Tasty Perfect Methi Matar Malai Dhaba Style In Marathi
स्वादिष्ट मेथी मटर मलाई ढाबा स्टाइल इन मराठी
आपण मेथीची भाजी निरनिराळ्या पद्धतीने बनवतो. आज आपण मेथीची भाजी अगदी वेगळी बनवणार आहोत. त्यामध्ये आपण आता मटारचा सीझन चालू आहे तर ते वापरणार आहोत. तसेच टेस्टि बनवण्यासाठी फ्रेश मलई वापरणार आहोत.
स्वादिष्ट मेथी मटर मलाई ढाबा स्टाइल ह्या विडियोची लिंक पुढे दिलेली आहे तेथे क्लिक करून पाहू शकता: स्वादिष्ट मेथी मटर मलाई
मेथी, मटर मलई आपण अगदी ढाबा स्टाईल बनवणार आहोत. आपण अश्या प्रकारे मेथीची ची भाजी बनवली तर ती अगदी ढाबा स्टाइल बनते. तसेच मस्त टेस्टि बनते आपण पराठा बरोबर किंवा चपाती बरोबर सर्व्ह करू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 2 जणसाठी
साहित्य:
1 कप मेथी
1/4 कप हिरवे ताजे मटार
2 टे स्पून कांदा (बारीक चिरून)
2 टे टोमॅटो पयूरी
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हळद
1/2 टी स्पून गरम मसाला
1/2 टी स्पून धने-जिरे पावडर
2 टे स्पून फ्रेश मलई
मीठ चवीने
2 टे स्पून तेल
1 टी स्पून जिरे
1/2 टी स्पून कसूरी मेथी
वाटणसाठी:
2 टे स्पून कांदा चिरून
5-6 लसूण पाकळ्या
1/2” आल
5-6 काजू
1 छोटी हिरवी मिरची
कृती:
प्रथम मेथी निवडून घ्या. मग त्यामधील 1 कप मेथी पाण्यात भिजत ठेवा पाण्यात भिजत घालताना त्यामध्ये थोडेसे मीठ घालून 15 मिनिट तशीच ठेवा त्यामुळे मेथीचा कडवट पणा कमी होईल. मग पाण्यातून बाहेर काढून बारीक चिरून घ्या. कांदा दोन प्रकारे चिरायचा आहे बारीक व थोडा मोठा वाटण्यासाठी.
मग मटारचे दाणे वाफवून घ्या. कढईमध्ये एक चमचा तेल घालून चिरलेली मेथी 5 मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या. हवे तर 2 टे स्पून पाणी घाला. मग शिजल्यावर बाजूला ठेवा.
मिक्सरच्या भांड्यात कांदा, लसूण, आल, काजू व हिरवी मिरची 2 टे स्पून पाणी घालून वाटून बाजूला ठेवा. टोमॅटो चिरून मिक्सरमधून काढा.
एक पॅन मध्ये एक टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये जिरे घालून बारीक चिरलेला कांदा घालून थोडा परतून घ्या. मग त्यामध्ये वाटलेला मसाला घालून परतून घ्या. मग त्यामध्ये टोमॅटो पयूरी, लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, धने-जिरे पावडर, मीठ घालून 2 मिनिट परतून घ्या.
आता त्यामध्ये वाफवलेल मटर घालून 2-3 मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या, मग त्यामध्ये मेथी घालून 2-3 टे सून पाणी घाला जरूरत असेलतर अजून 2 टे स्पून पाणी घाला.
आता त्यामध्ये फ्रेश मलई घालून मिक्स करून विस्तव बंद करा. गरम गरम मेथी मटर मलई पराठा किंवा चपाती बरोबर सर्व्ह करा.