नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी अमेझिंग 15 किचन टिप्स व ट्रिक्स इन मराठी
Amazing 15 Kitchen Tips For Beginners In Marathi
आपण स्वयंपाक घरात रोज नवीन नवीन पदार्थ बनवतो. आपण खूप मेहनत करून जेवण बनवतो मग स्वयंपाक घराची साफसफाई करतो. मग तेव्हा आपल्याला असे वाटते की आपल्याकडे जादूची झडी असती तर ही सर्व कामे झटपट झाली असती. पण ती जादूची झडी मिळणे कठीण आहे.
आपल्याला ही सर्व कामे स्वतःला करायची आहेत. पण जर आपल्याला काही जादूच्या ट्रिक्स किंवा टिप्स मिळाल्यावर आपले काम सोपे व झटपट होऊ शकेल. त्यासाठी आम्ही काही किचन टिप्स व ट्रिक्स घेऊन आलो आहोत त्याच्या वापराने स्वयंपाक घराचे काम व पदार्थ मस्त व स्वादिष्ट होतील व साफसफाई सुद्धा होईल.
अगदी सोप्या किचन टिप्स:
किचनमध्ये स्वयंपाक करणे व किचनची साफ सफाई करणे हे काम मुश्किल आहे. जेवण बनवताना काही शक्कल लढवावी लागते. त्याच बरोबर किचन मधील डाग धब्बे घालवण्यासाठी युक्ति सुद्धा लढवावी लागते. तसे करावे सुद्धा लागते कारणकी स्वच्छ जागी स्वयंपाक केल्याने जेवण स्वादिष्ट बनते.
स्वयंपाक करताना काही सोप्या टिप्स:
स्वयंपाक करताना खूप मेहनत घ्यावी लागते. स्वादिष्ट जेवण बनवण्यासाठी भाजी कापण्यापासून ते अन्न शिजे पर्यन्त आपल्याला नीट काम करणे आवश्यक आहे. त्याच्या बरोबर पुढे दिलेल्या अद्भुत टिप्स वापरल्या तर आपले जेवण अजून स्वादिष्ट बनू शकेल.
आता आपण स्वयंपाक करताना कोणत्या अमेझिंग किचन टिप्स व ट्रिक्स आहेत ते पाहूया:
1. जर आपल्या पोळ्या, चपात्या किंवा पराठे थोडे कडक बनतात म्हणजेच सॉफ्ट होत नाहीत तर आपण एक ट्रिक करू शकता ते म्हणजे कणिक मळताना थोडे दूध वापरुन कणिक मळा व ती 15-20 मिनिट झाकून ठेवा मग ती छान भिजते मग थोडी परत मळून मग चपट्या करा. बघा किती सुंदर मऊ लुसलुशीत चपात्या होतात. आपल्याला आपल्या पोळ्या छान हेल्दी बनवायच्या असतील तर अजून एक ट्रिक आहे. आपण घरी पनीर बनवतो पनीर बनवले की गाळलेले पाणी फेकून देतो तसे ण करता ते पाणी कणिक मळताना वापरा पोळ्या खूप मस्त होतात करून पहा.
2. जर तुम्ही भजी म्हणजे पकोडे बनाव ताना खाण्याचा सोडा वापरत असला तर तसे करू नका त्यामुळे अन्ना मधील जीवन सत्व नष्ट होतात. त्यासाठी एक ट्रिक आहे ते म्हणजे भजाचे पीठ भिजवताना त्यामध्ये कडकडीत तेलाचे मोहन टाका व त्याच बरोबर थोडे तांदळाचे पीठ मिक्स करा व भाजी करून पहा कशी मस्त कुरकुरीत व स्वादिष्ट बनतात.
3. आपण घरी ब्रेड आणला की राहिलेला ब्रेड फेकून देतो पण तसे नकरता राहिलेला ब्रेड एका हवाबंद डब्यात भरून फ्रीज मध्ये ठेवा. मग आपण जेव्हा कटलेट बनवतो तेव्हा त्या ब्रेडचा वापर करा त्यामुळे कटलेट तुटणार नाही व स्वादिष्ट बनतील.
4. आपण स्वीट डिश बनवतो तेव्हा त्यामध्ये चिमूटभर मीठ घाला त्यामुळे आपला गोड पदार्थ स्वादिष्ट बनतो. पण खीर बनवताना मीठ घालू नये नाहीतर दूध खराब होऊ शकते.
5. जर आपल्याला हॉटेल किंवा ढाबा स्टाईल मोकळा भात बनवायचा असेलतर भात शिजवताना त्यामध्ये एक चमचा तूप व लिंबू रसाचे काही थेंब टाकावे. त्यामुळे भात अगदी पांढरा व मोकळा होतो.
6. कोणत्या सुद्धा भाजीची ग्रेव्ही बावताना आपण कांदा भाजतो तेव्हा त्यामध्ये एक चिमूट साखर घातली की ग्रेव्हीचा रंग व स्वाद छान येतो.
7. जर पुऱ्या तळून घ्यायच्या असतील तर पुऱ्या लाटून झाल्यावर थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवा त्यामुळे पुऱ्या तळताना तेल जास्त लागत नाही.
8. रव्याच्या शिरा म्हणजेच हलवा बनवत असाल तर रवा भाजताना थोडे बेसन घालावे त्यामुळे हलवा छान मिसळून येतो व स्वादिष्ट लागतो.
9. ग्रेव्ही मध्ये तेल जास्त झाले तर तर ग्रेव्ही फ्रीजमध्ये ठेवा. असे केल्याने थोडा वेळांनी तेल किंवा तूप वरती तरंगू लागेल मग चमच्याच्या सहाय्यानी जास्तीचे वरती तरंगलेले तेल काढून घ्या मग जेवताना गरम करून सर्व्ह करा.
10. भेंडीची भाजी बनवताना तिचा स्वाद वाढवण्यासाठी शिजत असताना थोडासा लिंबुरस घाला म्हणजे भिंडी चिकट होत नाही.
11. अंड्याचे ऑम्लेट बनवताना जेव्हा आपण अंडे फेटतो तेव्हा दोन चमचे दूध घाला त्यामुळे अंडे मुलायम होते.
12. मलई पासून तूप काढायचे असेल तेव्हा मलईमध्ये बर्फाचे तुकडे घालून मिक्सर मधून काढा त्यामुळे सारे तूप वरती येईल व ताक खाली राहील. मह त्या ताका पासून आपण कढी बनवू शकतो किंवा इडलीच्या मिश्रणात घालू शकता.
13. आपण जर बिना अंड्याचा केक बनवत असाल तर केकच्या मिश्रणात पिकलेले केळे व दही घाला त्यामुळे केक छान फुलतो.
14. आपण दुधी भोपळ्याचे कोफ्ते बनवतो तेव्हा आपण दुधी किसून घेतो मग त्याचे पाणी सुटते ते पाणी खूप पौस्टिक असते ते टाकून न देता ते पाणी चपतीचे पीठ मळताना वापरा. चपाती छान मुलायम व स्वादिष्ट बनते.
15. कांदा कापताना डोळ्यात पाणी येते म्हणून थंड पाण्यात कांदा बुडवून ठेवा. असे केल्याने कापताना डोळ्यात पाणी येत नाही.