Shevga + Toor Dal Mast Tasty Recipe Banvun Paha Sagale Awadine Khatil Recipe In Marathi
शेवगा + तुरडाळ मस्त स्वादिष्ट रेसिपी बनवून पहा सगळे आवडीने खातील
शेवगा वापरुन आपण काही नाविन्यपूर्ण डीशेस बनवू शकतो. कारणकी त्याची टेस्ट मस्त लागते. आपण शेवगा वापरुन सांबर बनवतो टे सुद्धा स्वादिष्ट लागते.
The Shevga + Toor Dal Mast Tasty Recipe Banvun Paha Sagale Awadine Khatil Recipe In Marathi be seen on our You tube Chanel Shevga + Toor Dal Mast Tasty Recipe Banvun Paha Sagale Awadine Khatil
आज आपण शेवगा व तुरडाळ वापरुन एक मस्त डिश बनवणार आहोत ती अगदी निराळी व झटपट होणारी आहे. शेवगा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणांसाठी
साहित्य:
1/2 वाटी तुरीची डाळ
2 शेवगा शेंगा
2 टे स्पून टोमॅटो
2 टे स्पून कांदा
2 हिरव्या मिरच्या
2 लसूण पाकळ्या (चिरून)
1/4″ आल तुकडा (चिरून)
फोडणीकरिता:
2 टे स्पून तेल
1/2 टी स्पून मोहरी
1/2 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
7-8 कडीपत्ता पाने
1 छोटा कांदा (चिरून)
2 टे स्पून टोमॅटो (चिरून)
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून धने-जिरे पावडर
मीठ चवीने
कोथिंबीर (चिरून)
कृती: प्रथम शेवगा शेंगा सोलून धुवून त्याचे तुकडे करून घ्या. एका पॅन मध्ये थोडे पाणी, मीठ व थोडीशी हळद घालून शेवगा मंद विस्तवावर 5 मिनिट शेवगा शिजवून घ्या. कांदा, टोमॅटो कोथिंबीर चिरून घ्या.
तुरडाळ धुवून एका भांड्यात घ्या, तुरडाळीच्या दुपट पाणी घ्या, त्यामध्ये कांदा, टोमॅटो थोडीशी हळद, मीठ घालून कुकरमद्धे 3 शिट्या काढून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये त्यामध्ये मोहरी, जिरे व हिंग घालून त्यामध्ये कडीपत्ता व बारीक चिरलेला कांदा घालून 2 मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. मग त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालून 3 मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने-जिरे पावडर व मीठ घालून मिक्स करून शिजलेली डाळ घालून मिक्स करून घ्या.
आता त्यामध्ये लागेल तसे किंवा 1 कप पाणी घालून मिक्स करून उकळी येऊ द्या. मग त्यामध्ये शेवगा शेंगा व कोथिंबीर घालून मिक्स करून चांगली उकळी येवू द्या.
आता गरम गरम शेवगा तुरडाळ आमटी भाता बरोबर सर्व्ह करा.