गरमीमध्ये खूप परेशान आहात असे निराळे प्रीमिक्सचे थंडगार सरबत करून व्हाल लगेच ताजेतवाने
In 2 Minutes Special Custard Sharbat For Summer Season Recipe In Marathi
आता उन्हाळा सीझन चालू आहे. भयंकर गरमी आहे, आपण बाहेरून घरात गेलो की आपल्याला गरमीचा खूप त्रास होतो मग अश्या वेळी आपण अश्या प्रकारचे प्रीमिक्स बनवून असे सरबत बाहेर जाण्याच्या अगोदरच बनवून ठेवावे. मग गरमी मधून आले की असे आरोग्यदायी थंडगार सरबत घेतले की कसे ताजेतवाने वाटते ते पहा.
The In 2 Minutes Special Custard Sharbat For Summer Season Recipe In Marathi be seen on our You tube Chanel In 2 Minutes Special Custard Sharbat For Summer Season
आपण ही सरबत दुधापासून बनवणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपण प्रीमिक्स बनवून ठेवले तर आपल्याला झटपट असे सरबत बनवून ठेवता येते. थंडगार दूध आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. तसेच त्यामध्ये ड्रायफ्रूट पण आहेत. तसेच बनवायला अगदी सोपे आहे.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढनिळ 8-10 ग्लास बनतात
प्रीमिक्स बनवण्यासाठी साहित्य:
1 कप साखर
1/3 कप कस्टर्ड पाऊडर
7-8 काजु
7-8 बदाम
7-8 पिस्ते
3 हिरवी वेलची
ताजे दूध
रोज एसेन्स
सजावटी करिता:
ड्रायफ्रूट तुकडे व गुलाब पाकळ्या
कस्टर्ड सरबत बनवण्यासाठी: 2 जणसाठी
2 कप दूध
2 ते 2 1/2 टे स्पून प्रीमिक्स पाऊडर
सजावटी करिता:
ड्रायफ्रूट व गुलाबाच्या पाकळ्या
कृती: प्रीमिक्स बनण्यासाठी: एका मिक्सर जार मध्ये साखर, कस्टर्ड पावडर, काजु, बदाम, पिस्ते व वेलची घेऊन ब्लेंड करून घ्या. आता हे प्रीमिक्स एका काचेच्या बरणीत भरून ठेवा वरतून ड्रायफ्रूटचे तुकडे घालून बरणीचे झाकण बंद करा. मग पाहिजे तेव्हा आपण हे प्रीमिक्स वापरुन सरबत बनवू शकतो.
कस्टर्ड सरबत बनवण्यासाठी: 2 कप दूध गरम करायला ठेवा, एक बाउल घेऊन त्यामध्ये 2 ते 2 1/2 टे स्पून प्रीमिक्स घेऊन थोडेसे पाणी किंवा दूध घालून एक मिश्रण बनवून घ्या, मग ते मिश्रण गरम दुधामध्ये घालून मिक्स करून एक उकळी येवू द्या. मिश्रणाला उकळी आलीकी त्यामध्ये रोज एसेन्स घालून मिक्स करून विस्तव बंद करा व मिश्रण थंड होऊ द्या. हे सरबत दोन जणसाठी आहे.
आता सरबत थोडावेळ फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा, मग सर्व्ह करताना त्यामध्ये बर्फ, ड्रायफ्रूट तुकडे व गुलाबाच्या पाकळ्या घालून थंडगार सर्व्ह करा.