शीरा-खीर बनवायला विसरून जाल, अश्या प्रकारची शाही स्वीट डिश बनवली तर सगळे तारीफ करतील
Sweet Delicious Kimami Sewai Lucknow Style Recipe In Marathi
आपण नेहमी शीरा किंवा खीर बनवतो. पण कधी कधी आपल्याला खीर किंवा शीरा बनवायचा किंवा खायचा सुद्धा कंटाळा येतो मग आपण काही तरी वेगळे बनवावे म्हणून विचार करतो. त्यासाठी ही नवीन खूप स्वादिष्ट रेसिपी पहा, ही स्वीट डिश खाऊन आपले मन तृप्त होईन सगळे खूप तारीफ करतील.
The Sweet Delicious Kimami Sewai Lucknow Style in Marathi be seen on our You tube Chanel Sweet Delicious Kimami Sewai Lucknow Style
आपण शेवया ची खीर किंवा शीरा बनवतो पण ह्या रेसिपी मध्ये ह्या दोन्ही पद्धती न वापरता एक मस्त स्वीट डिश बनवून या. आपल्या ला बाजारात अगदी बारीक भाजलेल्या किंवा बिना भाजलेल्या शेवया मिळतात त्या आपण वापरायच्या आहेत. जाड शेवया आजिबात वापरायचा नाही तर आपली स्वीट डिश चांगली बनणार नाही.
आपण जर एकदा ही स्वीट डिश बनवली तर नेहमी बनवाल कारणकी बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. तसेच खूप टेस्टि आहे.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 2 जणसाठी
साहित्य:
2 कप बारीक सेवया
3 टे स्पून तूप
1 कप दूध
3/4 कप साखर
ड्रायफ्रूट तुकडे करून
3/4 कप मिल्क पाऊडर
1/2 कप दूध
1 टी स्पून वेलची पावडर
थोडीशी जायफळ पूड
गुलाब पाकळ्या सजावटी करिता
कृती: एका पॅन मध्ये 2 टे स्पून तूप गरम करून त्यामध्ये बारीक सेवया 2-3 मिनिट मंद विस्तवावर परतून मग त्यामध्ये 1कप दूध घालून मिक्स करून झाकण ठेऊन एक वाफ आली की पॅन तसाच बाजूला ठेवा.
दुसऱ्या एका पॅनमध्ये एक चमचा तूप घालून ड्राय फ्रूट (काजू-बदाम तुकडे, खुरबुजच्या बिया, मखाने, सुक्या खोबऱ्याचे पातळ काप व किसमिस) थोडे परतून घ्या मग त्यामध्ये 3/4 कप पाणी घालून पाणी गरम झालेकी 3/4 कप साखर घालून मिक्स होई पर्यन्त गरम करून घ्या.
मग एका बाउलमध्ये मिल्क पावडर व थोडे दूध घालून मिक्स करून पाक बनवलेल्या भांड्यात घालून मिक्स करून एक उकळी येउ द्या. मग वेलची पावडर, जायफळ पावडर व शेवया घालून हळुवारपणे मिक्स करून घ्या.
आता आपली स्वीट डिश तयार झाली आहे. मस्त पैकी सर्व्ह करून काय काय कॉमेंट्स येतात ते कमेन्ट सेक्शन मध्ये लिहा.