वसुबारस (गोवत्स द्वादशी) व्रत मुलांच्या दीर्घायुष्य व स्वास्थ्यसाठी कसे करावे
Govatsa Dwadashi Vasubaras Vrat Mulanchya Dirghayush Swasthya Sathi In Marathi
आपणा सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
हिंदू कॅलेंडर नुसार वसुबारस ह्या दिवसाला गोवत्स द्वादशी ह्या नावानी सुद्धा संबोधले जाते. ह्या दिवशी गाईची पूजा करतात. ह्यालाच नंदिनी व्रत सुद्धा म्हणतात. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्ष द्वादशी ह्या दिवशी साजरी करतात. ह्या दिवशी गाय नंदिनीची पूजा करतात त्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात.
महाराष्ट्रमध्ये वसुबारस ह्या दिवसा पासून दिवाळी ह्या सणाला सुरवात होते. ह्या दिवशी आपल्या दारात पहिला दिवा लावतात. ह्या वर्षी वसुबारस 9 नोव्हेंबर गुरुवार ह्या दिवशी आहे.
गोवत्स द्वादशी इतिहास:
हिंदू धर्मामध्ये गाईला गोमाता म्हणून संबोधले जाते. त्याचा शाब्दिक अर्थ मा म्हणजेच माता असा होतो. ह्या दिवशी गाईची व तिच्या बछडयाची पूजा करतात. असे म्हणतात की बछडा हा नंदीचे प्रतीक मानून त्याची पूजा करतात. व गाईला कामधेनुचे रूप मानले जाते.
वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी आपल्या मुलांच्या दीर्घायुषसाठी व्रत:
गोवत्स द्वादशी ह्या दिवशी महिला आपल्या मुलांसाठी स्वास्थ्य व दीर्घायुष साठी प्रार्थना करून उपवास करतात. असे म्हणतात ज्याना संतान नाही त्यांनी ह्या दिवशी गाईची पुजा अर्चा करून उपवास करावा. ह्या दिवशी महिला फक्त दिवस भरात एकदाच भोजन करतात व ह्या दिवशी शरीरीक कष्ट जास्त करण्यास मनाई असते. तसेच दुधा पासून बनवलेले पदार्थ सेवन करू नये.
गोवत्स द्वादशी पूजा:
वसुबारस ह्या दिवशी गाय व तिच्या बछडा ला न्हाऊ माखू घालतात व रंगी बेरंगी कपडे घालून फुलांनी सजवतात कपाळावर कुंकु लावतात व हळद पॅन लावतात मग गाईला गहू व मोड आलेले चणे, मोड आलेले मूग प्रसाद म्हणून देतात असे म्हणतात की हे खाद्य पदार्थ पूर्ण परिवाराला सुख समृद्धी प्रदान करतात. वसुबारस ह्या दिवशी गाई नाही मिळाली तर मातीची गाय बनवून तीची पूजा करतात.