भोपळ्याच्या भाजी बरोबर हे पदार्थ खाल्ले तर शरीरावर होतील वाईट परिणाम
What Should Not Eat with Bottle Gourd,Side Effects In Marathi
दुधी भोपळा किंवा दूसरा कोणता सुद्धा भोपळा वापरुन आपण भाजी बनवतो पण आपल्याला माहिती आहे का? आपण जेवताना भोपळा भाजी सेवन करतो तेव्हा त्याच्या बरोबर काही पदार्थ वर्ज आहेत. त्याची माहिती आपण आता पाहू या.
The What Should Not Eat with Bottle Gourd,Side Effects in Marathi be seen on our You tube Chanel What Should Not Eat with Bottle Gourd,Side Effects
भोपळ्याची भाजी सर्वाना आवडते ती आपण निरनिराळ्या पद्धतीने बनवत असतो व घरात सर्वजण आवडीने खातात सुद्धा. भोपळा भाजी झटपट बनवता येते व ती शिजते सुद्धा पटकन. तसेच ती थोडी गोड सुद्धा असते त्यामुळे मुले आवडीने खातात. आपण बरेच वेळा भोपळ्याच्या भाजी बरोबर अजून काही पदार्थ खातो व ते आपल्या शरीराच्या दृष्टीने घातक सुद्धा असतात.
भोपळा सेवन करण्याचे फायदे:
भोपळ्याचा ज्यूस सेवन केल्याने युरीक असिड पासून आराम मिळतो. जर पोटाचे स्वास्थ ठीक नसेलतर भोपळ्याचा ज्यूस सेवन करा. त्याने फायदा होईल.
हृदय रोगासाठी भोपळा खूप फायदेमंद आहे. त्याच्या मध्ये लो सैचुरेटेड फैट्स आहेत. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहून हार्ट डिसीज स्ट्रोक पासून बचाव होतो.
जर आपल्याला नेहमी डोके दुखीचा त्रास होत असेलतर डोक्यावर भोपळ्याचे तेल लावा त्यामुळे आराम मिळेल. ह्या तेलामुळे टक्कल पडत नाही. तसेच खोकल्या पासून आराम मिळतो.
भोपळा हा आपल्या किचन मधील सुपर इनग्रेडिएंट आहे. त्याच्या पासून आपण सूप, भाजी, रायता, हलवा बनवतो. भोपळा हा आरोग्यदायी आहे त्याच्या सेवनाने बरेच रोग बरे होतात. त्याच्या मध्ये 96&% पाण्याचा अंश आहे. तसेच आपल्या शरीराची संपूर्ण हेल्थ त्याच्या सेवनाने चांगली राहू शकते.
आता आपण पाहूया भोपळाच्या भाजी बरोबर कोणते पदार्थ वर्ज आहेत.
आपल्याला माहिती आहे का? भोपळाच्या बरोबर 5 गोष्टी सेवन करणे वर्ज आहे. त्याच्या मुळे आपल्या शरीराला नुकसान होऊ शकते.
* भोपळ्याच्या भाजी बरोबर कारले किंवा बीटरूट कधी सुद्धा सेवन करू नये. त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. म्हणजेच भोपळ्याच्या बरोबर कारले किंवा बीटरूट सेवन केलेतर चेहऱ्यावर पुरळ येते व त्याचे दाग सुद्धा पडू शकतात.
* कॉलिफ्लॉवर, कोबी, ब्रोकोली ह्या भाज्याच्या सेवनाने पोटात गॅस होण्याचा संभव असतो. त्यामुळे ह्या भोपळा बरोबर ह्या भाज्या मिक्स करून सेवन करू नये. त्यामुळे पोटात गॅस होऊन सूज येवू शकते.
* भोपळा बरोबर कोणते सुद्धा आंबट पदार्थ सेवन करू नयेत. जसेकी आंबट फळ किंवा लिंबू त्यामुळे पोटात दुखू शकते.
* भोपळा बरोबर डेयरी प्रॉडक्ट सेवन करू नये त्यामुळे पचन संबंधित समस्या होऊ शकतात.
* भोपळा व कारले ह्याची भाजी एकसाथ सेवन केली तर पोटात विश निर्माण होऊन उलट्या होऊ शकतात व नाकातून रक्त सुद्धा येऊ शकते.