Thanda Cool Coffee Dessert For Summer Season Recipe In Marathi
थंडा थंडा कुल कुल अप्रतिम कॉफी डेझर्ट एकदा बनवा आठोडयातून चार वेळ बनवाल
आता उन्हाळा सीझन चालू झाला आहे, मुलांना सुद्धा सुट्या लागल्या आहेत. तर मग रोज काही तरी गोड डेझर्ट पाहिजे. तसेच गरमी मध्ये आपल्याला सुद्धा काही तरी सारखे गोड थंड खावेसे वाटते.
आज आपण अगदी निराळे डेझर्ट बनवणार आहोत ते म्हणजे कॉफी वापरुन, अश्या प्रकारच्या डेजर्टचा कॉफीचा सुगंध येते त्यामुळे अगदी ते पटकन खावेसे वाटते.
The Thanda Cool Coffee Dessert For Summer Season Recipe In Marathi be seen on our You tube Chanel Thanda Cool Coffee Dessert For Summer Season
अगदी नवीन रेसिपी आहे बनवून पहा सगळे आवडीने खातील.
साहित्य:
4 ब्रेड स्लाइस
2 कप दूध
4 टे स्पून साखर
2 टी स्पून कॉफी
2 टे स्पून कॉर्नफ्लोर
1/2 वाटी दूध
7-8 बदाम (तुकडे करून)
1 “ दालचीनी तुकडा
साखरेचा पाक बनवण्यासाठी:
1/2 कप पानी
2 टे स्पून साखर
1/2 टी स्पून कॉफी पाऊडर
सजावटी करिता:
काजू-बदाम तुकडे
कृती: साखरेचा पाक बनवण्यासाठी: एका लहान आकाराच्या भांड्यात पाणी, साखर व कॉफी मिक्स करून 5 मिनिट मंद विस्तवावर गरम करून घेऊन बाजूला ठेवा.
एका जाड बुडाच्या भांड्यात दूध गरम करायला ठेवा व त्यामध्ये साखर, दालचीनी तुकडा व कॉफी घालून मिक्स करा. एका बाउलमध्ये कॉर्न फ्लोर व अर्धी वाटी दूध मिक्स करून गरम दुधामद्धे घालून मिक्स करा मंद विस्तवावर मिश्रण आटवून घ्या, मधून मधून हलवत रहा. मिश्रण घट्ट झाले की दालचीनी तुकडा काढून घ्या, मग विस्तव बंद करा मग मिश्रण थोडेसे थंड झाले की एका बॉक्स मध्ये डेझर्ट बनवायला घ्या.
ब्रेडच्या कडा कापून घ्या, ब्रेडच्या स्लाइस आपल्या ट्रेच्या अनुसार कापून ट्रे मध्ये एक लेयर द्या त्यावर साखरेचे मिश्रण निम्मे घाला मग त्यावर कॉर्न फ्लोरचे निम्मे मिश्रण घालून बदामचे तुकडे घालून परत त्यावर अजून एक ब्रेडचा लेयर द्या त्यावर साखरेचे राहिलेले मिश्रण घालून परत त्यावर राहिलेले कॉर्न फ्लोरचे मिश्रण घालून वरतून बदामचे काप घालून 2 तास फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा.
मग थंडा थंडा कुल कुल कॉफी डेझर्ट सर्व्ह करा.