Holi Purnima Bhog Puran Pak New Recipe In Marathi
होळी पूर्णिमा नेवेद्यसाठी पुरण पोळी बनवायला वेळ नाही बनवा स्वादिष्ट झटपट पुरण पाक
होळी म्हटले की पुरण पोळी नेवेद्यसाठी हवीच. पॅन काही कारणामुळे पुरण पोळी बनवणे शक्य नाही किंवा पुरण पोळी बनवायला जमत नाही अश्या वेळी बनवा पुरण पाक.
The Holi Purnima Bhog Puran Pak New Recipe in Marathi be seen on our You tube Chanel Holi Purnima Bhog Puran Pak New Recipe
पुरण पाक बनवायला अगदी सोपा आहे व पुरण पोळी साठी योग्य पर्याय सुद्धा आहे. पुरण पाक अगदी झटपट बनतो. आपण इतर वेळी सुद्धा बनवू शकतो.
साहित्य:
1 कप चनाडाळ
1 कप गूळ
3/4 कप साखर
1 कप ओला नारळ खोवून
1/2 कप खवा
1 टी स्पून वेलची पावडर
1 टे स्पून तूप
ड्रायफ्रूट सजावटी करिता
कृती: प्रथम चनाडाळ स्वच्छ धुवून पाणी घालून 2-3 तास भिजत ठेवा. मग त्यामधील पाणी काढून चनाडाळ मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक वाटून घ्या. ओला नारळ खोवून घ्या. एका ट्रे ला किंवा स्टीलच्या प्लेटला तूप लावून बाजूला ठेवा.
एका जाड बुडाच्या भांड्यात वाटलेली चनाडाळ, खोवलेला ओला नारळ, किसलेला खवा घालून मिक्स करून घ्या.
मग विस्तव चालून करून मंद विस्तवावर मिश्रण ठेवून 5-7 मिनिट वाफवून घ्या, मग त्यामध्ये किसलेला गूळ व साखर घालून मिक्स करून घ्या.
आता मिश्रण मंद विस्तवावर आटवून घ्या. गूळ व साखर विरघळली की त्यामध्ये वेलची पावडर घालून मिक्स करून घ्या. मग मिश्रण थोडे घट्ट झालेकी तूप लावलेला ट्रे मध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्या.
मिश्रण थंड झालेकी त्याच्या वड्या कापून होळीला नेवेद्य दाखवून वाटप करू शकता.