नाग पंचमी स्पेशल खीर व कानुले विस्मरणातील पदार्थ
श्रावण महिना आला की प्रतेक दिवसाला काहीना काही महत्व आहे. श्रावण महिना आलाकी नागपंचमी हा सण महिलांचा अगदी आवडतीचा सण होय. ह्या दिवशी महिला जरीची साडी नेसून अंगावर दाग दागिने घालून नाकात नथ घालून हातात पूजेची थाळी घेऊन वारुळा जवळ नाग देवाची पूजा करायला जातात.
नागपंचमी ह्या दिवशी विस्तवावर तवा ठेवत नाहीत. त्याची एक पौराणिक कहाणी सुद्धा आहे. ह्या दिवशी पूर्वीच्या काळा पासून कानुले बनवण्याची पद्धत आहे. कानुले खीर बरोबर सर्व्ह करतात.
खीर कशी बनवायची ह्याच्या शॉर्ट विडियो आहे त्याची लिंक पुढे दिलेली आहे तेथे क्लिक करून पाहू शकता: खीर कशी बनवायची
नागपंचमी स्पेशल खीर कानुले ह्याचा विडियो पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता: खीर कानुले कसे बनवायचे
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाफवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 8 बनतात
स्पेशल खीर साहित्य:
1/4 कप तांदूळ
1 टे तूप
1 कप दूध
3 टे स्पून साखर
2 टे स्पून ओले खोबरे (खोवून)
1 टी स्पून वेलची पावडर
ड्राय फ्रूट
कृती: प्रथम तांदूळ धुवून मग एक कप पाण्यात 30 मिनिट भिजत ठेवा. मिक्सरच्या भांड्यात तांदूळ पाण्यासकट ग्राइंड करून घ्या.
कढई मध्ये तूप गरम करून त्यामध्ये वाटलेले तांदूळ घालून उकळी आली की 1 कप दूध व 1/2 कप पाणी घालून मिक्स करून उकळी आलीकी साखर व वेलची पावडर घालून मिक्स करून घ्या. साखर विरघळलिकी त्यामध्ये ओला नारळ, ड्राय फ्रूट घालून एक उकळी आणा. आता आपली खीर तयार झाली.
कानुले साहित्य:
1 कप गव्हाचे पीठ
1 टे स्पून गूळ,
2 टी स्पून तूप
मीठ चवीने
कृती: एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ, गूळ, तूप घालून मिक्स करून पीठ मळून घ्या. आपण चपातीसाठी मळतो तसे पण थोडेसे सैल. मग 20 मिनिट झाकून बाजूला ठेवा.
आता मळलेल्या पिठाचे एक सारखे 6 गोळे बनवून घ्या. एक गोळा घेऊन त्याची पातळ चपाती लाटून घ्या.
चपाती लाटून झाल्यावर त्यावर 1 टी स्पून तूप लावून घ्या. आता चपाती मुडपून घ्या. परत एका बाजूनी मुडपलेल्या चपाती वर 1/2 टी स्पून तूप लावा. परत चपाती मुडपून त्याला त्रिकोणी आकार द्या. आपण जसे घडीची चपाती बनवतो तसे. अश्या प्रकारे सर्व चपात्या लाटून अश्या प्रकारे लाटून मुडपून घ्या.
एका चळणीला थोडेसे तूप लावून त्यावर सर्व कानुले एक एक करून ठेवा. भांड्यात पाणी चांगले गरम करून त्यावर चाळणी ठेवून त्यावर झाकण ठेवा. 25-30 मिनिट त्याला स्टीम द्या.
मग गरम गरम कानुले खीर बरोबर सर्व्ह करा.