सुंदर टेस्टि स्पेशल खवा मावा मिठाई
आपण मावा म्हणजेच खवा वापरुन नानाविध प्रकारच्या बर्फी किंवा मिठाई बनवू शकतो. बर्फी आपण सणवार किंवा वाढदिवस किंवा कोणत्या सुद्धा समारंभाला बनवू शकतो.
आपण खवा वापरुन कोणती सुद्धा मिठाई घरच्या घरी अगदी हलवाईच्या दुकाना सारखी बनवू शकतो ते पण अगदी स्वस्त व मस्त.
आज आपण अशीच एक खूप सुंदर आकर्षक मिठाई बनवणार आहोत. तसेच ती दिसायल आकर्षक व टेस्टि सुद्धा लागते. आपण कलिंगड कापल्यावर कसे सुंदर दिसते तशीच ही मिठाई सुंदर दिसते व बनवायल अगदी सोपी व झटपट होणारी आहे.
सुंदर टेस्टि स्पेशल खवा मावा मिठाई ह्याच्या विडियोची लिंक पुढे दिलेली आहे: खवा मिठाई
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 पिसेस
साहित्य:
1 कप खवा (मावा)
1/2 कप पिठीसाखर
2 टे स्पून मिल्क पावडर
1 टी स्पून विलची पावडर
2 थेंब हिरवा रंग
2थेंब लाल रंग
8-10 काळे मनुके (कट करून)
कृती: प्रथम कढई मध्ये खवा थोडा गरम करून घ्या. खवा गरम झालकी त्यामध्ये पिठीसाखर घालून मिक्स करा. प्रथम थोडे पातळ दिसेल मग घट्ट होईल. मग विस्तव बंद करून मिश्रण थंड होऊ द्या. मग त्यामध्ये मिल्क पावडर घालून मिक्स करून घ्या.
आता त्याचे 3 भाग करा एक भाग छोटा व दुसरे दोन भाग एक सारखे करा.
एक मोठा भाग घेऊन त्यामध्ये हिरवा रंग घाला, दुसऱ्या मोठ्या भाग तसाच ठेवा. मग तिसरा छोटा भागामध्ये रेड रंग घालून मिक्स करा. त्यामध्ये काळे मनुके घेऊन त्याचे तुकडे त्यामध्ये घाला.
हिरवा गोळा घेऊन त्याचे एक सारखे चार भाग करून पुरी सारखे हातानी थापुन बाजूला ठेवा. . मग पांढरा भाग घेऊन त्याचे एक सारखे चार भाग करून पुरी सारखे थापुन बाजूला ठेवा. तिसऱ्या भागाचे चार एक सारखे गोल गोळे बनवून घ्या.
आता आपण मिठाई बनवायची आहे. त्यासाठी प्रथम केशरी गोल घेऊन त्यावर पांढरी पुरी व्यवस्तीत गुंडाळा मग त्यावर हिरव्या रंगाची पुरी गुंडाळून घ्या. अश्या प्रकारे सर्व मिठाई बनवून घ्या. आता बनवलेली मिठाई अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा.
मग फ्रीज मधून मिठाई काढून मधोमध त्याचे हलकेच चार भाग करा. पण कट करताना अगदी शेवट पर्यन्त कट करू नका म्हणजे मिठाई कलिंगड सारखी सुंदर दिसते मग सर्व्ह करा.