23 नोव्हेंबर देवउठनी एकादशीला करा हे उपाय, धन पासून विवाह संबंधित समस्या दूर होतील
23 November Dev Uthani Ekadashi 2023 Upay in Marathi
कार्तिक महिन्यातील शुल्क पक्ष मध्ये येणारी एकादशी खूप महत्वपूर्ण मानली जाते. ह्या एकादशीला देवउठनी एकादशीच्या रूपात साजरे केले जाते. कारणकी असे म्हणतात ह्या दिवशी भगवान विष्णु 4 महिन्यानंतर आपल्या निद्रा मधून जागे होतात. त्याच बरोबर ह्या दिवसाला प्रबोधनी एकादशी असे सुद्धा म्हणतात. देवउठनी एकादशी ह्या दिवसा पासून चातुर्मास समाप्ती होते या वर्षी अधिक मास मुळे चातुर्मास 5 महीने होता.
चला तर मग आपण पाहू या देवउठनी एकादशी ह्या दिवशी काय उपाय करायचे:
हिंदू धर्मामध्ये देवउठनी एकादशीचे विशेष महत्व आहे ह्या दिवसा पासून सर्व मंगलकार्यची सुरुवात होते. देवउठनी एकादशी नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीला तुळशी विवाह करतात. जर आपणाला आपल्या समस्या पासून मुक्ती पाहिजे असेलतर देवउठनी एकादशी ह्या दिवशी काही उपाय जरूर करा.
देवउठनी एकादशी कधी आहे:
कार्तिक महिन्याच्या शुल्क पक्ष एकादशी तिथीला प्रारंभ 22 नोव्हेंबर रात्री 11 वाजून 03 मिनिटांनी सुरू होत आहे. त्याच बरोबर ह्याची समाप्ती 23 नोव्हेंबर रात्री 9 वाजून 01 मिनिटांनी आहे. उदय तिथी 23 नोव्हेंबर ला आहे त्यामुळे देवउठनी एकादशी 23 नोव्हेंबरला आहे.
मिळेल भगवान विष्णुची कृपा:
एकादशी ह्या दिवशी भगवान विष्णु ह्यांची कृपा मिळण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात एक चिमूट हाळद घालून स्नान करा, त्याच बरोबर ह्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा कारणकी भगवान विष्णु ह्यांना पिवळा रंग प्रिय आहे. असे केल्याने भगवान विष्णु ह्यांची कृपा मिळेल.
धनाची कमी कधी सुद्धा होणार नाही:
एकादशीच्या दिवशी सर्वात पहिल्यांदा शंखामध्ये गाईचे दूध भरून भगवान विष्णु ह्यांना स्नान घाला मग गंगाजल नी स्नान घाला. असे केल्याने व्यक्तीच्या आर्थिक समस्या दूर होतात. भगवान विष्णु ह्यांची पूजा करताना ॐ नमो भगवते वासुदेवाय नम: हा मंत्र जाप करा. त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील. भगवान विष्णु ह्यांची पूजा करताना शुद्ध तुपाचा दिवा जरूर लावा व भोग दाखवताना त्यामध्ये तुळशी पत्र ठेवा.
विवाह योग लवकर येईल:
जर काही जणांच्या विवाहामध्ये अडचणी येत असतील तर देवउठनी एकादशी च्या दिवशी काही उपाय करा. त्यासाठी विष्णुजीनची पूजा करताना भगवान विष्णु ह्यांना केसर, पिवळे चंदन व हळदीचा तिलक लावावा मग पिवळ्या रंगाची फूल अर्पित करा. त्यामुळे विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होईल.
सर्व मनोकामना पूर्ण होतील:
आपली कोणती मनोकामना पूर्ण करायची असेलतर देवउठनी एकादशी ह्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पित करा कारणकी पिंपळाच्या झाडांमद्धे भगवान विष्णु ह्याचा वास असतो.