In 10 Minutes Instant Sweet Delicious Rabdi Halwai Style In Marathi
10 मिनिटांत 1/2 लीटर दुधापासून 1/2 किलो इन्स्टंट रबडी हलवाई स्टाइल
रबडी ही स्वीट डिश सर्वाना आवडते. सणवार असो किंवा इतर दिवशी सुद्धा आपण रबडी बनवू शकतो. रबडी म्हंटले की आपल्या डोळ्या समोर येते हलवाईच्या दुकानातील रबडी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला हलवाई सारखे तासनतास दूध आटवायला ठेवून हलवत बसायची गरज नाही.
आपण घरच्या घरी अगदी बाजार सारखी रबडी बनवू शकतो व तेपण 10 मिनिटांत अगदी स्वादिष्ट रबडी. त्यासाठी आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची आहे ते म्हणजे आपल्याला फूल क्रीम दूध वापरायचे आहे. फूल क्रीम दूध म्हणजे म्हशीचे दूध वापरायचे आहे.
The text In 10 Minutes Instant Sweet Delicious Rabdi Halwai Style in Marathi be seen on our You tube Chanel In 10 Minutes Instant Sweet Delicious Rabdi Halwai Style
आपल्याला फक्त दूध गरम करून त्यापासून रबडी बनवायची आहे. आज आपण अगदी झटपट सोप्या पद्धतीने रबडी कशी बनवायची ते पाहू या:
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनीट
वाढणी: 2 जणांसाठी
साहित्य:
1/2 लीटर दूध (फूल क्रीम)
1/2 वाटी साखर
1 टी स्पून वेलची पावडर
2 टे स्पून मिल्क पाऊडर
1/2 कप दूध
2 टे स्पून गव्हाचे पीठ
ड्रायफ्रूट सजावटी करिता
थोडेसे केशर
कृती:
रबडी बनवण्यासाठी फुल क्रीमच दूध वापरायचे आहे. एका जाड बुडाच्या भांड्यात दूध गरम करायला ठेवा. ड्रायफ्रूटचे तुकडे करून घ्या.
एक बाउल घेऊन त्यामध्ये मिल्क पाऊडर व गव्हाचे पीठ घेऊन मिक्स करून त्यामध्ये दूध घालून मिक्स करून घ्या, पण गुठळी राहता कामा नये.
दूधला उकळी आली की त्यामध्ये मिल्क पाऊडर व गव्हाच्या पिठाचे मिश्रण हळू हळू घालून मिक्स करत जा. विस्तव आपल्याला मंद ठेवायचा आहे.
आता दूध हळू हळू घट्ट होऊ लागेल दूध घट्ट व्हायला लागले की त्यामध्ये साखर घालून मिक्स करून घ्या साखर विरघलळिकी त्यामध्ये वेलची पावडर व ड्रायफ्रूट घालून मिक्स करून घ्या.
रबडी थंड झाल्यावर सर्व्ह करा, सर्व्ह करताना वरतून ड्रायफ्रूटने सजवून मग सर्व्ह करा.