26 डिसेंबर मंगळवार मार्गाशीष पूर्णिमा अन्नपूर्णा जयंती मुहूर्त व पूजा विधी विडियो इन मराठी
26 December Margashirsha Purnima Annapurna Jayanti 2023 Muhurat V Puja Vidhi In Marathi
मार्गशीष महिन्यातील पूर्णिमा ह्या तिथीला अन्नपूर्णा जयंती साजरी करतात. धार्मिक मान्यता अनुसार माता पार्वती पृथ्वीवर प्रकट झाली होती म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यात पूर्णिमा ह्या तिथीला अन्नपूर्णा जयंती साजरी करतात. ह्या दिवशी अन्नपूर्णा माताची विधिपूर्वक पूजा अर्चा करतात.
26 डिसेंबर 2023 मंगळवार ह्या दिवशी अन्नपूर्णा जयंती आहे. असे म्हणतात की ह्या दिवशी मनोभावे पूजा केल्यास शुभ फळ मिळतात. आपले अन्न भंडार नेहमी भरलेले राहते.
26 डिसेंबर मंगळवार मार्गाशीष पूर्णिमा अन्नपूर्णा जयंती मुहूर्त व पूजा विधी ह्या विडियोची लिंक पुढे दिलेली आहे तेथे क्लिक करून पाहू शकता: माता अन्नपूर्णा पूजा
अन्नपूर्णा जयंती 2023 तिथि व शुभ मुहूर्त (Annapurna Jayanti 2023 Date And Shubh Muhurat)
अन्नपूर्णा जयंती तिथि- 26 डिसेंबर2023, मंगळवार
पूर्णिमा तिथि आरंभ: 26 डिसेंबर 2023 सकाळी 05 वाजून 46 मिनट
पूर्णिमा तिथि समाप्ती: 27 डिसेंबर 2023 सकाळी 06 वाजून 02 मिनट
माता अन्नपूर्णा पूजा विधि:
अन्नपूर्णा जयंती ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पूजाघर व स्वयंपाक घर साफ करून गंगाजल शिंपडावे मग गॅसवर कुंकूने स्वस्तिकची चिन्ह काढावे त्यावर हळद कुंकू अक्षता, फूल ठेवून पूजा करावी. मग गॅसच्या जवळ चौरंग ठेवून त्यावर वस्त्र घालावे एका पितळी किंवा तांब्याच्या धातूची प्लेट किंवा वाटी घेऊन त्यावर तांदूळ ठेवावे. त्यावर माता अन्नपूर्णाची मूर्ती अभिषेक करून ठेवावी. मग हळद-कुंकू, अक्षता व फूल वहावे. शेजारी गणपतीची मूर्ती ठेवावी. हळद कुंकू, अक्षता फूल वहावे. दुधाची खीर नेवेद्य ठेवावा. तुपाचा दिवा अगरबत्ती लावावी. पूजा झाल्यावर अन्न दान करावे.
माता अन्नपूर्णा कथा:
पौराणिक मान्यता अनुसार एकदा पृथ्वीवर अन्नाची कमी झाली आहे व लोक भुकेनि मरत आहेत. त्रासानी लोक बेजार होऊन त्यांनी ब्रह्मा विष्णुना प्रार्थना केली तेव्हा ब्रह्मा विष्णुनि शिवजीना झोपेमधून जागे केले व ह्या समस्या मधून लोकांची सुटका करण्यास सांगितले. तेव्हा शिवजीनि स्वतः पृथ्वीचे निरीक्षण केले मग माता पार्वतीने माता अन्नपूर्णाचे रूप घेऊन पृथिवर प्रकट झाली. त्यानंतर शिवजीनी पृथ्वीवर भिक्षुकचे रूप धरण करून माता अन्नपूर्णाकडे तांदळाची भिक्षा मागितली त्यानंतर ते तांदूळ त्यांनी भुकया लोकांमध्ये वाटले तेव्हापासून पृथ्वीवर अन्न व पाणीचे संकट नष्ट झाले. ज्या दिवशी पार्वती माता पृथ्वीवर प्रकट झाली तो दिवस मार्गशीष पूर्णिमा होती. तेव्हा पासून माता अन्नपूर्णाचा अवतरण दिवस मानला जातो.
माता अन्नपूर्णा मन्त्र:
अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकरप्राणवल्लभे ।
ज्ञानवैराग्यसिद्ध्य भिक्षां देहि च पार्वति ।।
टीप: जर आपल्या घरी अन्नपूर्णाची मूर्ती आणायची असेलतर मार्गशीष पूर्णिमा हा दिवस चांगला आहे त्या दिवसा पासून पूजा करावी. किंवा कोणत्या सुद्धा मंगळवारी किंवा शुक्रवारी मूर्ती आणावी. मूर्ती देवघरात ठेवताना नेहमी प्लेट किंवा वाटीत तांदूळ ठेवून ठेवावी. आठवड्यातून एकदा तांदूळ बदलावे व ते तांदूळ आपल्या रोजच्या तांदळात मिक्स करून परत दुसरे तांदूळ ठेवावे.