सर्व पितृ अमावस्या 2023 तिथी तर्पण मुहूर्त व पितृ दोष मुक्ति उपाय
Pitru Amavasya 2023 Tithi,Tarpan Muhurat, Pitra Dosh Upay
हिंदू धर्म मध्ये अमावस्या ह्या तिथीला विशेष महत्व आहे. पण पितृ पक्ष मधील तिथी ही विशेष मानली जाते.
हिंदू धर्ममध्ये पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी पितृ पक्ष हा काळ आहे. ह्या काळात पूर्वजांचे श्राद्ध व तर्पण केले जाते. पितृ पक्षचा काळ हा पूर्ण 16 दिवसाचा असतो. व सर्वात शेवटचा दिवस म्हणजे अमावस्या होय.
असे म्हणतात की पितृ पक्षमध्ये 16 दिवस लोक आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करीत असतात. त्यामुळे घरात सुख समृद्धी येते. जर समजा काही कारणा निमिताने पितृ शांती करू शकले नाही तर सर्व पित्री अमावस्या ह्या तिथीला उपाय करू शकता.
ह्या लेखाच्या विडियोची लिंक वर दिली आहे तेथे क्लिक करून विडियो आइकू शकता. जर आपल्याला हा लेख आवडला तर जरूर लाइक करा व शेयर करा: सर्व पितृ अमावस्या माहिती
सर्व पितृ अमावस्या तिथि:
ह्या वर्षी सर्व पित्री अमावस्या तिथी 14 ऑक्टोबर, शनिवार ह्या दिवशी आहे. ह्या दिवशी शुभ मुहूर्तवर तर्पण करू शकता.
सर्व पितृ अमावस्या 2023 मुहूर्त:
सर्व पितृ अमावस्या तिथि प्रारंभ: 13 ऑक्टोबर, शुक्रवार, रात्री 09 वाजून 50 मिनट पासून
सर्व पितृ अमावस्या तिथि समाप्त: 14 ऑक्टोबर, शनिवार, रात्री 11 वाजून 24 मिनट पर्यन्त
सर्व पितृ अमावस्या महत्व:
हिंदू धर्ममध्ये अमावस्या तिथीचे विशेष महत्व आहे पण पितृ पक्ष मधील अमावस्या तिथी खास असते. असे म्हणतात की जर आपल्याला आपल्या पूर्वजांची मृत्यु माहीत नसेलतर त्यांचे श्राद्ध सर्व पित्री अमावस्या ह्या तिथीला करतात.
समजा ह्या 16 दिवसांमध्ये कोणत्या कारणांमुळे तर्पण देणे शक्य झाले नाहीतर सर्व पित्री अमावस्या ह्या तिथीला तर्पण दिल्यास घरात नेहमी शांती राहते. पितरांना तर्पण देताना त्यांच्या आवडीचे भोजन करावे व गाय व कावळ्याला सुद्धा भोजन द्यावे. असे म्हणतात की ह्या दिवशी श्राद्ध केल्याने पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो.
सर्व पितृ अमावस्या ह्या दिवशी करा हे उपाय:
1)जर पूर्ण पितृ पक्षमध्ये आपण पाण्यानी तर्पण करू शकले नाही तर पितृ पक्ष अमावस्या ह्या तिथीला एका लोटयामध्ये पाणी, तीळ घेऊन तर्पण द्यावे तर्पण देताना पूर्वजांचे नाव घेऊन तर्पण द्यावे. असे केल्याने पितरांना शांती मिळते. व घरात पितृ दोष येत नाही.
2) सर्व पित्री अमावस्या ह्या दिवशी मंदिरामध्ये काही गोष्टीचे दान करावे. त्यामुळे पितरांना शांती मिळते. ह्या दिवशी मंदिरामध्ये तांदूळ, आटा, गुळ, काळी उडीद डाळ व तुपाचे दान करावे.
3) ह्या दिवशी ब्राह्मणाला घरी भोजन करण्यासाठी बोलवावे. व त्याना वस्त्र व दक्षिणा देवून त्यांना सन्मान पूर्वक विदा करावे.
4) सर्व पित्री अमावस्या ह्या दिवशी पूर्वजांच्या नावांनी भोजन काढून ठेवावे. व कोणत्या रिकाम्या जागी टेरेसवर ठेवावे.
5) अमावस्या च्या दिवशी गाईला गूळ व रोटी आवश्य द्यावी. असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात व घरात शांती राहते.
सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी कसे द्यावे तर्पण:
सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा.
आपले तोंड दक्षिण दिशेला करून बसून एका लोटयामध्ये गंगाजल, काळे तीळ, कच्चे दूध व कूस घाला.
पाण्यानी तर्पण अर्पण करताना पितरांच्या आत्म्याला शांती लभूदे अशी प्रार्थना करा.
ह्या दिवशी ब्राह्मणला जेवण व दक्षिणा द्या.
गाय, कुत्रा, कावळा व मुंगी हयना जेवण द्या.
ह्या दिवशी पूर्वजांच्या नावांनी दिवा लाऊन त्यांना सन्मान पूर्वक निरोप द्या.
सर्वपितृ अमावस्या ह्या दिवशी गाईचे पूजन करणे सर्वाना फलदाई आहे. त्यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती सुद्धा मिळते.