मकर संक्रांती 2024 शुभ रंग कोणता साडी व बांगड्यांचा शुभ व अशुभ रंग नक्की विडियो पहा
Makar Sankranti 2024 Significance Of Colour In Marathi
15 जानेवरी (पौष) 2024 सोमवार ह्या दिवशी मकर संक्रांत आहे. मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण आहे. हिंदू लोक मकर संक्रांत हा सण खूप मनोभावे साजरा करतात. महिलांचा तर हा सण खूप आवडीचा.
मकर संक्रांत ह्या दिवशी सूर्य धनू राशी मधून मकर राशी मध्ये प्रवेश करतो. तेव्हा त्याला संक्रांती असे म्हणतात. ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचे महत्व आहे.
मकर संक्रांति’ शुभ मुहूर्त:
मकर संक्रांति : 15 जानेवारी 2024 सोमवार
मकर संक्रान्ति पुण्य काल – सकाळी 07 वाजून 15 मिनट ते संध्याकाळी 06 वाजून 21 मिनट पर्यन्त
मकर संक्रान्ति महा पुण्य काल – सकाळी 07 वाजून 15 मिनट ते सकाळी 09 वाजून 06 मिनट पर्यन्त ( महा पुण्यकाल मध्ये स्नान व दान करणे श्रेष्ठ मानले जाते)
रवि योग – सकाळी 07 वाजून 15 मिनट ते सकाळी 08 वाजून 07 मिनट पर्यन्त
मकर संक्रांती ह्या दिवशी दरवर्षी जरीची काळी साडी नेसतात. नवी नवरीचे हळदी-कुंकू करतात तेव्हा तिला जरीची काळी साडी भेट म्हणून देतात. ह्या दिवशी काळ्या रंगाचे महत्व असते.
पण ह्या वर्षी संक्रांत घोड्यावर बसून येत असून उपवाहन सिंह आहे. तसेच काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला आहे, कपाळावर हळदीचा टिळा आहे. हातात वासासाठी दूर्वा असून नाव महोदरी आहे, सोने धरण केले आहे व वयोवृद्ध आहे. संक्रांत नैऋत्य दिशेकडे पहात असून पूर्व दिशेला जात आहे. त्यामुळे ह्यावर्षी संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करणे अशुभ आहे.
मकर संक्रांती ह्या दिवशी काळे वस्त्र परिधान करणे अशुभ आहे. कारण की ह्या वर्षी संक्रांत ही काळ्या रंगांवरच आली आहे. तर मग आपण कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता ते आपण पाहू या:
आपण महत्वाच्या पाच रंगा पैकी कोणता सुद्धा रंगाचे वस्त्र परिधान करू शकता:
* हिरवा रंग: हिरवा रंग हा खूप शुभ रंग मानला जातो. आपल्या सृष्टिचा रंग हिरवा आहे. आपण देवीची ओटी भरताना हिरवी साडी घेतो. लग्नात नवरी मुलगी हिरवा चुडा भरते व हिरवा शालू किंवा लाल रंगाचा शालू नेसते. सौभाग्यवती महिलांसाठी हिरवा रंग म्हणजे खूप भाग्य कारक असतो.
* लाल रंग: लाल रंग सुद्धा खूप शुभ आहे. नवरी मुलगी लग्नात लाल रंगाचा शालू नेसते. हळद व कुंकू ही सौभाग्याचे आहे ही आपल्याला माहीत आहेच. देवीची ओटी भरताना लाल साडी घेतात.
* गुलाबी रंग: आपल्या कडे गुलाबी रंगाची साडी किंवा ड्रेस असेलतर आपण घालू शकता.
* केशरी रंग: केशरी रंग हा सकारात्मक रंग आहे. त्यामुळे आपण ह्या रंगाची साडी नेसु शकता.
* पिवळा रंग: पिवळा रंग हा शुभ रंग आहे. हळद-कुंकू ही माहीत आहेच. लग्नाच्या अधल्या दिवशी नवरा-नवरीला हळद लावतात. सणवार ह्या दिवशी आपण घराच्या उमभरट्यावर हळदीचे लेपन करतो. पिवळा रंग हा नाकारात्मकता दूर ठेवतो.
मकर संक्रांतीला वरील 5 मुख्य रंग सांगितले आहेत ही रंग शरीराला ऊब देणारे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अजून आपण बाकीचे रंग सुद्धा वापरू शकता फक्त काळा रंग सोडून पण मकर संक्राती नंतर आपण काळे कपडे घालू शकता.
आपण मकर संक्रांती ह्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची ते पाहिले. मकर संक्रांती ह्या दिवशी महिला साज-शृंगार करतात तसेच नवीन बांगड्या भरायची सुद्धा पद्धत आहे. आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या भरू शकता. पण बांगड्या भरताना एक गोष्ट लक्षात ठेवा की एका हातात जर 6 बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातात 7 बांगड्या घालायच्या म्हणजे 1 बांगडी जास्त घालण्याची अशी पद्धत आहे. तसेच ह्या दिवशी लाखेच्या बांगड्या घालायची पद्धत आहे.