नाग पंचमी स्पेशल पुरणाचे दिवे नेवेद्यसाठी
श्रावण महिना चालू झाला की रोज काहीना काही सणवार असतो. श्रावण महिन्यात येणारी नागपंचमी महिलांचा अगदी आवडतीचा सण आहे. ह्या दिवशी महिला नतून थटुन हातात पूजेची थाली घेऊन नाग देवाची पूजा करायला वारुळा जवळ जातात.
नागपंचमी ह्या दिवशी पुरणाचे दिवे बनवून ते लाऊन देवाला दाखवण्याची खूप जुनी परंपरा आहे.
पुरणाचे दिवे बनवण्यासाठी प्रथम पुरण बनवून घ्या. व कणिक मळून घ्या. ही दिवे दिसायला अगदी आकर्षक दिसतात. तसेच बनवायला अगदी सोपे आहेत. आज आपण पाहूया पुरणाचे दिवे कसे बनवायचे:
पुरणाचे दिवे कसे बनवायचे ह्याचा शॉर्ट विडियो येथे पहा: पुरणाचे दिवे शॉर्ट विडियो
आवरणासाठी साहित्य: 2 कप गव्हाचे पीठ, 1 टे स्पून तेल (गरम), मीठ चवीने
पुरण साहित्य: पुराण कसे बनवायचे ते पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून पहा: पुरण कसे बनवायचे
कृती: प्रथम गव्हाचे पीठ वापरुन कणिक मळून घ्या. थोडी सैलच मळावी. मग त्याचे लिंबा एव्ह्डे गोळे बनवून पुरी सारखे लाटून घ्या. त्यामध्ये 1 टे स्पून पुरण भरून गोळा बंद करून थोडा चपटा करून त्याला दिव्याचा आकार द्या. अश्या प्रकारे सर्व दिवे बनवून घ्या.
मोदक पात्रमध्ये पाणी गरम करून त्यावर चाळणी ठेवून केळीचे पान ठेवा. त्यावर बनवलेले दिवे ठेवा परत त्याच्या वर केळीचे पान ठेवा. मग झाकण ठेवून 10 मिनिट वाफवून घ्या.
मग एका प्लेटमध्ये काढून थंड झाल्यावर त्याच्या मध्ये डबल फुलवात व तूप घालून दिवे लाऊन नाग देवाला त्याने ओवाळून समोर ठेवा. मग घरातील मेंबर्स ना खायला द्या.