टिप्स अँड ट्रिक्स: रोजची राहिलेली चहा पत्ती फेकून न देता त्याचे अनेक फायदे
Tips & Tricks Roj Cha Chha Karun Zala Ki Takun Deta Tyache Fayde Pha In Marathi
चहा हा एक असा पदार्थ आहे की तो भारतभर व भारताच्या बाहेर सुद्धा आवडतो. जग भरातिल लोक आवडीने चहा पितात. चहा हा आपल्या जीवनातील एक हिस्सा आहे. आपल्याला सकाळी उठल्यावर चहा घेतले की ताजेतवाने वाटते त्यामुळे सकाळी उठल्यावर चहा हा पाहिजेच.
The text InTips & Tricks Roj Cha Chha Karun Zala Ki Takun Deta Tyache Fayde Pha In Marathi in Marathi be seen on our You tube Chanel Tips & Tricks Roj Cha Chha Karun Zala Ki Takun Deta Tyache Fayde Pha
आपण रोज चहा बनवतो व चहा गाळून झाला की आपण चहा पत्ती फेकून देतो. आपल्याला वाटते की ती काही उपयोगाची नाही पण ती फेकून न देता त्याचे बरेच उपयोग होतात. त्याचा आपण परत उपयोग करू शकता.
आज आपण पाहू या रोजच्या राहिलेल्या चहा पत्तीचे काय करायचे ते पाहू या:
1. रोजचा चहा बनवून झाला की चहा पत्ती फेकून न देता ती साठवून ठेवा. त्याचा उपयोग आपण झाडांना खत म्हणून वापर करू शकतो. त्यासाठी आपण काय करायचे की रोजची चहा पत्ती आपण साठवून मग उन्हात वाळवून माती मध्ये मिक्स करून मग झाडांना खत म्हणून टाकू शकतो.
2. रोजची चहा पत्ती साठवून ठेवा. मग काचेची भांडी धुताना किंवा तेलकट भांडी धुताना ती चहा पत्ती वापरा त्यामुळे काचेची भांडी छान चमकदार होतात व तेलकट भांडी सुद्धा मस्त निघतात. त्यासाठी भांड्याच्या सोप मध्ये चहा पत्ती मिक्स करा व त्यांनी भांडी घसा मग बघा भांडी कशी दिसतात.
3. आपण गॅसचे बर्नर सुद्धा छान साफ करू शकतो. त्यासाठी एका भांड्यात राहिलेली चहा पत्ती घेऊन पानी घालून उकळी काढून घ्या मग त्यामध्ये डिशवॉश घालून त्यांनी चिकट डब्बे साफ करा.
4. राहिलेली चहा पत्ती जखम भरून काढण्यासाठी उपयोगी आहे. खर म्हणजे चहा पत्ती मध्ये अॅंटीऑक्सिडेन्टचे गुण आहेत ते जखम भरून काढण्यासाठी मदत करतात. त्यासाठी काय करायचे राहिलेली चहा पत्ती धुवून परत उकळून घेऊन थंड झाल्यावर जखमेवर लावायची मग थोडा वेळांनी जखम धुवावी. मग जखम लवकर भरून येते.
5. माशा पळवून लावण्यास मदत होते: राहिलेली चहा पत्ती परत पाण्यात उकळून घेऊन मग त्या पाण्यानी जेथे माशा येतात तेथे पोछा मारा माशा येणार नाहीत.
6. चहा बनवून झाल्यावर चहा पत्ती फेकून न देता आपण ती धुवून मग उन्हात वाळवून मग डब्यात भरून ठेवा व परत चहा बनवण्यासाठी वापरू शकतो.