Holi Special Khuskushit Rawa Mawa Karanji Recipe In Marathi
होली स्पेशल खुसखुशीत रवा-मावा करंजी अगदी सोपी निराळी पद्धत
होली हा सण भारतात अगदी भूम धडाक्यात साजरा करतात. होळीच्या दिवशी काही गोड पकवान बनवतात. महाराष्टमध्ये पुराण पोळी बनवतात तर उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेश मध्ये गुजिया बनवतात. गुजिया म्हणजेच करंजी.
The Holi Special Khuskushit Rawa Mawa Karanji in Marathi be seen on our You tube Chanel Holi Special Khuskushit Rawa Mawa Karanji
करंजी आपण निरनिराळ्या पद्धतीने बनवतो. करंजी हा पदार्थ महाराष्ट किंवा इतर प्रांतात खूप प्रसिद्ध आहे. आपण करंजी निरनिराळ्या पद्धतीने बनवतो. करंजी च्या विविध पद्धती व विविध प्रकार आपल्याला पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक (विवध प्रकारच्या करंज्या) करून पाहायला मिळतील.
आज आपण रवा व मावा वापरुन करंज्या कश्या बनवायच्या ते पाहू या. रवा मावा करंजी बनवायला सोपी व झटपट होणारी आहे. तसेच त्यामध्ये रवा, डेसिकेटेड कोकनट, मावा व ड्रायफ्रूट भाजून घातले आहेत. त्यामुळे त्याची टेस्टि खूप छान येते. आपण अश्या प्रकारच्या करंज्या दिवाळी साठी सुद्धा बनवू शकता.
साहित्य:
आवरणासाठी:
2 कप मैदा
3 टे स्पून तूप
चिमुट भर मीठ
सारणासाठी:
1 कप रवा
1/4 कप डेसिकेटेड कोकनट
100 ग्राम खवा
ड्रायफ्रूट (तुकडे करून)
1 कप पिठीसाखर
2 टे स्पून तूप
करंजी तळण्यासाठी तेल अथवा तूप
कृती: आवरणासाठी: एका बाउलमध्ये मैदा, तूप व मीठ मिक्स करून त्यामध्ये थोडे थोडे पाणी वापरुन घट्ट पीठ मळून घेऊन बाजूला झाकून ठेवा.
सारणासाठी: एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घालून ड्रायफ्रूट परतून घ्या.
मग त्यामध्ये डेसिकेटेड कोकनट घालून 2 मिनिट परतून घ्या. मग एक बाउल मध्ये काढून घ्या. त्याच पॅन मध्ये 1 1/2 टे स्पून तूप घालून रवा मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घ्या. रवा भाजून झाल्यावर काढून घ्या.
मग त्याच पॅनमध्ये मावा मंद विस्तवावर 2-3 मिनिट परतून घ्या. मग थंड झाल्यावर एका बाउल मध्ये ड्रायफ्रूट, डेसिकेटेड कोकनट, रवा, मावा, पिठीसाखर, वेलची पावडर घालून मिक्स करून घ्या. आता आपले सारण तयार झाले.
करंजी बनवण्यासाठी: मळलेल्या पिठाचे लिंबा एव्हडे गोळे बनवून पुरी सारखे पातळ लाटून घ्या. मग त्यामध्ये 1 ते 1 1/2 टे स्पून सारण ठेवून पुरी अर्धी मुडपून घेऊन त्याच्या कडा दाबून घ्या. व कटरनी मुडपलेली बाजू कापून टाका. अश्या प्रकारे सर्व करंज्या बनवून घ्या. करंज्या बनवताना एक कपडा ओला करून घट्ट पिळून त्यावर करंज्या ठेवा म्हणजे सुकणार नाहीत.
कढईमध्ये तेल किंवा तूप गरम करून मध्यम विस्तवावर करंज्या छान खमंग अश्या तळून घ्या.
थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.