चविष्ट मसालेदार कारली भरून भाजी अगदी निराळी पद्धत रेसीपी
कारल्याची भाजी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. असे म्हणतात कारले साखरेत घोळा किंवा तुपात ते कडुच लागते. पण तसे नाही उलट कारल्याची भाजी सेवन केल्यावर तोंडाला खूप छान चव येते.
आपण ह्या अगोदर करल्याचे लोणचे कसे बनवायचे ते पहिले.
आता आपण कारली भरून कशी बनवायची ते पण ग्रेव्ही सारखी ते पाहूया.
The text Tasty Karlyachi Stuffed Bhaji Gravy | Bitter Gourd Curry i in Marathi be seen on our You tube Chanel Tasty Karlyachi Stuffed Bhaji Gravy | Bitter Gourd Curry
स्टफ कारली बनवताना त्यामध्ये शेगदाणे, तीळ, भरून केली केली आहेत खूप टेस्टि लागतात करून पहा.
बनवण्याससाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 2 जणसाठी
साहित्य:
1 मोठ्या आकाराचे कारले
मसाला करिता:
1/4 कप कोथिंबीर
2 टे स्पून शेगदाणे भाजून सोलून
4-5 लसूण पाकळ्या
1/2” आले तुकडा
2 छोट्या हिरव्या मिरच्या
1 टे स्पून तीळ
2 चिमूट मीठ
2 टे स्पून तेल
1/4 टी स्पून हिंग
1 1/2 टी स्पून लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून धने-जिरे पावडर
2 टे स्पून चिंच कोळ
2 टे स्पून गूळ (चिरून)
1 वाटी गरम पाणी
साहित्य: प्रथम शेगदाणे भाजून सोलून घ्या. लसूण सोलून घ्या. चिंच कोळ काढून घ्या. गूळ चिरून घ्या.
कार्ल धुवून त्याची टोके कापून टाका. मग कारल्याचा वरचा भाग खरवडून घ्या व करल्याचे 1” चे तुकडे करून त्याचा आतील बियांचा भाग काढून टाका.
मिक्सरच्या जार मध्ये शेगदाणे, लसूण, आल, कोथिंबीर, तीळ व हिरवी मिरची पानी न टाकता जाडसर वाटून घ्या. हा मसाला कारल्या मध्ये भरून बाजूला ठेवा.
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग घालून करल्याच्या भरलेल्या फोडी घालून पॅनवर झाकण ठेवून मंद विस्तवावर 5 मिनिट परतून घ्या. पॅन मध्ये झाकणचे पाणी पडता कामा नये. नाहीतर कारली खमंग भाजून होणार नाहीत.
आता त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, धने-जिरे पावडर, मीठ चवीने घालून मिक्स करून 1 वाटी गरम पाणी घालून मिक्स करून झाकण ठेवून 5-7 मिनिट मंद विस्तवावर कारली शिजवून घ्या.
मग झाकण काढून चिंच व गूळ घालून मिक्स करून 5 मिनिट कारली शिजवून घ्या.
गरम गरम स्टफ कारली ग्रेव्ही चपाती किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करा.