मऊ कापसा सारखी कर्नाटक स्पेशल थट्टे इडली तट्टे इडली किंवा प्लेट इडली चटणी सोबत
Karnataka Special Hotel Style Thatte Idli With Chutney Recipe In Marathi
थट्टे म्हणजे कन्नड भाषेत प्लेट म्हणतात. म्हणजेच प्लेट मधील इडली. थट्टे इडली बनवण्यासाठी इडली स्टँडची गरज भासत नाही. इडली ही डिश संपूर्ण भारतात तसेच भारता बाहेर सुद्धा प्रसिद्ध आहे. थट्टे इडली ही तांदूळ, उडीद डाळ, पोहे किंवा साबुदाणा वापरुन तयार केली जाते. नारळाची चटणी व साबर बरोबर सर्व्ह करतात.
The Karnataka Special Hotel Style Thatte Idli | Plate Idli in Marathi be seen on our You tube Chanel Karnataka Special Hotel Style Thatte Idli
थट्टे इडली ही खूप पौष्टिक आहे. पचायला हलकी व स्वादिष्ट लागते. तसेच अगदी कमी श्रमात बनवता येते. तसेच ह्यामध्ये बेकिंग सोडा किंवा इनो वापरलेला नाही. तरी सुद्धा कापसा सारखी मऊ इडली बनते.
साहित्य:
2 कप तांदूळ
1 कप उदिडदाळ
3/4 कप पोहे
1 1/2 टी स्पून मीठ
तेल प्लेटला लावायला
चटणी:
साहित्य:
1 कप ओला नारळ खोवून
1/2 कप कोथिंबीर+पुदिना पाने
5-6 लसूण पाकळ्या
1/2” आले
1 टी स्पून लिंबुरस
1 टी स्पून साखर
मीठ चवीने
कृती: इडली बनवण्यासाठी तांदूळ आंबेमोहर किंवा बासमती वापरू नये. डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून 4-5 तास भिजत ठेवावे. मग प्रथम उडीदडाळ थोडेसे पाणी वापरुन बारीक वाटून घ्यावी. मग तांदूळ मिक्सरच्या जार मध्ये घेऊन त्यामध्ये पोहे धुवून घालावे व बारीक वाटावे. एका मोठ्या आकाराच्या भांड्यात वाटलेली डाळ, तांदूळ व मीठ घालून एक सारखे व्यवस्थित हालवून झाकून 8 तास बाजूला ठेवावे.
इडली पात्र किंवा पसरत भांडे घेऊन त्यामध्ये पाणी ठेवून त्यामध्ये एक स्टँड ठेवून ताट किंवा मोठी प्लेट ठेवावी पाणी गरम होऊ द्यावे. थट्टे इडली बनवताना मध्यम आकाराच्या प्लेट किंवा डब्याची झाकण घेऊन त्याला तेलाचा हात लावून एक मोठा डाव मिश्रण टाकावे. मग त्या छोट्या ताटल्या ठेवून झाकण ठेवावे व 12 ते 15 मिनिट इडली वाफवून घ्यावी.
चटणी बनवण्यासाठी मिक्सर जार मध्ये ओले खोबरे, कोथिंबीर, पुदिना, लसूण, आले, लिंबुरस, साखर, मीठ व थोडेसे पाणी घालून वाटून घ्या.
आता थट्टे इडली व चटणी किंवा सांबर बरोबर सर्व्ह करा.