समर ब्युटि टिप्स: उन्हात चेहरा व हात अगदी काळे पडले, 5 घरगुती नुख्खे मिनिटांत करतील टैनिंग
Summer Beauty Tips: Home Remedies How To Remove Tan Skin In Marathi
उन्हाळ्यात आपला चेहरा व हात फार लवकर काळे पडतात. टैनिंग मुळे ते खराब सुद्धा दिसतात. आपल्या हातांना टैन पासून वाचवायचे असेलतर पुढे दिलेले उपाय खूप प्रभावी आहेत ज्याचा एकदा किंवा दोनदा उपयोग केल्यास लगेच फरक जाणवू लागेल.
उन्हाळ्यामध्ये सुट्टी एन्जॉय करणे फार कठीण होते कारण की बाहेर गेले की चेहरा लगेच काळा दिसायल लागतो. चेहऱ्या नंतर हात लगेच काळे दिसायल लागतात. त्यामुळे आपली स्कीन लगेच डल दिसायल लागते. बरेच वेळा कडक उन्हा मुळे आपल्या हाताची स्कीन जळल्या सारखी दिसते व त्यामुळे टैनिंग काढणे खूप अवघड होऊन बसते.
The text Summer Beauty Tips: Home Remedies How To Remove Tan Skin in Marathi be seen on our You tube Chanel Summer Beauty Tips: Home Remedies How To Remove Tan Skin
आपले हात शरीराचा जो हिस्सा आहे त्याच्यावर उन्हाचा लगेच संपर्क येतो. त्यामुळे सर्वात जास्त टैनिंग हातावर होते. काही महिला इतक्या परेशान होतात की त्या लगेच पार्लरच्या चकरा मारायला लागतात. पण आपण काही घरगुती उपाय केले तर त्याचा लगेच उपयोग होतो.
ब्रांडेड कॉस्मेटिक प्रोडक्ट्स वापरणे खूप महागाचे पडते. पण जर आपण घरगुती उपाय केलेतर स्वस्त व मस्त होते. म्हणूनच आम्ही येथे काही घरगुती अगदी स्वस्त व मस्त सोपे उपाय सांगत आहोत.
लिंबुरस व मध:
लिंबुरस हा एक ब्लीचिंग एजेंट आहे, जो टैन स्कीनला कमी करण्यास मदत करतो. तसेच मध ही एक नेचुरल बॉडी लोशन च्या रूपात काम करते. लिंबुरस व मध एंटीऑक्सीडेंटचे सर्वात चांगले स्त्रोत आहे जे स्कीनला डैमेज होण्या पासून वाचवते. टैनिंग काढण्यासाठी लिंबुरस व मध मिक्स करून हातावर लावा मग 30 मिनिट नंतर कोमट पाण्यांनि धुवा
काकडीचा रस:
काकडी ही स्कीनची आग होत असेलतर शांत करते तसेच स्कीनला हाइड्रेट करण्यासाठी मदत करते. पण जेव्हा आपली हाताची स्कीन टैनिंग होते तेव्हा प्रथम काकडी सोलून किसून त्याचा रस काढून घ्या. मग कापसाच्या बोळयांनी आपल्या हाताच्या स्कीनवर लावा मग सुकल्या नंतर पाण्यानि धुवून टाका.
बटाट्याचा रस:
बटाटा आपल्या डार्क सर्कलवर कमालीचे काम करते. ते आपल्या टैन झालेल्या स्कीनवर छान घरगुती उपाय आहे. त्यासाठी बटाटे सोलून किसून त्याचा रस काढून आपल्या हातावर लावा सुकल्यावर गरम पाण्यांनी धुवून टाका मग मॉइश्चराइजर लावा.
दही व टमाटर:
टोमॅटो मध्ये एंटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आहेत ते आपल्या स्कीनला चमकदार बनवते व त्याच बरोबर टैनिंग सुद्धा दूर करते. त्याच बरोबर दह्यामध्ये लैक्टिक एसिड आहे ते नेचुरल मॉइश्चराइजरचे काम करते. तसेच ते स्कीनचे पोषण करते व मुलायम बनवते. टैनिंग घालवण्यासाठी कचा टोमॅटो सोलून त्यामध्ये 1-2 चमचे दही घालून मिक्स करून घ्या. मग आपल्या हातावर ती पेस्ट लाऊन 20 मिनिट नंतर थंड पाण्यांनी धुवून टाका.
स्ट्रॉबेरी व क्रीम:
हातावरील टैनिंग घालवण्यासाठी स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवून घ्या. हा मिल्कशेक फक्त डेजर्ट नहीं तर एक टैन रिमूवर सुद्धा आहे. टैन घालवण्यासाठी ताजी स्ट्रॉबेरी व दूध ब्लैंड करून त्याची पेस्ट हातावर लावा 15 मिनिट नंतर थंड पाण्यानी धुवा.