भोगी 2024 भोगी ह्या सणाच्या दिवशी काय करावे भोगीची भाजी कशी करावी
Bhogi 2024 Kay karave? Bhogichi Bhaji Kashi Banvaychi in Marathi
भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आधल्या दिवशी येतो. ह्या वर्षी 14 जानेवारी 2024 रविवार ह्या दिवशी भोगी आहे व 15 जानेवारी 2024 सोमवार ह्या दिवशी मकर संक्रांती आहे.
भोगी हा सण मुख्य करून शेतकरी लोक साजरा करतात. करणकी जानेवारी महिन्यात पीक बहरून कापणीसाठी तयार झालेली असतात. त्यामुळे धन-धान्यची समृद्धी असते.
भोगी 2024 भोगी ह्या सणाच्या दिवशी काय करावे भोगीची भाजी कशी करावी ह्याची विडियोची लिंक पुढे दिलेली आहे तेथे क्लिक करून पाहू शकता: भोगी माहिती व भाजी
भोगी ह्या सणाला दक्षिण भरतात पोंगल ह्या नावांनी ओळखला जातो तर उत्तर भारतात हा सण लोहरी म्हणून ओळखला जातो. भोगी हा सण भगवान सूर्यदेव व शेतकरी ह्यांच्याशी संबंधित आहे. शेतकरी लोक पिकांसाठी भगवान सूर्यनारायण ह्यांची पूजा करतात. श्रद्धा व समृद्धीचा सण पोंगल हा चार दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवस भोगी पोंगल, दूसरा दिवस सूर्य पोंगल, तिसरा दिवस मट्टू पोंगल तर चौथा दिवस कानुम पोंगल म्हणून साजरा करतात.
भोगी हा सण 14 जानेवारी 2024 रविवार ह्या दिवशी आहे. भोगीच्या दिवशी घराची साफसफाई करून नको असलेला कचरा किंवा नुरूपयोगी वस्तु बाहेर टाकाव्यात. भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यात तीळ घालून डोक्यावरून स्वच्छ स्नान करावे म्हणजे उन्हाळा बाधत नाही असे म्हणतात. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. सकाळी सूर्योदय झाला की सूर्य देवाला अर्ध द्यावे. अर्ध्य देताना पाण्यात काळे तीळ घालावे. सूर्यदेवाला प्रार्थना करावी. तुळशील पाणी घालावे. तसेच इन्द्र देवाची पूजा करतात.
आपल्या घरच्या मुख्य दरवाजा वरील उंबरठा आपण स्वतः स्वच्छ करून रंगोली काढावी घरातील मोलकरिणीला ही काम सांगू नये.
जानेवारी महिन्यात शेतात चांगल्या बऱ्याच प्रकारच्या भाज्या पिकतात. त्यामुळे भोगीच्या दिवशी मिश्र भाजी व बाजरीची तिळाची भाकरी बनवतात, असे म्हणतात की भोगीच्या दिवशी जो न खाई भोगी तो होई रोगी अशी म्हण आहे. म्हणून भोगी च्या दिवशी आवर्जून भोगीची भाकरी बनवतात.
आता आपण पाहू या भोगीची भाजी कशी बनवायची:
साहीत्य:
पाव किलो प्रतेकी वांगी, गाजर, वालपापडी
2 शेवगा शेगा, 1 बटाटा, 1 वाटी पावटा दाणे, 1वाटी मटार दाणे
1 मोठा कांदा (चिरून)
2 टी स्पून लाल मिरची पावडर
2 टी स्पून काळा मसाला
2 टे स्पून तीळ (भाजून) कुट
2 टे स्पून सुके खोबरे कीस भाजून कुट
2 टे स्पून चिंच कोळ
मीठ व गूळ चवीने
फोडणी करीता:
2 डाव तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
1/2 टी स्पून हळद
6-7 लसूण (ठेचून)
कृती: प्रथम सर्व भाज्या धुवून घ्या. वांग्याचे देठ कापून मोठे तुकडे करावेत. गाजराचे साल काढून त्याचे तुकडे करावेत. वालपापडी सोलून चिरून घ्या. शेवगा शेगा सोलून चीतून घ्या. कांदा बारीक चिरावा.
जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे,लसूण, हिंग, हळद घालून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या.
कांदा परतून झालकी त्यामध्ये चीरलेल्या वांग्याच्या फोडी, गाजराचे तुकडे, चिरलेली वालपापडी, शेवगा, बटाटे, मटार, पावटा घालून मिक्स करावे. पातेल्यावर झाकण ठेवून झाकणात पाणी घालून वाफेवर भाजी शीजवावी.
भाजी वाफेवर शिजल्यावर त्यामध्ये तिलकूट, खोबर्याचा कूट, लाल मिरची पावडर, मीठ, गूळ, काळा मसाला व दोन कप पाणी घालून भाजी चांगली शीजू द्यावी.
गरम गरम भाजी तिळाच्या भाकरी बरोबर सर्व्ह करावी.