खमंग कांद्याच्या पातीचा पराठा मुलांच्या डब्यासाठी नाश्तासाठी
Kandyachya Paticha Paratha | Spring Onion Paratha For Kids Tiffin Recipe In Marathi
कांद्याची पात आपणा सर्वाना माहीत आहेच. आपण चायनीज पदार्थ बनवतो तेव्हा कांद्याची पात वापरतो त्यामुळे त्या पदार्थाला मस्त टेस्ट येते.
कांद्याची पात वापरुन आपण त्याची भाजी बनवतो. पान कांद्याची पात वापरुन त्याचा पराठा बनवला आहे का? बनवून बघा खूप टेस्टि लागतो. मुले पालेभाजी खायचा कांटाळा करतात किंवा त्यांना आवडत नाही मग त्याचा पराठा बनवून बघा.
खमंग कांद्याच्या पातीचा पराठा मुलांच्या डब्यासाठी नाश्तासाठी ह्याच्या विडियोची लिंक पुढे दिलेली आहे: खमंग कांद्याच्या पातीचा पराठा | Spring Onion Paratha
कांद्याची पात सेवन केल्याने कॅन्सर होण्या पासून बचाव होतो. कांद्याची पात सेवन केल्याने चांगली भूक सुद्धा लागते. आपण कांद्याची पात कच्ची किंवा शिजवून सुद्धा खाऊ शकतो. त्याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल सुद्धा नियंत्रणात राहते. आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ति वाढते, रक्तातील साखर नियंत्रणात राहते. अशी गुणकारी कांद्याची पात आहे मग आपल्या मुलांना सेवन करायला जरूर द्या.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 6 पराठे बनतात
साहित्य:
1 कप कांद्याची पात
1/4 कप कांद्याच्या पातीचा कांदा (चिरून)
2 कप गव्हाचे पीठ
1 टे स्पून आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1 टी स्पून ओवा (आवडत असेलतर)
मीठ चवीने
2 टे स्पून तेल कणिक मळताना
तेल पराठा भाजताना
तूप पराठाला लावायला
कृती: प्रथम कांद्याची पात निवडून चिरून स्वच्छ धुवून घेऊन निथळत ठेवा. पातीचा कांदा सुद्धा बारीक चिरून घ्या, आल-लसूण-हिरवी मिरची कुटून घ्या.
एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ, चिरलेली कांद्याची पात, चिरलेला पातीचा कांदा, आल-लसूण-हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर, ओवा, मीठ घालून मिक्स करून थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. मग 2 चमचे तेल घालून परत घट्ट पीठ मळून घ्या. आता 10 मिनिट मळलेले पीठ झाकून बाजूला ठेवा.
तवा गरम करायला ठेवा. एक मध्यम आकाराचा पिठाचा गोळा घेऊन पीठ लाऊन लाटून घ्या. मग लटलेला पराठा गरम तव्यावर घालून तेल घालून चांगला भाजून घ्या.
गरम गरम पराठा तूप लावून टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.