महाशिवरात्रीला करा हे सोपे उपाय भोलेनाथ प्रसन्न होऊन करतील सर्व मनोकामना पूर्ण
Mahashivratri 2024 Satik Upay Hotil Bholenath Prasanna In Marathi
दरवर्षी फाल्गुन मास कृष्ण पक्ष चतुर्थी तिथी ह्या दिवशी महाशिवरात्री साजरी करतात. सनातन धर्ममध्ये देवांचे देव महादेव ह्यांची पूजा अर्चा करण्यासाठी महाशिवरात्री हा दिवस सर्वोत्तम मानला जातो.
दरवर्षी फाल्गुन मास कृष्ण पक्ष चतुर्थी ह्या तिथीला महाशिवरात्री साजरी करतात. सनातन धर्म मध्ये देवांचे देव महादेव ह्यांची पूजा अर्चा करणे उत्तम मानले जाते. शिवपुराण नुसार माता पार्वती व भगवान शिव ह्यांच्या विवाह महाशिवरात्री ह्या दिवशी संपन्न झाला होता. असे म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव व माता पार्वती ह्यांची मनोभावे पूजा अर्चा केल्याने रोग दूर होतात, व काही सटीक उपाय केल्याने भगवान शिव प्रसन्न होऊन मनोकामना पूर्ण होतात.
1. रोग बरे होतात:
महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात दूध, मिश्री व काळे तीळ टाकून शिवलिंग अभिषेक करा. अभिषेक करण्यासाठी तांब्याचा कलश सोडून दुसऱ्या कोणत्या सुद्धा कलशाचा उपयोग करा. अभिषेक करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून ॐ जुं स: मंत्र जाप करा. धार्मिक मान्यता अनुसार असे केल्याने रोगा पासून मुक्ती मिळेल.
2. मनोकामना पूर्ण होतील:
महाशिवरात्री ह्या दिवशी 21 बेलची पान घेऊन चंदनाच्या पेस्टनि त्यावर ॐ नम: शिवाय लिहून आपल्या मनात आपली मनोकामना बोलून एक एक बेल पत्र शिवलिंगवर अर्पित करा. असे केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतील.
3. विवाह लवकर होईल:
जर कोणाच्या विवाहमध्ये अडचणी येत असतील तर महाशिवरात्री च्या दिवसापासून रोज केशर मिश्रित दूध अर्पित करा असे केल्याने विवाह लवकर होण्याचे योग जुळून येतील. भगवान शिव ह्यांना पिवळ्या रंगाचे फूल अर्पित करा. त्याच बरोबर शिवलिंग वर अत्तर अर्पित करा.
4. मानसिक शांती मिळेल:
महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून जवळच्या शिवालयमध्ये जाऊन भगवान शिव ह्यांना जल अभिषेक करून शुद्ध चंदनाचा लेप लावा. मग मंदिरात थोडावेळ शांतपणे बसून ॐ नम: शिवाय ह्या मंत्राचा जाप करा. त्यामुळे मनशांति मिळेल व रोग बरे होण्यास मदत मिळेल. असे नियमित रोज करा.
5. अन्य उपाय:
* महाशिवरात्रीच्या दिवशी नंदी (बैल) ला चारा खाऊ घाला. त्यामुळे कष्ट निवारण होऊन जीवनात सुख समृद्धी येईल व मन प्रसन्न होईल.
* शास्त्रामध्ये अन्न दान ही महादान मानले जाते. ह्या दिवशी गरीब लोकाना भोजन द्या, त्यामुळे आपल्या घरात कधी सुद्धा अन्नाची कमतरता भासणार नाही व त्याच बरोबर पितरांनच्या आत्म्याला शांती मिळेल.
* कार्यामध्ये विघ्न-बाधा आपसात कलह, व रोग बिमारी अश्या सर्व परेशानी दूर होतील त्यासाठी घरात उत्तर-पूर्व (ईशान्य) ह्या ब्रह्म स्थान वर रुद्राभिषेक केल्याने शुभ फळ मिळतील.
* भगवान शिव ह्यांचा ॐ नम: शिवाय हा मंत्र कोणत्या सुद्धा वेळी करता येऊ शकतो. त्यामुळे धार्मिक लाभ व स्वास्थ लाभ सुद्धा मिळतात. त्यामुळे आपल्या शरीरातील सर्व इंद्रिय जागी होतात.