29 जानेवारी 2024 तिळकुट चौथ संकष्टी चतुर्थी व्रत आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यसाठी
29 January 2024 Tilkut Chauth Sankashti Chaturthi Vrat Aaplya Mulansathi In Marathi
पौषमास कृष्ण पक्ष चतुर्थी म्हणजेच संकष्टी चतुर्थी साजरी करायची आहे. त्यालाच तिळकुट चौथ किंवा संकट चौथ असे सुद्धा म्हणतात. श्री गणेश भगवान ह्यांची पूजा अर्चा केल्यास आपल्या जीवनात सुख शांती व आशीर्वाद मिळतात.
तिळकुट चौथ हिंदू लोकांचा प्रसिद्ध सण आहे. त्यामध्ये श्री गणेश भगवान ह्यांची पूजा अर्चा करतात. धार्मिक मान्यता अनुसार संकट चौथच्या दिवशी व्रत ठेवल्यास आपल्या मुलांना दीर्घायुष्य व चांगले आरोग्य प्लाभते. ह्या दिवशी भगवान गणेश ह्यांना तिळाच्या लाडूचा भोग दाखवतात.
29 जानेवारी सोमवार ह्यादिवशी तिळकुट चौथ आहे. ह्या दिवशी चंद्रोदय रात्री 9 वाजून 26 मिनिटांनी होणार आहे. तिळकुट व्रत हे चंद्रोदय झाल्यावर मगच सोडतात. मग चंद्राची पूजा करून भोग दाखवून मग व्रत सोडतात.
तिळकुट व्रत कसे करायचे:
तिळकुट व्रत मध्ये महिला सकाळी लवकर उठून स्नान करून व्रत संकल्प करतात व विधिपूर्वक श्री गणपती बाप्पाची पूजा अर्चा करून संपूर्ण दिवस निर्जल व्रत ठेवतात. मग संध्याकाळी तिळकुट व्रतची कथा आईकतात. मग चंद्र दर्शन झाल्यावर त्याचे दर्शन घेऊन मगच उपवास सोडतात त्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही. श्री गणपती बाप्पाना तिळाच्या लाडूचा भोग दाखवतात.
संकष्टी चतुर्थी महत्व:
संस्कृत भाषेमध्ये संकष्टी ह्याचा अर्थ संकट म्हणजेच बाधा निवारण करणारा असा होतो. म्हणूनच संकष्टी चतुर्थीचे महत्व आहे. म्हणूनच ह्यादिवशी गणेश भगवानची पूजा केल्याने सर्व दुखांचा नाश होतो. गणेशजीना प्रसन्न करण्याचा हा दिवस चांगला शुभ आहे.जर आपल्यावर काही संकट आले असेलतर ह्या दिवशी गणेश भगवान ह्यांची पूजा अर्चा केली तर संकट निवारण होते.
संकष्टी चतुर्थी पूजा विधि:
आपण सुद्धा संकष्टी चतुर्थीचे व्रत करीत असाल तर त्याची पूजाविधी जाणून घ्या. ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून व्रत संकल्प करावा. मग गणेश भगवान ह्यांची पूजा करावी. त्यांना अभिषेक करावा. धूप दीप प्रज्वलित करावा. दूर्वा, लाल रंगाचे फूल अर्पण करावे. असे म्हणतात की गणशजी ना लाल रंगाचे फूल अतिप्रिय आहे ते अर्पण केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात. मग गणेश भगवान ह्यांना लाडू किंवा त्यांचे आवडतीचे मोदक ह्याचा नेवेद्य दाखवावा. मोतीचूरचे लाडू गणेशजिना खूप प्रिय आहेत. ह्या चतुर्थीला तीलकूट चतुर्थी सुद्धा म्हणतात तर तिळाचे लाडू नेवेद्य म्हणून दाखवावे. ह्या दिवशी ब्रह्मचर्यचे पालन करावे व सात्विक भोजन करावे. ह्या दिवशी शांत रहावे क्रोध करू नये. किंवा अपशब्द वापरू नये. पूर्ण दिवस उपवास करून रात्री आरती करून मग नेवेद्य दाखवून उपवास सोडावा. पूजा अर्चा झाल्यावर ॐ गण गणपतेय नम: किंवा ॐ गणेशाय नम: हा मंत्र जाप करावा.
संकष्टी चतुर्थी कथा:
हिंदू धर्म नुसार ह्या महिन्यातील चतुर्थीचे विशेष महत्व आहे. त्याच्या मागे एक पौराणिक कथा विघ्नहर्ता गणेशजी ह्यांच्या समबधित आहे. ह्या दिवशी श्री गणेशजी ह्यांच्या वर आलेले खूप मोठे संकट टळले होते. म्हणून ह्यादिवसाला संकट चतुर्थी म्हणतात. ह्या कहाणी नुसार एक दिवस माता पार्वती स्नान करण्यासाठी गेली असता तिने आपले पुत्र गणेश ह्याला दारा बाहेर पहारा देण्यास सांगितले व ती स्नान करण्यास आत गेली. गणेशजी बाहेर पहारा देत असताना तेव्हडयात भगवान शंकर माता पार्वती हयना भेटण्यास आले. तेव्हा गणेशजिनि त्याना अडवले तर शंकर भगवान खूप क्रोधित झाले व त्यांनी गणेशजीनचे त्रिशूलनि मुडके धडापासून कापले. माता पार्वतीला बाहेरील आवाज आइकू आला व ती धावत बाहेर आली व ते दृश पाहून ती खूप घाबरली. मग शंकर भगवान ची विनवणी करू लागली की गणेशजीना जीवदान द्या. माता पार्वतीची विनवणी आइकून शंकर भगवान ह्यांनी गणेश जिना जीवदान दिले पण त्यांना हत्तीच्या लहान मुलाचे तोंड लावले. म्हणूनच महिला ह्या दिवशी आपल्या मुलांच्या सलामतीसाठी व्रत करतात.