अतिशय आरोग्यदायी स्वादिष्ट पारंपारिक ओल्या हळदीची भाजी
Tasty Traditional Olya Haldichi Bhaji Maharashtrian Style Recipe In Marathi
कॅन्सर होण्यापासून बचाव हृदयरोग कोलेस्ट्रॉल बचाव करते स्कीनसाठी फायदेमंद रोगप्रतिकार शक्ति वाढवते लिव्हरचे आरोग्य चांगले राखते
ओली हळद आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेमंद आहे. आपण ह्या पूर्वी ओली हळद व आवळा ह्याचे लोणचे कसे बनवायचे ते पाहिले आता आपण ओली हळद वापरुन त्याची आरोग्यदायी भाजी कशी बनवायची ते पाहू या.
ओली हळद सेवनाने आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ति वाढते. त्यामध्ये अॅंटी ऑक्सिडेन्टचे गुणधर्म आहेत. इनसुलीनची पातळी व ग्लुकोजची पातळी योग्य ठेवते. आपली स्कीन निरोगी व चमकादार बनते. हृदय रोग व कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते. लिव्हरचे आरोग्य योग्य ठेवते.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
150 ग्राम ओली हळद
4 टे स्पून तूप
खडा मसाला
(3 लवंग, 10 मिरे, 1 तमालपत्र, 1” दालचीनी)
1 टी स्पून मोहरी
2 हिरव्या मिरच्या
1/4 वाटी हिरवे ताजे मटार
1” आल (किसून)
7-8 लसूण पाकळ्या (ठेचून)
1 मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
1 छोटा टोमॅटो चिरून
2 टे स्पून दही
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून धने पावडर
1 टी स्पून जिरे
1/2 टी स्पून हिंग
मीठ चवीने
कृती: प्रथम हळकुंड सोलून स्वच्छ धुवून किसून घ्या. कांदा व टोमॅटो चिरून घ्या. आल किसून घ्या, लसूण सोलून घ्या.
एक कढई मध्ये 2 टे स्पून तूप गरम करून त्यामध्ये खडा मसाला घालून थोडा गरम करून घ्या. मग त्यामध्ये किसलेली हळद घालून 8-10 मिनिट मंद विस्तवावर परतून घेऊन बाजूला प्लेटमध्ये काढून ठेवा.
त्याच कढईमध्ये 1 टे स्पून तूप घालून त्यामध्ये मोहरी, 1/4 टी स्पून हिंग व हिरव्या मिरच्या 1 मिनिट परतून घेऊन बाजूला काढून ठेवा. मग त्यामध्येच हिरवे मटार परतून घ्या व बाजूला काढून ठेवा.
आता त्याच कढईमध्ये 1 टे स्पून तूप घालून जिरे व 1/4 टी स्पून हिंग घालून बारीक चिरलेला कांदा थोडा परतून घेऊन आल-लसूण घालून ते सुद्धा 1 मिनिट परतून घ्या. आता चिरलेला टोमॅटो घाला, लाल मिरची पावडर, धने पावडर घालून थोडे परतून त्यामध्ये ओली हळद, हिरव्या मिरच्या मटार घालून मिक्स करून घ्या. आता त्यामध्ये दही घालून मिक्स करून मंद विस्तवावर थोडे तूप सुटे पर्यन्त परतून घ्या, सारखे हलवत रहा नाहीतर दही फुटू शकते.
आता त्यामध्ये गरम मसाला व मीठ घालून मिक्स करून दोन मिनिट गरम करून घ्या.
गरम गरम पारंपारिक ओल्या हळदीची भाजी चपाती किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करा.