15जानेवारी 2024 मकर संक्रांति संपूर्ण माहिती
Makar Sankrant 2024 Sampurn Mahiti In Marathi
1) पूजा शुभ मुहूर्त, वाहन व स्वरूप
2) मकरसंक्रांति महत्व
3) पूजाविधी
4) नवी नवरीचे हळदी-कुंकू
5) लहान मुलांचे बोरनहाण
6) तिळाचे नानाविध पदार्थ
मकर संक्रांति हा सण नवीन वर्षातील पहिलाच सण आहे. मकर संक्रांति हा सण हिंदू लोक अगदी मनोभावे साजरा करतात हा एक महत्वाचा सन आहे. ह्या दिवसा पासून शुभ व मंगल कामे सुरू केली जातात. कारण ह्या दिवसापासून खारमासची समाप्ती होते. पौष महिन्यात जेव्हा सूर्य धनू राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हाच त्याला संक्रांती असे म्हणतात. काही ठिकाणी खिचडी ह्या नावावे हा सण प्रसिद्ध आहे. ह्या शुभ दिवशी लोक पवित्र नदीमध्ये स्नान करतात. व दानधर्म करतात. कारण की ह्या दिवशी दानधर्म करण्याचे अधिक महत्व आहे. ह्यादिवशी काळे तीळला जास्त महत्व आहे. तसेच काळे तीळ दान करण्याची पद्धत सुद्धा आहे.
The text Makar Sankranti 2024 Shubh Muhurth, Tithi, Mahatwa and Tilachya Recipes in Marathi be seen on our You tube Chanel Makar Sankranti 2024 Sampurn Mahiti
मकर संक्रांति’ शुभ मुहूर्त:
मकर संक्रांति : 15 जानेवारी 2024 सोमवार
मकर संक्रान्ति पुण्य काल – सकाळी 07 वाजून 15 मिनट ते संध्याकाळी 06 वाजून 21 मिनट पर्यन्त
मकर संक्रान्ति महा पुण्य काल – सकाळी 07 वाजून 15 मिनट ते सकाळी 09 वाजून 06 मिनट पर्यन्त ( महा पुण्यकाल मध्ये स्नान व दान करणे श्रेष्ठ मानले जाते)
रवि योग – सकाळी 07 वाजून 15 मिनट ते सकाळी 08 वाजून 07 मिनट पर्यन्त
संक्रांत वाहन व स्वरूप:
संक्रांत ह्या वर्षी घोड्यावर बसून येत असून उपवाहन सिंह आहे. तसेच काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला आहे, कपाळावर हळदीचा टिळा आहे. हातात वासासाठी दूर्वा असून नाव महोदरी आहे, सोने धरण केले आहे व वयोवृद्ध आहे. संक्रांत नैऋत्य दिशेकडे पहात असून पूर्व दिशेला जात आहे.
14 जानेवारी ह्या दिवशी भोगी आहे त्या दिवशी मिश्र भाजी, तिळाची भाकरी व खिचडी बनवतात.
15 जानेवारी ह्या दिवशी मकर संक्रांत आहे.ह्या दिवशी तीळचे गोड पदार्थ बनवतात व तीळगुळ घ्या गोड बोला असे म्हणतात.
16 जानेवारी ह्या दिवशी किंक्रांत आहे. म्हणजेच करी दिन आहे. ह्या दिवशी चांगले कोणते काम करीत नाही.
मकरसंक्रांति महत्व:
मकर संक्रांत ह्या दिवशी सूर्य भगवान ह्यांच्या बरोबर श्री गणेश व माता लक्ष्मी व भगवान शंकर यांची सुद्धा पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते. ह्या दिवशी तीळ व गूळ ह्याचे दान केल्याने पुण्य मिळते.
मकर संक्रांत ह्या दिवशी सुवासिनी आपले घर स्वच्छ करून जरीची साडी नेसून आपल्या संसारासाठी , घरासाठी व आपल्या सौभाग्यासाठी व आपल्या मुलाबाळांसाठी पूजा करतात. पुजा झाल्यावर 5 बोळक्यांची म्हणजेच सुगडची पुजा केली जाते. व ती पूजा केलेली बोळकी (सुगड) संवाष्ण महिलेला वाण म्हणून दिले जाते.पूजा झाल्यावर तीळ गुळाची पोळी व तिळाच्या वड्या किंवा तिळाचे लाडू बनवून नेवेद्य दाखवतात.
ऐतिहासिक महत्व:
मकरसंक्रांति ह्या दिवशी सूर्य देव आपले पुत्र शनि ह्यांना भेटायला जातात व शनिदेव हे मकर राशीचे स्वामी आहेत म्हणून ह्या दिवसाला मकर संक्रांति असे म्हणतात. ह्याच दिवशी भीष्म पितामह ह्यांनी आपला देह त्याग केला होता, ह्याच दिवशी गंगा नदी सागराला मिळाली होती, म्हणून ह्या दिवशी गंगा स्नान करतात. तसेच ह्या दिवसापासून थंडी कमी होत जाते.
मकर संक्रांति ह्या दिवशी दान, स्नान, श्राद्ध, तर्पण जप, तप ह्याचे जास्त महत्व असते.
मकर संक्रांतिच्या दिवशी सूर्य पूजाचे महत्व:
मकर संक्रांतीला महापर्व सुद्धा संबोधले जाते. ह्या दिवशी सूर्य देवचे उत्तरायण होत जाते अश्या वेळी आपण सूर्य देवाची मनोभावे पूजा अर्चा केली तर बरेच लाभ होतात व आपल्या जीवनातील कष्ट दूर होण्यास मदत होते. त्याच बरोबर व्यक्तिच्या आयूमध्ये वृद्धी होऊन तबेत चांगली राहते. असे म्हणतात की रवी योगमध्ये सूर्य देवाची पूजा केल्यास व्यक्तिच्या कामामध्ये सफलता मिळते.
मकरसंक्रांतिला बोळक्यांची (सुगड) पूजा कशी करायची
साहीत्य:
चौरंग व त्यावर स्वच्छ कापड
नवीन कापड बोळक्यांना झाकायला
पूजेचे सामान व फुले
5 मातीची बोकळी
1 पणती
दोरा बोळक्यांना गुंडाळण्यासाठी
बोळक्यांनमध्ये भरण्या साठी:
1 छोटे गाजर (चिरून)
10-15 पावटा शेगा
10-12 ताजी बोरे
1 छोटा उस तुकडे करून
5 भाताच्या ओंब्या
तीळ गूळ
नवीन कापड बोळक्यांना झाकायला
पुजा विधी:
प्रथम एका चौरंगवर नवीन कापड घालून त्यावर पाच बोळकी ठेवावी. प्रत्येक बोळक्याच्या तोंडाला दोरा गुंडाळावा व बाजूनी हळद कुंकु लावून प्रत्येक बोळक्यामध्ये गाजराचे तुकडे, पावटा शेगा, बोरे, ऊस तुकडे भाताच्या ओंब्या व तीळ गूळ घालावे. मग एका बोळक्यावर पणती ठेवून त्यावर फूल ठेवावे वरतून कापड घालावे.
मग पुजा करून प्रार्थना करावी की आमचा संसार सुखाचा होवो कोणाची सुद्धा नजर न लागो.
पुजा केल्यावर महिला देवळात जावून दुसर्या संवाष्ण महिलेला वाण देतात. संध्याकाळी घरी संवाष्ण महिलांना हळद कुंकू साठी बोलवतात. हळद कुंकू हे रथसपत्मी पर्यन्त करतात.
नवी नवरी हळदी कुकु:
मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन लग्न झालेल्या मुलीचे हळदी कुकु करतात तीला हलव्याचे दागीने घालून तेचे कौतुक करतात पहीले हळदी कुकु करतात. जरीची साडी भेट देतात.
लहान मुलांचे बोरन्हाण:
लहान मुलांचे बोर नहाण करतात म्हणजे लहान मुलाला नवीन कपडे घालून हलव्याचे दागीने घालून अजून बाकीच्या लहान मुलांना बोलवतात.
एका मोठ्या आकाराच्या भांड्यात चूरमुरे, साखर फुटाणे, गोळ्या, छोटी बिस्किटे, चॉक्लेट, ऊस, बोरे, हरभरे, मिक्स करून ज्याचे बोरन्हाण करायचे आहे त्याच्या डोक्यावर हळूहळू अभिषेक करतात. व हा सगळा खाऊ लहान मुलांना वाटतात. बोरन्हाण हे 5 वर्षा वयाच्या मुलांचे करतता.
तिळाच्या वड्या लाडू कसे बनवायचे त्याची लिंक येथे पहा: तिळाचे नानाविध पदार्थ वड्या, लाडू, पोळी