28 ऑक्टोबर 2023 कोजागिरी पूर्णिमा महत्व, पूजाविधी व मंत्र
28 October 2023 Kojagiri Purnima Importance, Pooja Vidhi W Mantra In Marathi
कोजागिरी पूर्णिमा हा दिवस देवी लक्ष्मीमाताला समर्पित आहे. ह्या दिवसाला शरद पूर्णिमा असे सुद्धा म्हणतात. हिंदू पंचांग नुसार आश्विन महिन्यातील पूर्णिमा ह्या तिथीला येते. हा दिवस पावसाळा ह्या सीझनचा शेवटचा दिवस म्हणून प्रतीक मानले जाते. हा सण पश्चिम बंगाल, ओडिशा व आसाम येथे सर्वात जास्त साजरा करण्यात येणारा सण आहे. काही भागात कोजागिरी लोकखी पूजा व बंगाल मध्ये लक्ष्मी पूजा ह्या नावानी साजरा करतात.
भारतात बहुतेक भागात लक्ष्मी पूजन हे दिवाळी मध्ये करण्यात येते जी आश्विन महिन्यात अमावस्या येते त्या दिवशी.
कोजागिरी पूर्णिमा पूजा महत्व:
कोजागिरी पूर्णिमा हा दिवस देवी लक्ष्मीचा दिवस आहे. जी समृद्धी व सौभाग्यची देवीचे रूप मानले जाते. असे म्हणतात की ह्या दिवशी देवी लक्ष्मी माता आपल्या भक्तांच्या जवळ येऊन त्यांना सौभाग्य, धन व समृद्धीचा आशीर्वाद देते. तसेच ह्या दिवशी मंत्र व स्तोत्रचा जाप करणे लाभ दायक होते. देवी माताचा आशीर्वाद मिळण्यासाठी लक्ष्मी माताची पूजा करून श्री सूक्तचे वाचन करा.
असे म्हणतात की माता लक्ष्मी पौराणिक समुद्र मंथन मधून प्रकट झाली होती. व त्यांनी भगवान विष्णु ह्यांना आपले पती म्हणून स्वीकारले होते. बरेच लोक शरद पूर्णिमा ह्या दिवशी रात्री जागरण करतात. कारणकी असे म्हणतात रात्री जे भक्त जागे असतात त्यांच्या घरी लक्ष्मी माता येते व त्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देते म्हणून रात्रभर भक्त देवी माताची भजन, आरती व स्तुति गात असतात.
कोंजगिरी पूर्णिमा ह्या दिवशी संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळी घरासमोर सडा रंगोळी काढावी. आपल्या मुख्य दरवाजा पासून ते पुजा घर पर्यन्त लक्ष्मी माताची पावल काढावी. व देवी माताला आपल्या घरी येण्यास प्रार्थना करावी.
कोजागिरी पूर्णिमा 2023 तिथि और मुहूर्त:
कोजागिरी पूर्णिमा तिथि: 28 ऑक्टोबर 2023, शनिवार
पूर्णिमा तिथि प्रारंभ: 28 ऑक्टोबर 2023 सकाळी 4 वाजून 17 मिनिट पासून
पूर्णिमा तिथि समाप्त: 29 ऑक्टोबर 2023 पहाटे 1 वाजून 53 मिनिट पर्यन्त
कोजागरी लक्ष्मी पूजा विधि:
माता लक्ष्मीच्या फोटो किंवा मूर्ती समोर एक तांब्याचा पाणी भरून कलश ठेवा. कलाशला लाल धागा बांधा व त्यावर कुंकुचा वापर करून एक स्वस्तिक काढा मग पुढे दिलेला मंत्र जाप करून आरती म्हणून प्रसाद दाखवा. लक्ष्मी गणेश यंत्रची पूजा करा. त्यामुळे आपल्या जीवनात समृद्धी व धन मिळण्यासाठी मदत होईल. प्रसाद म्हणून आपण खीर किंवा मसाला दूध ठेवू शकता.
मंत्र:
ॐ ह्रीं क्लीं महालक्ष्म्यै नमः।।