स्वादिष्ट झटपट रताळ्याची खीर उपवास स्पेशल
Delicious (Ratalyachi) Sweet Potato Kheer For Fasting Recipe In Marathi
उपवास म्हंटले की आपल्याला साबुदाणा खिचडी, रताळ्याच्या किस्स डोळ्या समोर येतो. तसेच आपण उपवासाच्या दिवशी नानाविध पदार्थ बनवत असतो. पण आपण रताळ्याची खीर बनवली आहे का? बनवून बघा खूप छान टेस्टि लागते.
The Delicious (Ratalyachi) Sweet Potato Kheer For Fasting in Marathi be seen on our You tube Chanel Delicious (Ratalyachi) Sweet Potato Kheer For Fasting
रताळी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. रताळ्यामद्धे विविध गुण आहेत ते फायदेशीर आहेत. रताळ्याच्या सेवनाने शरीराचे वजन नियंत्रणात राहते. तसेच अनेक समस्यावर उपयोग असून त्यापासून सुटका मिळू शकते. त्यासाठी रोज रताळ्याचे सेवन करावे.
मधुमेह रुग्णांसाठी रताळे सेवन करणे फायदेशीर आहे, तसेच रक्तदाब नियंत्रणात राहतो. रोग प्रतिकार शक्ति वाढते, रताळ्यामद्धे लोह आहे ते आपल्या शरीराला उपयुक्त आहे.
आता आपण पाहू या उपवासाची रताळ्याची खीर कशी बनवायची:
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 2 जणसाठी
साहित्य:
1 मोठ्या आकाराचे रताळे
1/2 लीटर दूध
1/2 कप साखर
1 टे स्पून तूप
1 टी स्पून वेलची पावडर
ड्रायफ्रूटस सजावटी करिता
कृती: रताळे स्वच्छ धुवून, साल काढून किसून घ्या. मग 2-3 वेळा पाण्यानी धुवून घ्या म्हणजे त्याचा राप निघून जाईल व रताळे स्वच्छ दिसेल.
एका कढईमध्ये तूप गरम करून घेऊन त्यामध्ये किसलेले रताळे घालून मंद विस्तवावर परतून घ्या म्हणजे ती छान खमंग लागतील. मग त्यामध्ये दूध घालून मिश्रण एक सारखे करून मंद विस्तवावर 10 मिनिट आटवून घ्या.
मिश्रण आटले की त्यामध्ये साखर, वेलची पावडर व थोडे ड्राय फ्रूट घालून मिक्स करून घेऊन 2 मिनिट गरम करून घ्या म्हणजे साखर विरघळेल मग विस्तव बंद करा.
आता रताळ्याची खीर गरम गरम किंवा थंड करून सर्व्ह करा.