मकर संक्रांत 2024 राशीनुसार दान केल्याने पितरांचे आशीर्वाद मिळतात व सटीक उपाय
Makar Sankranti 2024 Rashinusaar Daan w Satik Upaay In Marathi
मकर संक्रांत ह्या वर्षी 15 जानेवारी 2024 सोमवार ह्या दिवशी आहे. ह्या दिवशी पूजा-पाठ जप-तप व दान-पुण्य करण्याचे महत्व आहे. त्याच बरोबर पितरांना तर्पण व पिंडदान केले जाते. मकर संक्रांती ह्या दिवशी पवित्र नदीमद्धे स्नान करण्याची प्रथा आहे व आपल्या आराध्य देवतांची पूजा केली जाते. मकर संक्रांती च्या दिवशी पितरांची पूजा केल्यास सुख व सौभाग्य मध्ये वृद्धी होते.
मकर संक्रांती ह्या दिवशी राशी नुसार पुढे दिलेल्या वस्तूंचे दान केल्यास पितरांचा आशीर्वाद मिळतो.
मकर संक्रांती हा दिवस कधी साजरा करतात जेव्हा सूर्य मकर राशीमद्धे प्रवेश करतो तेव्हा. ह्या दिवशी पितरांची पूजा नक्की केली पाहिजे.
आता आपण पाहू या कोणत्या राशीनी कोणते दान करायचे:
मेष राशी: मेष राशीच्या लोकांनी लाल मिरची, लाल वस्त्र किंवा मसूर डाळीचे दान करावे.
वृषभ राशि: वृषभ राशिच्या लोकांनी पांढरी वस्तु म्हणजे पांढरे तीळ, तिळाचे लाडू किंवा साखर दान करावी.
मिथुन राशि: मिथुन राशीच्या लोकांनी हिरव्या भाज्या, सीझन नुसार फळ, किंवा हिरवे मुग दान करावे.
कर्क राशि: कर्क राशीच्या लोकांनी गरीब गरजु लोकांना पांढरे वस्त्र व तूप दान करावे.
सिंह राशि: सिंह राशीच्या लोकांनी गूळ, चिक्की, मध व शेगदाणे दान करावे.
कन्या राशि: कन्या राशीच्या लोकांनी मुग डाळीची खिचडी गरीब लोकांना भोजन ह्या स्वरूपात दान करावी.
तुला राशि: तूळ राशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र, मखाना, तांदूळ व साखर दान करावी.
वृश्चिक राशि: वृश्चिक राशिच्या लोकांनी शेंगदाणे, गुळ व लाल रंगाचे गरम कपडे दान करावे.
धनु राशि: धनु राशीच्या लोकांनी पिवळे वस्त्र, केळी, बेसन, व चणे दान करावे.
मकर राशि: मकर राशीच्या लोकांनी काळे तीळ, काळे तिळाचे लाडू किंवा गरम घोंगडी दान कारवी.
कुंभ राशि: कुंभ राशी च्या लोकांनी गरम कपडे, मोहरीचे तेल किंवा चप्पल दान करावी.
मीन राशि: मीन राशीच्या लोकांनी पिवळी मोहरी, चनाडाळ, व सीझन नुसार फळ दान करावी.
मकर संक्रांतीच्या दिवशी करावयाचे सटीक उपाय:
मकर संक्रांत ह्या दिवशी पितरांना नेवेद्य दाखवल्यास वर्षभर पितर प्रसन्न राहतात. कुटुंबात वंशवृद्धी होते घरातील वातावरण आनंदी राहून आशीर्वाद मिळतात.
मकर संक्रांती ह्या दिवशी पशु पक्षांना बाजरी द्या, माशांना पिठाच्या गोळ्या द्या, मुंग्याना साखर घाला.
मकर संक्रांती ह्या दिवशी घरातील प्रतेक व्यक्तिच्या डोक्यावरून काळे तीळ 7 वेळा फिरवून उत्तर दिशेला फेकून द्या असे केल्याने रोगा पासून मुक्ती मिळते.
तुपाचे दान करा व तूप सेवन करा, त्यामुळे कीर्ती मिळून भौतिक सुख मिळते.
सूर्याला अर्ध्य द्यायला विसरू नका, अर्ध्य देताना पाण्यात लाल चंदन, लाल फूल, काळे तीळ, व गूळ घाला त्यामुळे मान-सन्मान वाढतो.
मकर संक्रांती ह्या दिवशी गायत्री मंत्र 108 वेळा म्हणा त्यामुळे घरात सुख- समृद्धी येते, रोग संपतात, घरात सकारात्मक ऊर्जा येते.