शारदीय नवरात्री 2023 मुहूर्त तिथी कलश स्थापना नियम साहित्य विधी
शारदीय नवरात्री आश्विन महिन्याच्या शुल्क पक्ष प्रतिपदा ह्या तिथीला सुरू होत आहे.
हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्रीला खूप महत्व आहे. माता दुर्गाची उपासना ही वर्षातून 4 वेळ केली जाते. त्यामध्ये दोन गुप्त नवरात्री व एक चैत्र नवरात्री व दुसरी शारदीय नवरात्री असते.
आश्विन महिन्यातील शारदीय नवरात्री खूप धूम धडाक्यात साजरी करतात. त्याच बरोबर बऱ्याच ठिकाणी गरभा व रामलीलाचे आयोजन करतात.
15 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रीचा शुभ मुहूर्त व तिथी काय आहे ते आपण पाहू या:
शारदीय नवरात्री ह्या वर्षी 9 दिवसांची आहे. पहिल्या दिवशी घट स्थापना असून 9 दिवस देवीच्या रूपांची पूजा करायची आहे. तसेच नवरात्री मध्ये 9 दिवस उपवास सुद्धा करतात व त्याच बरोबर सर्व नियमांचे पालन करून माता दुर्गाची पूजा अर्चा करतात.
15 ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्री:
शारदीय नवरात्रीचे पर्व आश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदा ह्या तिथीला सुरू होत असून नवमी तिथीला समाप्त होत आहे. त्यानंतर दसरा साजरा केला जाणार आहे. प्रतिपदा ह्या तिथीला घट स्थापना झाल्यावर 9 दिवस अखंड ज्योत लावतात.
शारदीय नवरात्री 15 ऑक्टोबर 2023 रविवार ह्या दिवशी सुरू होत असून 23 ऑक्टोबर 2023 सोमवार ह्या दिवशी समाप्त होत असून 24 ऑक्टोबर मंगळवार ह्या दिवशी दसरा म्हणजेच विजयादशमी आहे.
आश्विन मास मधील प्रतिपदा 14 ऑक्टोबर 2023 11 वाजून 24 मिनिट पासून सुरू होत असून 15 ऑक्टोबर दुपारी 12 वाजून 32 मिनिट पर्यन्त आहे. म्हणजेच शारदीय नवरात्री 15 ऑक्टोबरला आहे.
कलश स्थापना शुभ मुहूर्त:
शारदीय नवरात्री घटस्थापना मुहूर्त 15 ऑक्टोबर रविवार 11:48 ते दुपारी 12:36 पर्यन्त आहे. कलश स्थापना शुभ मुहूर्त ह्या वर्षी 48 मिनिट आहे.
घटस्थापना तिथि – रविवार 15 ऑक्टोबर 2023
घटस्थापना मुहूर्त – सकाळी 06:30 मिनट ते 08: 47 मिनट पर्यन्त
अभिजित मुहूर्त – सकाळी 11:48 मिनट ते दुपारी 12:36 मिनट पर्यन्त
शारदीय नवरात्रि 2023 तिथी:
15 ऑक्टोबर 2023 माता शैलपुत्री पहिला दिवस प्रतिपदा तिथी
16 ऑक्टोबर 2023 -माता ब्रह्मचारिणी (दूसरा दिवस) द्वितीया तिथि
17 ऑक्टोबर 2023 – माता चंद्रघंटा (तीसरा दिवस) तृतीया तिथि
18 ऑक्टोबर 2023 – माता कुष्मांडा (चौथा दिवस) चतुर्थी तिथि
19 ऑक्टोबर 2023 – माता स्कंदमाता (पाचवा दिवस) पंचमी तिथि
20 ऑक्टोबर 2023 – माता कात्यायनी (सहावा दिवस) षष्ठी तिथि
21 ऑक्टोबर 2023 – माता कालरात्रि (सातवा दिवस) सप्तमी तिथि
22 ऑक्टोबर 2023 – माता महागौरी (आठवा दिवस) दुर्गा अष्टमी
23 ऑक्टोबर 2023 – महानवमी, (नववा दिवस) शरद नवरात्र व्रत पारण
24 ऑक्टोबर 2023 -माता दुर्गा प्रतिमा विसर्जन, दशमी तिथि (दशहरा)
कलश स्थापना नियम:
नवरात्रीमध्ये कलश स्थापनाचे विशेष महत्व असते. कलश स्थापना म्हणजेच घट स्थापना होय. नवरात्रीची सुरुवात घट स्थापनाने होते. घट स्थापना म्हणजे शक्ति देवीचे आवाहन आहे. असे म्हणतात की चुकीच्या वेळेला घट स्थापना केल्यास देवी माता क्रोधित होऊ शकते.
रात्रीच्या वेळी किंवा अमावस्याच्या दिवशी घट स्थापना करावी असे म्हणतात. घट स्थापनाचा करण्याची शुभ वेळ प्रतिपदाच्या 1/3 भाग संपल्यावर करावी असे म्हणतात.
जर काही कारणास्तव आपण ह्या काळात घट स्थापना करू शकलो नाहीतर अभिजीत मुहूर्तवर स्थापना करू शकता. प्रतेक दिवसाचा आठवा मुहूर्त अभिजीत मुहूर्त असतो असे म्हणतात. साधरणपणे हा 40 दिवसाचा असतो. पण ह्या वर्षी घट स्थापना करण्यासाठी अभिजीत मुहूर्त उपलब्ध नाही.
कलश स्थापनाचे साहित्य:
ज्योतिष शास्त्र नुसार माता दुर्गाला लाल रंग आवडतो. म्हणून लाल रंगाचे आसन आणावे. त्याच बरोबर कलश स्थापना करण्यासाठी मातीचे भांडे, जवस, माती, पाणी भरून कलश, लाल धागा, इलायची, लवंग, कपूर, रोली, सुपारी, तांदूळ, नाणी, अशोका किंवा आंब्याची 5 पाने, नारळ, चुनरी, सिंदूर, फळ-फूल, फुलांचा हार, व शृंगारचे साहित्य ई.
नवरात्रीमध्ये कलश स्थापना कशी करावी?
ज्योतिषशास्त्र मध्ये सांगितले आहे की प्रतिपदा ला सकाळी लवकर उठून स्नान करून पूजा घर स्वच्छ करून प्रथम श्री गणेश भगवान ह्यांचे नाव घेऊन माता दुर्गाचे नाव घेऊन अखंड ज्योत लावा.
कलश स्थापना करण्यासाठी मातीच्या भांड्यात (पसरट थाळी) माती घालून त्यामध्ये जवसचे बी घालून माती एक सारखी करून घ्या. मग एका तांब्याच्या तांब्यावर स्वस्तिक काढून घ्या, मग तांब्याच्या वरच्या बाजूला लाल रंगाचा धागा बांधून घ्या. मग तांब्यामद्धे पाणी भरून त्यामध्ये थोडे गंगाजल मिसळा.
मग त्यामध्ये सव्वा रुपया, सुपारी, अत्तर, व अक्षता टाका. मग कलशावर अशोका किंवा आंब्याची 5 पाने ठेवा मग एक नारळ लाल कापडात गुंडाळून लाल धाग्यानी बांधा. मग नारळ कलशावर ठेवा.
मग कलश मातीच्या भांड्याच्या मधोमध ठेवा. कलश स्थापना केल्यावर नवरात्रीच्या नऊ व्रतांचा संकल्प करतात. आपण पाहिजेतर कलश स्थापना झाल्यावर देवी मताचे नाव घेऊन अखंड ज्योत लाऊ शकता.