बिना कांदा-आले-लसूण दत्त जयंती संपूर्ण नैवेद्याचे जेवणाचे ताट दत्त गुरूंची नक्की कृपा मिळेल
Bina Kanda-Aal-Lasun Naivedya Chi Thali | No Onion-Garlic-Ginger Veg Thali In Marathi
दत्त गुरूंच्या नेवेद्यचे पदार्थ
लोणचे किंवा चटणी, कोशिंबीर, पातळ भाजी, वरण-भात,
मटार-बटाटा रसा भाजी, शिरा, चपाती, घेवडा भाजी व भजी
आपण सणवार असला की देवांची मनोभावे पूजा अर्चा करतो नेवेद्य बनवून देवाला ताट दखवतो. पण आपण नेवेद्य दाखवताना कांदा-आल-लसूण वापरत नाही. कारणकी ह्या तिन्ही गोष्टी ह्या तामसी आहेत.
बिना कांदा-आले-लसूण दत्त जयंती संपूर्ण नैवेद्याचे जेवणाचे ताट ह्याच्या विडियोची लिंक पुढे देत आहे तेथे क्लिक करून पाहू शकता: दत्त जयंती संपूर्ण नैवेद्याचे जेवणाचे ताट
आता दत्त जयंती येत आहे. तेव्हा दत्त भगवान ह्यांची कृपा मिळण्यासाठी दत्त महाराजना अश्या प्रकारच्या नेवेद्यची थाली दाखवून त्यांची कृपा मिळवा. दत्त महाराज ना नेवेद्यच्या थाली मध्ये आल-लसूण-कांदा वापरलेले चालत नाही.
आता आपण पाहूया बिना कांदा-आले-लसूण नेवेद्यची थाली कशी बनवायची:
आवळा-ओली हळद लोणचे:
साहित्य:
2 मोठे आवळे
2 ओली ताजी हळकुंड
मसाला करिता:
साहित्य:
4 टे स्पून किंवा 1/2 कप मोहरीची डाळ
2 टी स्पून लाल मिरची पावडर
1/2 टी स्पून हळद
1 टी स्पून मेथी दाणे
1/4 टी स्पून हिंग
1 मोठे लिंबूरस
2 टी स्पून साखर
मीठ चवीने
कृती: प्रथम ओली हळद धुवून पुसून घ्या. मग आवळे धुवून पुसून कोरडे करून घ्या. आता आवळे व ओली हळद किसून घ्या.
लोणचे मसाला बनवण्यासाठी प्रथम मोहरीची डाळ 1 मिनिट मंद विस्तवावर गरम करून घ्या, मेथी दाणे सुद्धा थोडेसे गरम करून घ्या. मग मिक्सरच्या जार मध्ये मोहरीची डाळ, मेथी दाणे, लाल मिरची पावडर, हळद, साखर, मीठ थोडेसे ग्राइंड करून घ्या. पण खूप बारीक करायचे नाही. थोडे जाडसरच वाटायचे.
एका बाउलमध्ये कीसलेले आवळे व हळद घेऊन त्यामध्ये लोणचे मसाला घालून वरतून लिंबूरस घालून मिक्स करून घ्या. सर्व मिक्स करून झाल्यावर जर मिश्रण कोरडे वाटले तर अजून थोडे लिंबू पिळा.
आता सर्व मिश्रण एक सारखे मिक्स करून 2 तास तसेच झाकून ठेवा म्हणजे छान मुरेल. मग काचेच्या बरणीत भरून फ्रीजमद्धे ठेवा लागेल तसे काढून परत बाटली फ्रीजमध्ये ठेवा.
काकडीची कोशिंबीर:
साहित्य:
2 मध्यम आकाराच्या काकड्या
1 कप दही
2 टी स्पून साखर
मीठ चवीने
1/4 कप ओला नारळ (खोवून)
2 टे स्पून कोथिंबीर
कृती: काकडी स्वच्छ धुवून सोलून घ्या, मग किसून घ्या. नारळ खोवून घ्या, कोथिंबीर धुवून चिरून घ्या. एका बाउल मध्ये किसलेली काकडी, दही, साखर, नारळ व कोथिंबीर घालून मिक्स करून फ्रीजमद्धे थंड करायला ठेवा. मग वाढताना मीठ घालून मिक्स करा मग वाढा. कारणकी कोशिंबीर मध्ये आधीच मीठ घातले तर पाणी सुटते व कोशिंबीर पातळ होते.
वरण-भात:
भात बनवण्यासाठी:
साहित्य:
1 वाटी तांदूळ
2 वाट्या पाणी
वरण बनवण्यासाठी:
साहित्य:
3/4 वाटी तुरीची डाळ
1 /2 वाटी पाणी
फोडणीसाठी:
1 टी स्पून तूप
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
1/4 टी स्पून जिरे
मीठ चवीने
तूप वरतून घालण्यासाठी
कृती: प्रथम तांदूळ धुवून त्यामध्ये तांदळ्याच्या डबल पाणी घालून बाजूला ठेवा. मग डाळ धुवून पाणी घालून ठेवा. कुकरमध्ये पाणी घालून डाळ-तांदुळची भांडी कुकरमध्ये ठेवून 3 शिट्टी काढा. कुकर उघडल्यावर भांडी बाहेर काढून घ्या.
एका कढई मध्ये तूप गरम करून त्यामध्ये जिरे, हिंग,हळद व मीठ चवीने घालून शिजलेले डाळ घालून एक सारखे करून चांगली उकळी येऊ द्या.
मटार-बटाटा रस्सा:
साहित्य:
2 मध्यम आकाराचे बटाटे (उकडून)
1/4 वाटी मटार (वाफवून)
1 टे स्पून तेल
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
1/4 टी स्पून हळद
1 मोठा टोमॅटो (चिरून)
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/2 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून पाव-भाजी मसाला
मीठ चवीने
2 टे स्पून कोथिंबीर
कृती: प्रथम बटाटे उकडून सोलून चिरून बाजूला ठेवा, मटार वाफवून घ्या, टोमॅटो चिरून घ्या.
कढई मध्ये तेल गरम करून जिरे, हिंग, हळद घालून टोमॅटो घालून 2 मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, पावभाजी मसाला व चिरलेले बटाटे व वाफवलेले मटार घालून मीठ चवीने घालून मिक्स करून 1/2 कप पाणी घालून मिक्स करून 2-3 मिनिट शिजवून घ्या.
मग त्यामध्ये आवडत असेलतर ओला खोवलेला नारळ व कोथिंबीर घालून मिक्स करून विस्तव बंद करा.
रव्याचा शिरा:
साहित्य:
1 छोटी वाटी रवा
2 टे स्पून तूप
3/4 छोटी वाटी साखर
1 1/2 दूध व थोडे पाणी मिक्स करून
1 टी स्पून वेलची पावडर
ड्रायफ्रूट
कृती: कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये बारीक रवा घालून मंद विस्तवावर गुलाबी रंग येई पर्यन्त भाजून घ्या. दुसरी कडे दूध व पाणी गरम करायला ठेवा.
आता रवा भाजून झालकी त्यामध्ये गरम दूध-पाणी घालून चांगले ढवळून घ्या. रवा चांगला शिजला की त्यामध्ये साखर घालून मिक्स करून घ्या. साखर विरघळून मिश्रण थोडे घट्ट जलेकी वेलची पावडर व ड्रायफ्रूट घालून मिक्स करून घ्या. आता विस्तव बंद करा.
चपाती:
साहित्य:
2 कप गव्हाचे पीठ
1 टे स्पून तेल कणिक मळताना
मीठ चवीने
तेल घडीच्या चपाटीला लावायला
तूप वरतून चपतील लावायला
कृती: एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये गव्हाचे पीठ व मीठ घेऊन मिक्स करून थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून 10-15 मिनिट झाकून बाजूला ठेवा. मग मळलेले पीठ पुन्हा एकदा मळून घ्या मग त्याचे मध्यम आकाराचे गोळे बनून बाजूला ठेवा.
एक गोळा घेऊन पुरी एव्हडा लाटून त्याला एका बाजूनी 1/2 टी स्पून तेल लावून एक फोल्ड करा मग परत एकदा फोल्ड करा त्याचा त्रिकोणी आकार झाला पाहिजे. मग पीठ लाऊन छान गोल पोळी लाटून घ्या. तवा गरम करून पोळी छान दोन्ही बाजूनी भाजून घ्या. मग त्याला तूप लाऊन बाजला ठेवा अश्या प्रकारे सर्व पोळ्या लाटून भाजून घ्या.
घेवडा भाजी:
घेवडा भाजी ही नेवेद्यच्या ताटात पाहिजेच. कारण की दत्त गुरूना घेवडा भाजी खूप आवडते. व त्याचा उल्लेख गुरु व चरित्रामध्ये सुद्धा आहे.
साहित्य:
1 कप घेवडा भाजी (चिरलेली)
2 टे स्पून शेंगदाणा कूट
1 टे स्पून ओला नारळ (खोवून)
फोडणीकरिता:
साहित्य:
1 1/2 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
1/4 टी स्पून हळद
2 टी स्पून लाल मिरची पावडर
1 1/2 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून धने-जिरे पावडर
मीठ चवीने
कृती: प्रथम घेवडा शेंगाचे दोन्ही बाजूचे देठ काढून सोलून त्याचे 1/2” चे तुकडे करून पाण्यात घाला.
कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी-जिरे, हिंग, हळद घालून मग पाणी काढून चिरलेली भाजी घाला व फक्त 2 टे स्पून पाणी घालून झाकण ठेवून झकणावर थोडे पाणी घालून 5-7 मिनिट भाजी शिजवून घ्या. मधून मधून झाकण काढून हलवा.
आता झाकण काढून त्यामध्ये लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने-जिरे पावडर, मीठ घालून मिक्स करून एक मिनिट वाफ आल्यावर शेंगदाणा कूट व ओले खोबरे घालून मिक्स करून थोडे परतून घ्या. मग विस्तव बंद करून भाजी खाली उतरवून ठेवा.
उदीड डाळीची भाजी:
साहित्य:
1 वाटी उडीद डाळ
2-3 हिरव्या मिरच्या
1 टी स्पून जिरे
10-12 कडीपत्ता पाने
2 टे स्पून कोथिंबीर चिरून
1/4 टी स्पून हिंग
मीठ चवीने
तेल तळण्यासाठी
कृती: प्रथम उडीद डाळ स्वच्छ धुवून पाणी घालून 2 तास भिजत ठेवा. दोन तास झाल्यावर पाणी काढून डाळ मिक्सरच्या भांड्यात घ्या, हिरवी मिरची, जिरे व मीठ घालून छान बारीक वाटून घ्या.
मग वाटलेली डाळ एका बाउलमध्ये काढून घेऊन त्यामध्ये हिंग घालून चांगली फेटून घ्या. डाळ चांगली फेटली की भाजी छान होतात. मग त्यामध्ये कडीपत्ता पाने चिरून घाला, कोथिंबीर घालून परत एकदा थोडे फेटून घ्या.
कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. तेल चांगले गरम झालेकी छोटी छोटी भाजी घालून छान कुरकुरीत भाजी तळून घ्या.
आता दत्त गुरूंना नेवेद्य दाखवायचे जेवण सर्व तयार झाले आहे एक स्वच्छ स्टीलचे ताट घेऊन सर्व जेवण ताटात वाढून दत्त गुरूंना नेवेद्य दाखवा व त्यांची कृपा मिळवा.