगळे आवडीने खातील. भाजी बनवताना कांद्याचे वाटण करायची गरज नाही. तसेच ह्या मध्ये आखा लसूण वापरला आहे त्यामुळे निराळी टेस्ट येते. तसेच अंबाटपणा साठी टोमॅटो किंवा लिंबू वापरले नाही तर लोणच्याचा खार व कैरीचे लोणचे वापरले आहे.
The text Kanda Batata Rassa Bhaji in Marathi be seen on our You tube Chanel Kanda Batata Rassa Bhaji
बटाटा रस्सा भाजी आपण डायरेक्ट कुकर मध्ये बनवणार आहोत. बटाटा रस्सा आपण पराठा, चपाती किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
4 मध्यम आकाराचे बटाटा
2 मध्यम आकाराचे कांदे
2 टे स्पून तेल
खडा मसाला (लवंग, दालचीनी,मिरे, चक्रफूल,तमालपत्र)
7-8 लसूण पाकळ्या
2 हिरव्या मिरच्या
1/2 टी स्पून हळद
2 टी स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
1″ आल (किसून)
1/2 टी स्पून बडीशेप
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1 टी स्पून कसूरी मेथी
1 टी स्पून गरम मसाला
1 लसूण कांड
1 टी स्पून आंब्याचे लोणचे
1 टी स्पून लोणचे खार
मीठ चवीने
कृती: प्रथम कांदे सोलून उभे पातळ चिरून घ्या. बटाटे सोलून त्याचे मोठे तुकडे करून पाण्यात घालून ठेवा. लसूण सोलून घ्या. आल किसून घ्या.
कुकरमध्ये 3 टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये खडा मसाला घालून मग हिरव्या मिरच्या, चिरलेला कांदा व अखा सोललेला लसूण घालून 2 मिनिट परतून घ्या. आता चवीने मीठ, हळद व लाल मिरची पावडर घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये आले किसून घाला मिक्स करून कुकरचे झाकण लावून 2 शिट्या काढा.
कुकरचे झाकण काढून त्यामध्ये चिरलेले बटाटे घाला, बडीशेप, हळद, लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर घालून मिक्स करून थोडेसे मीठ घाला आता बटाटे थोडे परतून घ्या. मग त्यामध्ये कसूरी मेथी, गरम मसाला व एक अखा लसूण घाला. मग कैरीची लोणचे व लोणचे खार घालून मिक्स करून थोडे पाणी घालून 2 शिट्या काढा.
बटाटा रस्सा चपाती, पराठा किंवा भाकरी बरोबर गरम गरम सर्व्ह करा.