नवरात्री 2023 अष्टमी व नवमी तिथी महत्व व कन्या पूजन विधी
नवरात्री 2023 अष्टमी तिथी 22 ऑक्टोबर रविवार ह्यादिवशी आहे तर नवमी तिथी 23 ऑक्टोबर सोमवार ह्या दिवशी आहे. आता आपण पाहूया अष्टमी व नवमी तिथीचे महत्व व कन्या पूजन कसे करायचे.
आता शारदीय नवरात्री सुरू झाली आहे तेव्हा पहिल्या माळेपासून दुर्गा देवीच्या प्रतेक रूपाची नऊ दिवस पूजा अर्चा केली जाते. त्यामध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्रि, महागौरी व सिद्धिदात्री असे क्रमाने देवीची रूप आहेत. काही वेळेस पंचांग प्रमाणे नवरात्री आठ दिवस किंवा नऊ दिवस असते मग आपल्याला संभ्रम पडतो की नवमी कधी आहे. ह्या वर्षी नवरात्री नऊ दिवसांची आहे.
The Navratri 2023 Ashtami Tithi Navami Tithi Importance And Kanya Pujan can of be seen on our YouTube Channel Navratri 2023 Ashtami Tithi Navami Tithi Importance And Kanya Pujan
नवरात्री अष्टमी ह्या तिथीचे महत्व:
प्रतेक महिन्याच्या शुक्ल पक्ष तिथीला मासिक दुर्गा अष्टमीला व्रत केले जाते. तसेच नवरात्रीमध्ये अष्टमी ह्या तिथीला खूप महत्व आहे. ह्या दिवशी माता आदिशक्तीचे आठवे रूप महागौरी ची पूजा केली जाते. तसेच ह्या तिथीला होम करतात. ह्या तिथीला कल्याणकारी व यश कीर्ती अ समृद्धी देणारी तिथी म्हणतात. नवरात्री मध्ये दुर्गामाताची विधी पूर्वक पूजा केल्याने सर्व दुख नष्ट होतात. शास्त्रूचा नाश होऊन विजय प्राप्त होतो. तसेच अष्टमी ह्या तिथीला शस्त्र पूजा करतात ज्योतिष शास्त्रामध्ये असे म्हणतात की ह्या तिथीला कोणतेपण चांगले कार्य केल्यास ते पूर्ण होते. ही तिथी शारीरिक व्याधी नष्ट करते.
दुर्गा अष्टमी तिथि व शुभ मुहूर्त-
दुर्गा अष्टमी पूजन 22 ऑक्टोबर 2023 रविवार
शारदीय नवरात्रि अष्टमी तिथि प्रारंभ 21 ऑक्टोबर 2023 शनिवार रात्री 09 वाजून 15 मिनट पासून
शारदीय नवरात्रि अष्टमी तिथि समाप्त- 22 ऑक्टोबर 2023 रात्री 08 वाजे पर्यन्त
नवरात्रि मध्ये नवमी तिथि कन्या पूजन महत्व-
नवरात्रीमध्ये शेवटच्या दिवशी म्हणजे नवमी ह्या तिथीला सिद्धी प्रदान करणारी माता सिद्धिदात्रीची पूजा करतात. अष्टमी तिथी बरोबरच नवमी तिथीला सुद्धा महत्व आहे. ह्या दिवशी नऊ देवीची रूप असणारे प्रतीक म्हणजे नऊ कन्या ह्याची पूजा करतात. ह्या दिवशी नऊ कन्या घरी आमंत्रित करून त्यांची पूजा करतात. त्याच बरोबर एका बालक सुद्धा आमंत्रण देतात. त्याला बटुक भैरव किंवा लांगूर चे रूप मानतात. कन्या पूजनच्या बरोबरच माता दुर्गाला सुद्धा विदा करतात. मग नवरात्रीची समाप्ती होते.
नवमी तिथि व शुभ मुहूर्त-
ह्या वर्षी शारदीय नवरात्री नवमी तिथी पूजन 23 ऑक्टोबर 2023 सोमवार ह्या दिवशी आहे ह्याच दिवशी नवरात्री समाप्ती होणार.
नवमी तिथि आरंभ-23ऑक्टोबर 2023 सोमवार संध्याकाळी 07 वाजून 59 मिनट पासून
नवमी तिथि समाप्ति- 24 ऑक्टोबर 2023 मंगळवार संध्याकाळी 05 वाजून 44 मिनट
कन्या पूजन विधि-
कन्या पूजन करण्याच्या आधल्या दिवशीच कन्याना आमंत्रण दिले पाहिजे.
शास्त्रों नुसार दो वर्ष पासून 10 वर्ष पर्यन्तच्या कन्याना पूजनासाठी आमंत्रण करायचे.
सर्वप्रथम शुद्ध पाणी घेऊन सर्व कन्या व एक बालक हीचे पाय दुवावे.
मग सर्वाना आसन वर बसण्यास आमंत्रण करावे.
आसनवर बसल्यावर दिवा लाऊन त्यांना कुकु लावावे.
मग खीर-पुरी हलवा व अजून काय पदार्थ बनवले असतील ते माता देवीला नेवेद्य दाखऊन मग सर्व कन्याना व बालक हयाना जेवण वाढावे व प्रमाने त्यांना जेवण सेवन करण्यास आग्रह करावा.
मग सर्वांचे पाय धरून आशीर्वाद घ्यावा.
मग त्यांना प्रसाद, फळ व भेट वस्तु देवून विदा करावे
कन्या पुजनाची काही विशिष्ट महत्व:
कन्या पूजनच्या दिवशी 9 पेक्षा जास्त मुलींना आमंत्रित करणे जास्त शुभ असते.
2 वर्षाच्या कन्याचे पूजन करणे जास्त शुभ मानले जाते. असे म्हणतात की त्यामुळे घरातील दरिद्र दूर होऊन सर्व बाधा पासून मुक्ती मिळते.
3 वर्षाच्या कन्या म्हणजे त्रिमूर्तिचे रूप मानले जाते. असे म्हणतात की 3 वर्षाच्या कन्याचे पूजन केल्यास घरात सुख समृद्धी येते.
असे म्हणतात की सुख समृद्धीसाठी 4 वर्षाच्या कन्याचे पूजन करणे खूप शुभ मानले जाते.
5 वर्षाच्या मुलीना रोहिणी असे म्हणतात त्याची पूजा केल्यास सर्व रोगा पासून मुक्ती मिळते.
6 वर्षाच्या मुलीना कालिकाचे रूप मानले जाते असे म्हणतात की त्यांची पूजा केल्यास सर्व कार्यामध्ये सफलता मिळते.
7 वर्षाच्या मुलीना चंडिका असे म्हणतात त्यांचे पूजन केल्यास घरात ध्यान दौलतची कधी सुद्धा कमतरता होत नाही.
8 वर्षाच्या मुलींना शांभवी असे म्हणतात असे म्हणतात की 8 वर्षाच्या मुलींची पूजा केल्यास सर्व कार्यामध्ये सफलता मिळते.
9 वर्षाच्या कन्याना माता दुर्गाचे रूप मानले जाते. त्यांचे पूजन केल्यास शत्रूवर विजय प्राप्त होतो.
10 वर्षाच्या कन्याचे पूजन केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.