स्मार्ट गृहीणींसाठी टिप्स: उन्हाळा सीझनसाठी अगदी कमालच्या किचन ट्रिक्स आपले काम आसान करेल
15 Amazing Kitchen Tips And Tricks For Summer Season For Smart Ladies In Marathi
उन्हाळा सीझन आला की महिलांना बरेच प्रश्न पडतात किंवा काही वेळेस काय करावे समजत नाही त्यासाठी काही आपल्या रोजच्या जीवनात आचरणात आणता येतील अश्या सोप्या झटपट ट्रिक्स व टिप्स दिल्या आहेत.
आपण आपल्या रोजच्या कामात आचरणात आणून पहा नक्की कामाला येतील व आपल्या वेळेची बचत होईल.
1. उन्हाळ्या मध्ये साखरेल पाणी सुटते टिशू पेपरमध्ये थोडे रजमा गुंडाळून ठेवा म्हणजे पाणी सुटणार नाही. मुंग्यायेऊ नयेत त्यासाठी 5-6 लवंग ठेवा त्याच्या वासानी मुंग्या येणार नाहीत.
2. बरेच वेळा कापुर ला पाणी सुटते तेव्हा एक टिशू पेपरमध्ये थोडे तांदूळ गुंडाळून ठेवा त्यामुळे पाणी सुटणार नाही.
3. कुकरमद्धे डायरेक्ट डाळ किंवा तांदूळ शिजयला ठेवले तर कुकरच्या झाकणा मधून पाणी बाहेर येते गॅस व कुकर मग खराब होतो. त्यासाठी डाळ किंवा तांदूळ ठेवताना त्यामध्ये एक चमचा ठेवा. त्यामुळे पाणी बाहेर येणार नाही.
4. बिस्किटस बाहेर काढल्यावर थोडा वेळांनी मऊ होतात त्यासाठी एका प्लेट मध्ये बिस्किटस ठेवून ती प्लेट फ्रीजमध्ये ठेवा. काही वेळांनी एयर टाइट डब्यात भरून ठेवा छान कुरकुरीत राहतील.
5. मायक्रोवेव्ह् आतून खराब होतो त्यासाठी जबरदस्त टीप एक न्यापकिन ओला करून घट्ट पिळून त्यावर टुथपेस्ट लाऊन त्याने साफ करा अगदी झटपट साफ होईल. मग परत स्वच्छ कापडानी पुसून घ्या.
6. आपण मायक्रोवेव्ह् मध्ये चपाती किंवा ब्रेड गरम करतो. त्यासाठी एक ट्रिक चपाती किंवा ब्रेड मायक्रोवेव्ह् मध्ये गरम करताना त्याच्या सोबत एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी ठेवा त्यामुळे चपाती किंवा ब्रेड गरम होऊन सॉफ्ट राहील.
7. उन्हाळा सीझनमध्ये भाज्या लवकर सुकून जातात त्यासाठी भाज्या स्वच्छ करून धुवून कोरड्या करून झिप लॉक बॅग मध्ये भरून लॉक करून शेवटी एक स्ट्रॉ झिप लॉक बॅग मध्ये घुसवून तोंडाच्या सहयानी हवा काढून घ्या मग स्ट्रॉव काढून बॅग नीट बंद करून फ्रीजमध्ये ठेवा.
8. तांदळामध्ये किडे होतात त्यासाठी त्यामध्ये एक कांदा ठेवा. त्यामुळे किडे होणार नाही.
9. आपण भाजी मध्ये दही वापरतो त्यामुळे भाजी स्वादिष्ट बनते. पण दही टाकल्यावर भाजी 2-3 मिनिट शिजू द्या मगच मीठ घाला नाहीतर दही व मीठ एकसाथ टाकले तर दही फाटते.
10. आपण चणे, मुग, मटकीला भिजवतो उन्हाळा सीझनमध्ये भिजवलेल्या चण्याला लगेच वास येतो त्यासाठी मोड आले की एका पातळ कापडात बांधून फ्रीजमध्ये ठेवा वास येणार नाही.
11.लाल मिरची पावडर जास्त दिवस चांगली राहण्यासाठी त्यामध्ये हिंग ठेवा. हिरव्या मिरच्याचे देठ काढून फ्रीजमध्ये ठेवा जास्त दिवस चांगल्या राहतील.
12. मेथीची भाजी कडू लागत असेलतर त्यामध्ये थोडा शेंगदाणा कूट घाला त्यामुळे कडवट पणा कमी होईल.
13. भेंडी चिरताना त्यामध्ये चिकट स्त्राव येतो त्यासाठी सुरीला लिंबुरस लावा मग भेंडी चिरून पहा.
14.बटाट्याचे परोठे बनवताना सारणामध्ये कसूरी मेथी घाला त्यामुळे पराठे स्वादिष्ट लागतात.
15. आपण रायता किंवा कोशिंबीर बनवताना वाढताना मीठ घाला म्हणजे पाणी सुटणार नाही.