डिलीशीयस लाजवाब क्रिसमस स्पेशल नवाबी सेवई डेझर्ट
Christmas Special Nawabi Semai Dessert recipe in Marathi
आता क्रिसमस जवळ आला आहे त्यासाठी आपण आज एक खूप स्वादिष्ट क्रिसमस स्पेशल नवाबी सेवई डेझर्ट बनवणार आहोत. आपण सेवईची खीर बनवतो किंवा शीरा सुद्धा बनवतो किंवा शिरखूरमा बनवतो. पण आपण
नवाबी सेवई डेझर्ट बनवले आहे का? बनवून बघा खूप मस्त लागते. क्रिसमस स्पेशल नवाबी सेवई डेझर्ट बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे.
डिलीशीयस लाजवाब क्रिसमस स्पेशल नवाबी सेवई डेझर्ट ह्याची विडियो लिंक पुढे दिलेली आहे तेथे क्लिक करून पाहू शकता: नवाबी सेवई डेझर्ट
क्रिसमस आला की आपण निरनिराळे केक्स बनवतो किंवा बिस्किट बनवतो बरेच वेळा आपण डेझर्ट सुद्धा बनवतो. नवाबी सेवई डेझर्ट आपण इतर वेळी सुद्धा बनवू शकतो आपल्याला जेवण झालेकी काही नया काही स्वीट डिश पाहिजे असते.
नवाबी सेवई डेझर्ट बनवताना आपण बारीक सेवई वापरली आहे ती आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होते.
बनवण्यासाठी वेळ: 25 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
1 1/2 कप बारीक सेवया
2 टे स्पून तूप
1 1/2 कप दूध
1 1/2 टे स्पून कॉर्नफ्लोर
1/4 कप दूध (कॉर्नफ्लोरसाठी)
4 टे स्पून साखर
1 टे स्पून रोज सीरप
1 टी स्पून रोज एसेन्स
1 टे स्पून तूप
ड्रायफ्रूट सजावटी करिता
कृती:
एका पॅनमध्ये 2 टे स्पून तूप गरम करून बारीक सेवई घालून मिक्स करा. मग 2-3 मिनिट मंद विस्तवावर भाजून घ्या छान खमंग अशी खुशबू आलीकी त्यामध्ये पिठीसाखर घालून मिक्स करा हळू हळू पिठीसाखर विरघळायला लागेल मग त्यामध्ये रोज सीरप घालून परत मिक्स करा आता विस्तव बंद करून सेवया बाजूला काढून ठेवा.
एक स्टीलच्या प्लेटला किंवा ट्रेला तूप लाऊन त्यामध्ये सेवयाचे निम्मे मिश्रण काढून एक सारखे करून थोडे हातानी दाबून घ्या.
पॅन मध्ये 1 1/2 कप दूध गरम करायला ठेवा. एका बाऊलमद्धे कॉर्नफ्लोर व दूध मिक्स करून घ्या गुठळी होता कामा नये. पॅन मधील दूध गरम झालेकी त्यामध्ये साखर घालून मिक्स करा, साखर मिक्स झालीकी त्यामध्ये कॉर्नफ्लोरचे मिश्रण घालून मिक्स करा, मंद विस्तवावर मिश्रण हलवत रहा ते हळू हळू लगेच घट्ट होत जाईल. मग त्यामध्ये एक चमचा तूप व 1 टी स्पून रोज एसेन्स घालून परत 2 मिनिट विस्तवावर ठेवा.
आता कॉर्नफ्लोरचे मिश्रण प्लेटमधील सेवयांच्या वर घालून एकसारखे करून घ्या. मग त्यावर परत राहिलेले सेवयाचे निम्मे मिश्रण घालून एक सारखे करून घ्या वरतून ड्रायफ्रूट ने सजवून 15-20 मिनिट बाजूला झाकून सेट करायला ठेवा.
नवाबी सेवई डेझर्ट सेट झालेकी सुरीने चौकोनी तुकडे कापून सर्व्ह करा.