आपल्या सर्वांना आयोध्या वरून श्रीराम ह्यांच्या प्राण प्रतिष्ठाचे आमंत्रण व पवित्र पिवळ्या अक्षता मिळाल्या आहेत. बरेच जणांना प्रश्न आहे की ह्या पवित्र अक्षताचे काय करायचे. ह्या नुसत्या अक्षता नसून त्या आपल्या घरी श्रीराम ह्यांच्या रूपात प्रगट झाले आहेत. त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी व आनंद येत आहे. आपल्या घरी श्री राम ह्यांच्या अक्षता आल्या आहेत ते आपले परम भाग्य समजावे. ह्या अक्षता आपल्याला खूप सांभाळून ठेवायच्या आहेत. कारणकी आपल्याला श्रीराम ह्यांच्या आशीर्वाद मिळाला आहे.
अक्षता ह्यांचा अर्थ कधीही नसंपणारा असा होतो. ह्या अक्षता संभाळून ठेवा त्याचा चांगल्या गोष्टीसाठी उपयोग करा.
आज आपण पाहणार आहोत की श्रीराम ह्यांच्या प्राण प्रतिष्ठाच्या दिवशी ह्या अक्षताचे काय करायचे. काही रामभक्त असे म्हणत आहेत की अक्षता थोड्या आहेत तर कसे काय करायचे पण चिंता करू नका. त्या अक्षता मधील एक एक दाणा खूप महत्वाचा आहे.
आपण ह्या पवित्र अक्षतांचे काय करायचे ते पाहू या.
आपण आपल्याला मिळालेल्या अक्षता पैकी काही अक्षता अश्या प्रकारे वापरा व राहिलेल्या अक्षता जपून ठेवा आपण जेव्हा आयोध्या येथे श्री राम ह्यांच्या दर्शनासाठी जाताल तेव्हा त्या अक्षता श्रीराम ह्यांच्या चरणा पाशी अर्पित करा.
एक दाणा देवा समोर ठेवा. दूसरा दाणा आपण आपल्या स्वयंपाक घरात ठेवू शकता, तिसरा दाणा आपण स्वादिष्ट भोजन म्हणजेच नेवेद्य बनवताना त्यामध्ये वापरा, चौथा दाणा आपण आपले धान्य जेथे साठवून ठेवतो तेथे ठेवा, पाचवा दाणा आपण आपल्या तिजोरीत आपण आपले धन जेथे ठेवतो तेथे ठेवा, अजून एक महत्वाचे जर आपल्या घरात मंगलकार्य होणार असेलतर त्यासाठी 2-3 दाणे वापरा म्हणजेच जर आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न होणार असेलतर आपण बनवलेल्या अक्षता मध्ये ह्या पवित्र अक्षता मिसळून मग वाटा त्यामुळे नवदाम्पत्याला श्रीराम ह्यांचे नेहमी आशीर्वाद मिळतील. आपण कोणत्या महत्वाच्या कामासाठी जाताना कपाळावर अक्षता लावा मग घरातून बाहेर निघा आपले काम होईल.
तसेच त्यामधील थोड्या अक्षता बाजूला काढून स्वच्छ जागी ठेवावे. म्हणजे कधी कोणत्या शुभ कामासाठी वापरता येतील.
आता आपण पाहू या की 22 जानेवारी ह्या दिवशी आपल्याला आपल्या घरी दिवाळी साजरी करायची आहे कारणकी आपल्या घरी श्री राम ह्यांचे आगमन होणार आहे. तेव्हा आपण पाच दिवे लावायचे आहेत.
एक दिवा आपण शुद्ध तुपाचा लावायचा आहे म्हणजेच फुलवातीचा व बाकीचे आपण दिवे लांब वातीचे लावले तरी चालतील तसेच आपण मातीच्या पणत्या वापरू शकता आपण जसे दिवाळीला वापरतो तश्या.
पहिला तुपाचा दिवा आपण श्रीराम ह्यांच्या मूर्ती किंवा फोटो समोर लावायचा आहे.
दूसरा दिवा आपण आपल्या देवघरात लावायचा आहे, दूसरा दिवा तुपाचा लावला तरी चालेल.
तिसरा दिवा आपण तुळशी वृंदावन जवळ लावायचा आहे.
चौथा व पाचवा दिवा आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाउल लावायचा आहे.
दिवे लाऊन झाल्यावर श्रीराम ह्यांची मनोभावे पूजा अर्चा करायची आहे. नेवेद्य दाखवून सर्वाना वाटायचा आहे. आपल्यावर व आपल्या घरावर श्रीराम ह्यांची नेहमी कृपा राहील.